Posts

Showing posts with the label catering
Image
  Sorpotel  गोव्यात पणजीला हायर सेकंडरी आणि पदवीचे शिक्षण घेताना आमच्या हॉस्टेलात ही प्रथा होती. दरदिवशी आमच्या हॉस्टेलात किचनमध्ये भरपूर ओला आणि सुका कचरा निर्माण होई तो सिंकच्या खाली असलेल्या एका मोठ्या डब्यात जमा होई. दररोज रात्री नवाच्या आसपास आमची जेवणे उरकल्यावर शेजारच्या एका घरातली लोक हा गच्च भरलेला डबा नेत आणि त्याजागी दुसऱ्या दिवसासाठी मोकळा डबा ठेवत. या डब्यात रोज गोळा होणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या, फळांच्या आणि इतर साली, उरलेला भात, पाव वगैरे अन्नधान्य तो शेजारी आपल्या पिगरीत असलेल्या डुकरांना खाऊ घालत असे. पिगरी म्हणजे डुकरे पोसतात ती जागा. त्याकाळी गोव्यात सगळीकडे डुकरे दिसायची. गोवा आणि डुकरे एक अविभाज्य संबंध होता. मारिओ मिरांडा यांचे गोव्यासंबंधीचे कुठलेही व्यंगचित्र शेपूट वळवळणारे डुक्कर दाखविल्याशिवाय पूर्ण होत नाही, त्याचे हे कारण. घरांघरांतून असे भरपूर उरलेले अन्नधान्य वगैरे खाद्यपदार्थ डुकरांसाठी रोज मिळत असे. यात अर्थात कुठल्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण नसायची. अपवाद एकच. वर्षांतून दोनदा म्हणजे डिसेंबरात ख्रिसमसला आणि मार्च-एप्रिलमध्ये ईस्टर फेस्...
Image
'मेरी ख्रिसमस' वयाच्या पंधराव्या वर्षी गोव्यात राहायला गेल्यापासून ख्रिस्तमस व कुठल्याही फेस्तला म्हणजे सणाला माझा ब्रेकफास्टचा मेन्यू कायम राहिला आहे. बनपाव किंवा बर्गरला भरपूर बटर लावून, त्यात चीज आणि हाफ-फ्राईड अंडे टाकून गरमगरम कॉफी पित सणाच्या सेलेब्रेशन मूडमध्ये जाता येते. (बल्गेरियात असताना आणि अलीकडच्या युरोप दौऱ्यावर हा माझा दररोजचा नाश्ता असायचा !) तर आज सकाळी शेजारच्या बेकरीत गेलो आणि बनपाव मागितला तर तिथल्या युपीमधून गेल्या वर्षी आलेल्या मुलाने सकाळीच एकाने तीसचाळीस बनपाव नेले आणि आता एकही बनपाव राहिला नाही म्हणून सांगितले ! त्या बेकरीत सगळीकडे अनेक प्रकारच्या केकचे ढिग रचून ठेवले होते, त्या मुलाला आज एव्हढ्या केकचे कारण काय विचारले तर अस्लम डोके खाजवायला लागला. त्याला आजच्या सणाचे नाव माहित नव्हते. ''आज कोई बहुत केक खाते है ना, इसलिए बनाये है'' असे तो म्हणाला. मागच्याच वर्षी पुण्यात आलेल्या अस्लमने बहुधा ख्रिसमस वा नाताळ हा शब्द कधी ऐकलाही नसावा. नंतर चिंचवडगावातल्या आमिर बेकरीत बर्गर, बनपाव घ्यायला तेव्हा तिथेही केकचे ढिग लावलेले दिसले. बेकरीचा...