Posts

Showing posts with the label Jalalpur
Image
  या फोटोला कुठले राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळायला हवे ? बुलडोझर झोपड्या पाडत असताना, घराला आग लागली असताना एक मुलगी छातीला पुस्तके कवटाळून तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते आहे असा दाखवणारा एक व्हिडीओ आणि फोटो आहे. इंडियन एक्सप्रेसने आज पहिल्या पानावर हा फोटो दिला आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर जिल्ह्यातील आहे. त्यात जलालपूरमध्ये घरे जमीनदोस्त केली जात असताना एका मुलीला तिच्या झोपडीतून पळताना, तिच्या पुस्तकांना घट्ट धरून पळताना दाखवण्यात आले आहे. पाडापाडी चालू असताना पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या गराड्यात ही घाबरलेली मुलगी अत्यंत वेगाने धावते आहे, असे दिसते. बुलडोझरच्या मदतीने घरे पडली जाताना शेजारच्या घरात आग लागली तशी छोटीशी अनन्या आपल्या झोपडीत पुन्हा पळाली आणि तिथून आपल्या सर्वांत मौल्यवान वस्तू - इंग्रजी , हिंदी भाषा पुस्तके आणि गिनती पुस्तक (गणित) - घेऊन ती आपल्या आईकडे आली. " त्या आगीत माझी पुस्तके जळून जातील अन् मग माझ्या शाळेकडून मला दुसरी पुस्तके मिळणार नाहीत असे मला वाटले "असे अनन्याने म्हटले आहे. तिची ही सगळी धावपळ कुणीतरी ट...