Posts

Showing posts with the label Vaishali
Image
आज थोडं विषयांतर, थोडं स्मरणरंजन आणि little Narcissism..... या सहस्रकाच्या सुरुवातीला त्यावेळी नव्यानेच सुरु होणाऱ्या `टाइम्स ऑफ इंडिया'च्या पुणे आवृत्तीत रुजू झालो. गंमत म्हणजे काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी म्हणजे डेक्कन जिमखान्यात ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीच्या (बीसीएल) च्या मागे सडाफटिंग असलेला मी राहायचो आणि त्यावेळी कॅम्पात अरोरा टॉवरमध्ये असलेल्या इंडियन एक्सप्रेसच्या कार्यालयात मी येथून जायचो. बीसीएल समोरच असलेल्या `टाइम्स ऑफ इंडिया'त लागलो तेव्हा ( लग्नानंतर ! ) थेट चिंचवडहून मी इथं यायचो. त्यावेळी टाइम्सची ही इमारत अगदी नवीकोरी होती, शिवाजीनगरच्या बैठ्या इमारतीतून कार्यालय नुकतेच स्थलांतरित झाले होते. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या गॅलरीतून पालखीची मिरवणूक आम्ही पाहायचो, संत ज्ञानेश्वरांच्या आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन इथून अगदी व्यवस्थित व्हायचे, हे आजही आठवते. तसे टाइम्सचे माझे संबध अगदी १९९१ च्या पुणे प्लस पासूनचे. पण हे सर्व डिटेल्स नंतर कधीतरी. परवा एका कामानिमित्त इथं गेलो होतो, राहवले नाही म्हणून . म. टा. च्या एका तरुण पत्रकाराला विन...
Image
     डॉ. अनिल अवचट  `गोव्यातून पुण्याला आलो आहे चार दिवसांसाठी.. उद्या सकाळी वैशालीत ये गप्पा मारायला..’’ त्यावेळी १९८९ला जलद संवादासाठी केवळ लँडलाईन फोनचा पर्याय होता. `इंडियन एक्सप्रेस'ला बातमीदार म्हणून रुजू झाल्यावर रानडे इन्स्टिट्युटसमोरच आणि वैशालीसमोर ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीच्या मागे `मंथली कॉट' बेसिसवर मी राहत असलेल्या माझ्या लॉजवर मला हा निरोप मिळाला होता.    पणजीला `द नवहिंद टाइम्स’ चा बातमीदार असताना देबाशिष मुन्शी या `टाइम्स ऑफ इंडिया’च्या गोवा प्रतिनिधीशी दोस्ती झाली होती. `टाइम्स ऑफ इंडिया’ च्या त्याच्या बड्या पगारानुसार पणजीत अल्तिन्हो येथे सरकारी कोट्यातून त्याला आलिशान फ्लॅट मिळाला होती.. तिथेच सर्किट हाऊसमध्ये राहणाऱ्या एका पुणेकराची त्याने मला ओळख करून दिली होती.    या सद्गृहस्थाने मला हा निरोप पाठवला होता गंमत म्हणजे त्याचे नाव आता आठवत नाही. मात्र आठवते ती त्यांनी ओळख करून दिलेली ती व्यक्ती.    वैशालीत जवळजवळ अर्धापाऊण तास आम्ही तिघे बसलो असणार. काही खाऊन झाल्यानंतर माझे चहाचे दोन कप पिऊन झाल...