Posts

Showing posts with the label Konkani
Image
पोप फ्रान्सिस सध्या कॅनडाच्या दौऱ्यावर आहेत आणि जगभरातील नियतकालिके त्यांच्या या दौऱ्यावर लक्ष ठेऊन आहेत. जगभर धर्म आणि शासन यांची फारकत होत असताना आजही कॅथोलिक पंथाचे सर्वोच्च धर्मगुरु असलेल्या पोपमहाशयांना आजही महत्त्व दिले जाते हे मान्य करावेच लागेल. पुण्यातल्या डेक्कन जिमखान्याहून लहान असलेल्या आणि सातशे नागरिक असलेल्या व्हॅटिकन सिटीला आज एक सार्वभौम देश म्हणून मान्यता आहे आणि या देशाचे पोप राष्ट्रप्रमुख आहेत. जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या दौऱ्यावर असताना मुद्दाम व्हॅटिकन सिटीला गेले आणि पोप फ्रान्सिस यांची भेट घेऊन त्यांना भारत भेटीचे अधिकृत निमंत्रण दिले आहे. गेली काही दशके तीन पदांवरील व्यक्तींविषयीं जगातील अनेक लोकांमध्ये अपार कुतूहल असते. या तीन पदांवरील व्यक्ती वर्षभर या ना त्या कारणाने, निमित्ताने जगभरातील प्रसार माध्यमांत सतत झळकत असतात. या तीन व्यक्ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ दुसऱ्या आणि रोमन कॅथोलिक पंथाचे प्रमुख आणि व्हॅटिकन सिटी राष्ट्राचे प्रमुख पोप. पोप हे ख्रिस्तमंडळाचे म्हणजे कॅथोलिक चर्चचे प्रमुख, येशू ख्र...
Image
कोकणी लेखक दामोदर मावजो यांना ज्ञानपीठ पुरस्कार . पंतप्रधान पंडित नेहरु यांनी १९ डिसेंबर १९६१ला भारतीय फौजा पाठवून गोवा, दमण आणि दिवची पोर्तुगीज सत्तेतून मुक्तता केली. तेव्हापासुन हा प्रदेश भारतीय संघराज्यात सामिल झाला. ऐंशीच्या दशकात कोकणी भाषेचा भारतीय घटनेच्या आठव्या परिशिष्ठात समावेश करण्यात आला. अशाप्रकारे एक स्वतंत्र भाषा म्हणून कोकणी भाषेला मान्यता मिळाली. त्यानंतर कोकणी भाषेला गोव्याची अधिकृत राज्यभाषा म्हणून मान्यता मिळाली. सन १९८७ ला गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा प्राप्त झाला. कोकणी भाषेत हा पुरस्कार मिळवणारे दामोदर मावजो हे दुसरे साहित्यिक. याआधी रविंद्र केळेकार यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळाला होता. कोकणी भाषा देवनागरी, रोमन तसेच कन्नड़ लिपित लिहिली जाते. गोव्यातील ख्रिस्ती समाज रोमन लिपिचा वापर करतो तर कर्नाटकातील किनारपट्टीवर कन्नड लिपित लिहितात. सरकारी पुरस्कारसाठी मात्र देवनागरी लिपितील कोकणी साहित्याचाच विचार होती. मराठी भाषेतल्या चार साहित्यिकांना आजपर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. वि. स. खांडेकर, वि. वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि भालचं...
Image
  बार्देसकर समाजाच्या स्थलांतराची, त्यामागच्या कारणांची आजपर्यंत इतिहासकारांनी दखल घेतली नव्हती… ‘अक्षरनामा’ पडघम  - सांस्कृतिक कामिल पारखे ‘द बार्देसकर्स - द हिस्टरी ऑफ मायग्रेशन’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ Thu , 20 May 2021 पडघम सांस्कृतिक ख्रिस्ती धर्म रोमन कॅथोलिक द बार्देसकर्स - द हिस्टरी ऑफ मायग्रेशन फादर बिशप ही १९७६ची गोष्ट आहे. दहावीची परीक्षा दिल्यानंतर श्रीरामपूर येथील घर सोडून मी फादर प्रभुधर यांच्यासारखा जेसुईट (येशूसंघीय) धर्मगुरू होण्यासाठी कराड येथील त्यांच्या ‘स्नेहसदन’ या निवासस्थानी दाखल झालो. सोसायटी ऑफ जिझस या कॅथोलिक धर्मगुरूंच्या संस्थेच्या सदस्यांना ‘जेसुईट’ म्हणतात. कॅथोलिक चर्चमध्ये अशा फादरांच्या आणि नन्स वा सिस्टरांच्या शेकडो संस्था आहेत. उदा. डॉन बॉस्को (सॅलेशियन) फादर्स, मदर टेरेसा सिस्टर्स, फ्रान्सिलीयन फादर्स. सध्याचे पोप फ्रान्सिस हे सर्वोच्च पदावर पोहोचलेले जेसुईट संस्थेतील पहिले धर्मगुरू आहेत. कराडला आल्यावर एका वेगळ्याच ख्रिस्ती समाजाची मला ओळख झाली. फादर प्रभुधर मला कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा, राधानगरी, गारगोटी, कागल व चंदगड आणि कर्ना...
गोवा, दमण आणि दीव पणजीतल्या धेम्पे कॉलेजात बारावीसाठी प्रवेश घेतल्यापासून दमण आणि दीव हे चिमुकले प्रदेश माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. गंमत म्हणजे हे दोन छोटे प्रदेश मी कधी पाहिलेही नव्हते वा भारताच्या नकाशात त्यांचे स्थान नक्की कुठे आहे हेसुद्धा मला माहिती नव्हते. तरीसुद्धा या प्रदेशांशी मी जोडला गेलो आहे. याचे एक मुख्य कारण म्हणजे गोव्याबरोबरच दमण आणि दीव ह्या दोन प्रदेशांचा माझ्या उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेच्या प्रमाणपत्रात उल्लेख आहे. १९७५ पासून गोव्यातील दहावी आणि बारावीच्या त्याकाळच्या गोवा, दमण आणि दीव माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलया जायच्या. ह्या दोन प्रदेशांशी माझा संबंध जोडला जाण्याचे एकमात्र कारण गोव्याप्रमाणेच दमण आणि दीव हे दोन्ही प्रदेश पोर्तुगीजांच्या भारतातील वसाहतींचा सुमारे ४५० वर्षे एक भाग होते. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंनी ११ डिसेंबर १९६१ रोजी लष्करी कारवाई करून गोवा, दमण आणि दीव हे प्रदेश पोर्तुगीजांच्या सत्तेतून मुक्त केले. गोवा महाराष्ट्राच्या दक्षिणेला सागरी किनाऱ्यावर तर दमण आणि दीव गोव्यापासून शेकडो किलोमीटर दूर गुजरातच्...

‘निरोप्या’चे संपादक फादर प्रभुधर

Image
‘निरोप्या’चे संपादक फादर प्रभुधर   October 12, 2020     lokmarathi  Camil parkhe   October 12, 2020     lokmarathi  Camil parkhe कामिल पारखे रविवारची मिस्सा संपल्यावर मी माझ्या वडिलांचे बोट धरून चर्चच्या समोरील मोकळ्या जागेत उभा होतो. देवळातून बाहेर पडणारे लोक आपसांत बोलत उभे होते. श्रीरामपूरला अलिकडेच बदली होऊन आलेले ते तरुण धर्मगुरू घोळक्याने उभे असलेल्या लोकांशी बोलत होते. फादर प्रभुधर यांचे व्यक्तिमत्व अगदी देखणे असेच होते. वक्तृत्व शैलीची देणगी लाभलेल्या फादरांच्या ओघवत्या उपदेशांनी लोक प्रभावित होत असत. भरपूर उंचीचे फादर आपल्या पांढऱ्या झग्यात फिरत होते, तसे त्यांना ‘जय ख्रिस्त’ म्हणून अभिवादन करण्यासाठी लोक त्यांच्याकडे वळत होते. आमच्याकडेही ते आले आणि माझ्या वडिलांशी – दादांशी – बोलू लागले. बोलत असताना मध्येच थांबून माझ्याकडे पाहत त्यांनी विचारले, “पारखे टेलर, तुम्हाला किती मुले आहेत? आणि त्यांच्यामध्ये याचा नंबर कितवा?” माझ्या वडिलांचे श्रीरामपुरात मुख्य बाजारपेठेत सोनार लेनमध्ये ‘पारखे टेलर्स’ हे टेलरिंगचे दुकान होते. शहरातील दोन-तीन प्र...