जोतिबा फुले हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे एक गुरु. जोतिबांचे पहिलेवहिले आधारभूत अनेक संदर्भटिपांसह चरित्र धनंजय कीर यांनी लिहिले ते डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणामुळेच.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र कीर यांनी चरित्रनायक हयात असताना आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून लिहिले आहे.
फुले यांचे चरित्र लिहिण्याची प्रेरणा कीर यांना कशी मिळाली याविषयी कीर यांनी आपल्या प्रस्तावनेत लिहिले आहे.
त्या प्रस्तावनेच्या पहिल्याच परिच्छेदात कीर लिहितात:
``डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र मी लिहीत असताना एका भेटीच्या प्रसंगी, महात्मा फुले यांचे चरित्र लिहिण्याचा आपला मानस आहे असे बाबासाहेबांनी मला सांगितले.
परंतु आपली प्रकृती ढासळत असल्याने हे कार्य आपल्या हातून सिद्धीस जाईल किंवा नाही अशी त्यांनी शंका प्रदर्शित केली.
त्यावर मी स्वयंस्फूर्तीने उत्तरलो, ``बाबासाहेब, ते कार्य आपण करू शकला नाहीत तर मी ते तडीस नेण्याचा प्रयत्न करीन'.
डॉ बाबासाहेब हे, भगवान बुद्ध व महात्मा कबीर या आपल्या दोन गुरुंच्या बरोबरीने महात्मा फुले याना आपले तिसरे गुरु मानीत.
डॉ आंबेडकरांचे हे संकल्पित कार्य नि उत्कट इच्छा ही यथामती नि यथाशक्ती पूर्ण केली याविषयी मला कृतार्थता वाटते.''
बाबासाहेबांना दिलेला शब्द कीर यांनी पाळला आणि जोतिबा फुले यांचे विस्तृत आणि संदर्भासह म्हणता येईल असे इंग्रजीत चरित्र लिहिले.
`महात्मा जोतीराव फुले' या शिर्षकाचे हे चरित्र १९६४ साली प्रसिद्ध झाले.
दुदैवाने तोपर्यंत फुले यांना गुरुस्थानी मानणाऱ्या आणि त्यांच्या चरित्रलेखनाची इच्छा बाळगणाऱ्या डॉ. आंबेडकरांचे निधन झाले होते.
सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या शिक्षणक्षेत्रातील आणि इतर कार्यामागे आतापर्यंत इतिहासाच्या पडद्याआड राहिलेल्या अनेक व्यक्तींचा हातभार लागला होता.
गफार बेग मुन्शी आणि लिजिट साहेब ही त्यापैकी सुरुवातीची दोन नावे.
फुले दाम्पत्याच्या समकालीन व्यक्तींच्या कार्यांचा अभ्यास केला कि त्या कालखंडातील परिस्थितीचेखरेखुरे आकलन होते.
जोतिबांचे शिक्षक जेम्स मिचेल, सावित्रीबाईंना अद्यापनाचे प्रशिक्षण देणाऱ्या नगरच्या सिंथिया फरार आणि मिसेस मार्गारेट मिचेल, डॉ. जॉन विल्सन, मार्गारेट विल्सन आणि जॉन मरे मिचेल यांची नावे सावित्रीबाई आणि जोतिबांच्या चरित्रांत विविध संदर्भांत येतात.
या व्यक्तींबाबत माहिती देणारे आणि त्याद्वारे फुले दाम्पत्याच्या जीवनावर नवा प्रकाश टाकेल असे माझे पुस्तक `सावित्रीबाई आणि जोतिबाचे शिक्षक मिचेल दाम्पत्य आणि स्त्रीशिक्षणातील पूर्वसुरी' आज बाबासाहेबांच्या जयंतीदिनी चेतक बुक्सने प्रकाशित केले आहे.
Camil Parkhe April 14, 2025

Comments

Popular posts from this blog

Fr. Rudolf Schoch. A Jesuit Looks back in satisfaction

Dnyanodaya monthly enters 175th year

Shakuntala Paranjape : Crusade of a lifetime