Posts

Showing posts with the label Charu Muzumdar
Image
  सत्तरच्या दशकात गोव्यात मिरामारला धेम्पे कॉलेजात तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताना मला पहिल्यांदा `नक्षलबारी’ या शब्दाची ओळख झाली. गंमत म्हणजे तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी म्हणून कार्ल मार्क्सच्या विचारांचा अभ्यास करत असलेला मी त्यावेळी आजन्म अविवाहित राहून ख्रिस्तीधर्मिय जेसुईट फादर होण्यासाठी प्रशिक्षणही घेत होतो. सत्तरच्या दशकात (आणि त्याकाळाआधीसुद्धा) उच्चशिक्षणाच्या कॉलेज-विद्यापीठ आवारांत आम्हा झेन झी पोरांपोरींना डाव्या विचारसरणीने मोठ्या प्रमाणात भुरळ घातली होती साठीच्या आणि सत्तरच्या दशकांत नक्षलबारी हे नाव देशात गाजू लागले. आतापर्यंत हे नाव विविध संदर्भांत या ना त्या कारणांनी कायम येत राहिले आहे. खरे पाहता पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी हा छोटासा परीसर होता. येथील शोषक जमीनदारी वर्गाविरुद्ध काही कम्युनिस्ट नेत्यांनी सशस्त्र उठाव केला आणि देशात नक्षलबारी चळवळीचा उगम झाला. चारू मजूमदार आणि कानू सन्याल ही या चळवळीतील दोन प्रमुख नावे. जातपात, हिंदू, मुसलमान आणि ख्रिश्चन असले धर्म तसेच लिंगाधारित कुठलेही भेद न मानता केवळ आर्थिक प्रश्नांवर सामाजिक आणि राजकिय सं...