यहुद्यांच्या वऱ्हाडणाच्या Pass Over सणानिमित्त शिक्षा झालेल्या आणि सजा भोगत असलेल्या एखाद्या गुन्हेगारास तुरुंगातून मुक्त करण्याची प्रथा होती. त्याकाळात इस्राएल रोमन साम्राज्याचा एक भाग होते.

येशू ख्रिस्ताला कुठल्याही शिक्षेपासून सोडवण्यासाठी इस्त्राएलमधील रोमन सुभेदार पिलात याने या प्रथेचा वापर करण्याचे ठरवले.
कारण येशूने कुठलाही गुन्हा केला नाही असे त्याचे मत होते.
मात्र त्याच्यासमोर जमलेल्या जमावाने 'येशूला नको, बाराब्बास याला तुरुंगातून बाहेर सोडा'' अशी मागणी केली.
बाराब्बास हा एक दरोडेखोर होता.
त्यामुळे नाईलाज होऊन पिलात याने बाराब्बास याला तुरुंगातून मुक्त केले आणि त्याऐवजी येशूला क्रुसावर खिळवून ठार मारण्याची सजा द्यावी लागली.
अशा प्रकारे बाराब्बास तुरुंगातून बाहेर आला.
आणि येशूला क्रुसावर टांगून मारण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction

Dnyanodaya monthly enters 175th year