Posts

Showing posts from 2023
Image
  श्रीरामपूरला सोमैया हायस्कूलमध्ये आठवीनववीत शिकत असताना रविंद्र धुप्पड हा माझा अगदी जवळचा मित्र होता. आम्हा दोघांत काहीही समान धागे नसताना आम्ही दोघे इतके जवळचे मित्र कसे बनलो याचे आज या क्षणाला आठवत नाही, मात्र त्याबद्दल आश्चर्य नक्कीच वाटते. मी आमच्या शाळेजवळ राहणारा तर धुप्पड संगमनेर रोडवर चौगुले इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहणारा. त्याच्यामुळे मी आयुष्यात पहिल्यांदा इमारतीत फ्लॅट कसा असतो हे पाहिले. निळ्या रंगाचा लँडलाईन फोनसुद्धा पहिल्यांदा मी धुप्पडच्या घरात पाहिला, त्या फोनची रिंगटोन ऐकली. पुढचे आणि मागचे असे दोन दारे असलेल्या आमच्या घरात धुप्पडचा इथून तिथे सगळीकडे वावर असायचा. आमच्या घरातील सर्वांशी म्हणजे दादांशी, बाईशी, सगळ्या भाऊ बहिणी आणि वहिनी यांच्याशी त्याचा मराठीत चांगला संवाद असायचा. आमच्या स्वयंपाकघरात लाकडी भूशाच्या शेगडीवरच्या पातेल्यांत काय शिजते आहे याचीही त्याला पूर्ण कल्पना असायची, पण आमच्या संबंधात त्यामुळे काही बाधा आली नाही. माझा सर्वांत थोरला भाऊ फ्रान्सिस धुप्पडला त्याच्या घरच्या नावाने `किले' म्हणूनच हाक मारायचा. शाळेतल्या इतर मित्रांप्रमाणे आम्ह
Image
  पंचहौद चर्च पुण्यात अगदी अलीकडच्या काळापर्यंत काही वास्तू आणि ठिकाणे या शहराची ओळख होती, मैलाचे दगड होती. पुण्यातल्या मध्यवर्ती भागातली महात्मा फुले मंडईची नाविन्यपुर्ण आकाराची इमारत, मध्यवस्तीतला शनिवारवाडा, पुणे कॅम्पाव्या एका तोंडाशी असलेले लाल रंगाचे आणि म्हणून लाल देऊळ याच नावाने ओळखले जाणारे ज्यु धर्मियांचे प्रार्थनास्थळ म्हणजे सिनेगॉग. तिकडे शहराच्या आणखी एका टोकाला वानवडीजवळ आणि रेस कोर्ससमोर असलेले १८६० साली बांधले गेलेले भव्य आकाराचे सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रल आणि गुरुवार पेठेतील उंचच उंच मनोरा असलेले पवित्र नाम देवालय अर्थात होली नेम चर्च. शहराच्या उंच भागावर असलेले पेशवेकालीन पर्वती मंदिर सुद्धा असेच. क्वार्टर गेटपाशी असलेले आणि माधवराव पेशवे यांनी १७९२ साली दिलेल्या जागेवर उभे असलेलें छोटेखानी सिटी चर्च मात्र तसे दुर्लक्षित राहिले, हमरस्त्यावर नसल्याने आजही या ऐतिहासिक वास्तुकडे सहज लक्ष जात नाही. त्याकाळच्या पुण्याच्या सिमित क्षितिजावर दुरुन या वास्तू कुणाचेही लक्ष वेधून घ्यायच्या. शहराच्या स्कायलाईनवर त्यांचे महत्त्वाचे स्थान असायचे. शहरात टोलेगंज उंच इमारतींचे आक्
Image
  महाराष्ट्रात भौगोलिकदृष्ट्या हरेगावचे स्थान काय आहे हे फार लोकांना माहित नाही. हरेगाव हल्लीच्या हमरस्त्यावर नाही, मात्र याच हरेगावामुळे या परिसरात हमरस्ते आणि रेल्वे स्टेशने तयार झाले, औद्योगिक आणि आर्थिक विकास झाला आणि आसपास श्रीरामपूरसारखे त्याकाळात अस्तित्वात नसलेले शहर निर्माण झाले. ही बाबसुद्धा लोकांना माहित नसणार अहमदनगर जिल्ह्यातच आणि श्रीरामपूरजवळ असलेले शिर्डी हे स्थळ जगाच्या नकाशावर आपली जागा राखून आहे. मात्र शिर्डी हे नावारुपाला आले ते अलीकडच्या काळात, म्हणजे सत्तरच्या दशकात. त्याकाळात श्रीरामपूरहून मी आणि माझा एक मित्र सायकलने शिर्डीला जायचो, तिथे दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही मुले आणि इतर भाविक लोक थेट साईबाबांच्या मूर्तीसमोर बसायचो. देवदर्शन झाल्यावर काही क्षण मंदिरात किंवा पायऱ्यांवर स्वस्थ बसायचे असते, हे मी त्यावेळी शिकलो. आजूबाजूला भिंतीही नव्हत्या आणि अजिबात गर्दी नसायची यावर आज कुणाचा विश्वासही बसणार नाही. याउलट हरेगाव मात्र फार पूर्वीपासून एक गजबजलेले ठिकाण होते. समाजमाध्यमावर ``आम्ही हरेगावकर'' या ग्रुपचा गेली काही वर्षे मी सभासद आहे. हरेगावशी म
ख्रिस्ती समाज : महाराष्ट्रातला आणि देशातल्या अनेक भागांतील ख्रिस्ती समाज फारच सोशिक, सहनशील आणि शांतताप्रिय समजला जातो. 'शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा' या बाबासाहेबांच्या संदेशातील शिकण्याबाबत या समाजाने मनावर घेतले तरी बाकी दोन बाबतींत आनंदीआनंद आहे. या समाजावर अन्याय झाला, खूपच गळ्यापाशी आले तरच हा समाज रस्त्यावर येतो, मेणबत्ती पेटवून आणि शांतता मोर्चा घेऊन. महाराष्ट्रातील अनेक शहरांत पुष्कळदा आंबेडकरवादी संघटना आणि त्यांचे नेते त्यांना पाठबळ देण्यासाठी पुढे येत असतात. ख्रिस्ती समाज सामाजिक चळवळीपासून स्वतःला नेहेमी चार हात दूर ठेवत असला तरीसुद्धा. सुगावा प्रकाशनाचे प्रा विलास वाघ सर मला म्हणायचे, ``कामिल, तुमचे लोक फारच शांत, `एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे कर' हा येशूचा संदेश तुम्ही लोकांनी फारच मनावर घेतलाय !'' मला आठवते माझ्या लहानपणी खूप वर्षांपूर्वी हा समाज रस्त्यावर आला होता ते खासदार ओ पी त्यागी यांनी आणलेल्या धर्मांतर स्वातंत्र्य (म्हणजेच धर्मांतरविरोधी) विधेयकाला विरोध करण्यासाठी. (आता हा कायदा प्रॅक्टिकली देशात सगळीकडे अंमलातही आला आहे )
Image
बॉसच्या फार जवळ जाऊ नये, फार पुढेपुढे, सलगी करु नाही असे शहाणी माणसे म्हणतात. हा मंत्र मी फार कसोशीने पाळत आलो आहे. चार दशकांच्या पत्रकारितेच्या कारकीर्दीत एकदोन जणांचा किंवा अख्ख्या टीमचा बॉस होण्याची आपत्ती माझ्यावर फार कमी काळ -अगदी नोकरीच्या शेवटच्या टप्प्यावर - आली. माझे कनिष्ठ सहकारी किंवा माझ्याबरोबरीचे कालांतराने माझे बॉस झाले तेव्हाही मी वरचा हा मंत्र सतत ध्यानात ठेवला. माझ्या अगदी पडझडीच्या काळात संपूर्ण जग नव्या सहस्त्रकाच्या उंबरठ्यावर असताना पुण्यात नुकत्याच सुरु झालेल्या टाइम्स ऑफ इंडियाच्या संपादकीय विभागाच्या बॉसने शेरना गांधी (आणि मुख्य वार्ताहर अभय वैद्य ) यांनी मला इंडियन एक्स्प्रेसमधून बोलावले. कॉनी मस्कारेन्हास याने म्हटले आहे की शेरना यांना फक्त कामाशी मतलब होता, एखाद्या व्यक्तीच्या खासगी किंवा पूर्वायुष्याशी नाही. पुण्यात टाइम्समध्ये दोन वर्षे शेरना गांधी Sherna Gandhy बॉस होत्या. (Gandhy हे नाव गांधी असे लिहिले जाऊ नये असा एक मुद्दा इथे मागच्या वर्षी एका पुस्तकाविषयी वाद झाला तेव्हा मांडला गेला होता.) वर म्हटल्याप्रमाणे मी कधीही शेरना मॅडमच्या घरी खाण्यापि
Image
  ख्रिस्ती धर्मियांचा चाळीस दिवसांचा उपवास काळ - लेंट सिझन   ख्रिस्ती धर्मियांचा चाळीस दिवसांचा उपवास काळ - लेंट सिझन - दरवर्षीं मार्च-एप्रिल याच काळात येतो. मुस्लीम कॅलेंडर चांद्रवर्षीय असल्याने रमझान महिना ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये सतत बदलत असतो. नाताळाची आणि इतर ख्रिस्ती सणांची तारीख ठरलेली असते, लेन्ट सिझन आणि यामध्ये येणाऱ्या झावळ्यांचा रविवार (पाम संडे), गुड फ्रायडे आणि इस्टर संडे मात्र याला अपवाद. या तारखा विशिष्ट आकडेवारी करून ठरवतात, माझ्याही डोक्यात ते अजून बसले नाही. तर या होली लेन्ट सिझनमधला अतिपवित्र आठवडा सद्या चालू आहे. पाम संडेपासून सुरु झालेला आणि ईस्टर संडेला संपणारा. खरे पाहता हा होली विक अध्यात्मिकदृष्ट्या अगदी ख्रिसमसपेक्षाही महत्वाचा. याचे कारण म्हणजे येशू ख्रिस्ताचे अवतारकार्य म्हणजे खुप वेदना सहन करून क्रुसावर मरणे आणि तीन दिवसांनंतर इस्टर रविवारी मृत्यूतून पुनरुज्जीत होणे. वर्षभर रविवारी देवळाकडे न फिरकणारे अनेक ख्रिस्ती जण ख्रिसमसप्रमाणेच या पवित्र आठवड्यातल्या सर्व प्रार्थनाविधींना आवर्जून हजर असतात. आज मौंडी थसडे किंवा पवित्र गुरुवार. याच दिवशी
Image
  गोपाळराव जोशी .. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास गोपाळराव जोशी हे नाव वगळून पूर्ण होऊच शकत नाही . आधुनिक वैद्यकशास्त्रात पदवी मिळवणाऱ्या डॉक्टर होणाऱ्या हिंदुस्थानातल्या पहिल्या महिला आनंदीबाई जोशी यांचे पती म्हणून गोपाळराव जोशी ओळखले जात असले तरी ही त्यांची पूर्ण ओळख नाही . इतिहासात मात्र   हे पात्र नकारात्मक दृष्टिकोनातून,   त्यांच्या विविध अवगुणांवर   बोट ठेवून रंगवले गेले आहे . एक इरसाल , विक्षिप्त हेकेखोर   व्यक्ती, आपल्या बायकोने शिकावं, डॉकटर व्हावं म्हणून त्यांचा खूप छळ करणारा नवरा , पुण्यातल्या आणि मुंबईतल्या भल्याभल्या लोकांना आपल्या जेरीस आणणारा पण अत्यंत बुद्धिमान असणारा गोपाळराव जोशी अगदी वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व आहे . वर उल्लेख केलेली अनेक स्वभाववैशिष्ट्ये गणपतरावांच्या जीवनातील विविध प्रसंगांतून दिसून येतात . श्री ज. जोशी यांनी आनंदीबाई आणि गोपाळराव जोशी .. यांच्या जीवनांवर लिहिलेली ` आनंदी गोपाळ’ ही कादंबरी बरीच गाजली . मात्र गोपाळराव यांच्या एका वेगळ्याच कामगिरी