Posts

Showing posts with the label Socialist
Image
मुस्लीम समाजासाठी मोलाचे योगदान देणारे सय्यदभाई तीन वर्षांपूर्वी नरेन्द्र मोदी सरकारने पुण्यातले सय्यदभाई यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला तेव्हा अनेकांच्या - अगदी पत्रकारांच्या- सुध्दा भुवया उंचावल्या गेल्या होत्या. कोण हे सय्यदभाई? असाच त्यापैकी अनेकांचा प्रश्न होता. त्यापूर्वी कितीतरी वर्षे पुण्यातल्या सामाजिक वर्तुळात आणि त्यामुळे प्रसारमाध्यमांतही हे नाव झळकत नव्हते. जुन्या पिढीतल्या लोकांना आणि माझ्यासारख्या काही पत्रकारांना मात्र सय्यदभाई हे नाव आणि हे व्यक्तिमत्त्व चांगलेच परिचित होते. सय्यदभाईचे पुण्यात ८ एप्रिल २०२२ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. मुस्लीम समाजासाठी मोलाचे योगदान देणारे सय्यदभाई हे समाजवादी नेते डॉ बाबा आढाव, दाऊदी बोहरा समाजाचे कार्यकर्ते ताहेर पुनावाला आणि भाई वैद्य यांच्या बरोबरीने काम करणारे कार्यकर्ते. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांच्या निधनानंतर या सामाजिक संघटनेची झुल समर्थपणे सांभाळणाऱ्या काही मोजक्या नेत्यांमध्ये सय्यदभाई यांचा समावेश होता. सय्यदभाई महाराष्ट्रात आणि देशातही एकदम प्रकाशझोतात आले ते पंतप्रधान राजीव गांधी...

आमची कॉम्रेडगिरी We as comrades

Image
गुरुवार, १३ सप्टेंबर, २०१८ आमची कॉम्रेडगिरी सोमवार , १० सप्टेंबर, २०१८ कामिल पारखे कम्युनिस्टांना कॉम्रेड तर समाजवाद्यांना साथी म्हणून संबोधण्याची पद्धत १९७०च्या दशकात चांगलीच होती. त्या काळात पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या 'कॉम्रेड'गिरीच्या काही आठवणी. मी गोव्यात हायर सेकंडरीसाठी मिरामारच्या धेम्पे कॉलेजात दाखल झालो  तेव्हा हिप्पी युग नुकतेच संपत आले होते. १९७०च्या दशकात गोव्यात पर्यटन आजच्याइतके वाढले नव्हते. गोवा भारत संघराज्यात सामील होऊन आताशी कुठे एक तप उलटले होते आणि आम्हाला शिकवणाऱ्या प्राध्यापकवर्गापैकी काही जण पोर्तुगीजांच्या लायसेममध्ये पोर्तुगीज भाषेत शिकलेले असल्यामुळे इंग्रजीत शिकवताना अक्षरशः: अडखळत आणि धडपडत होते. आणि याकाळात आम्हा युवकांमध्ये चळवळीची लाट पसरत होती.  गोव्यात नुकत्याच स्थापना झालेल्या ऑल गोवा स्टुडन्टस युनियनने (आग्सु) त्यावेळी विद्यार्थ्याना बसच्या प्रवासासाठी निम्मे प्रवासभाडे असावे यासाठी आंदोलन सुरू केले. मला सीनियर असलेले सतीश सोनक आणि नंदकुमार कामत त्यावेळी आग्सुचे नेते होते.  गोव्यात त्यावेळी फक...