साधारणतः १९८२चा काळ. गोव्यात पणजीतल्या The Navhind Times (‘नवहिंद टाइम्स’) चा ‘कॅम्पस रिपोर्टर’ म्हणून मी नुकतीच सुरुवात केली होती. पणजीतले धेम्पे आर्टस् आणि सायन्स कॉलेज, डेम्पो कॉमर्स कॉलेज, बांबोळीचे गोवा मेडिकल कॉलेज, फार्मागुडीचे सरकारी गोवा इंजिनियरिंग कॉलेज, मडगावचे दामोदर कॉमर्स कॉलेज, म्हापशाचे डीएमसी आणि वॉस्कोचे एमईएस कॉलेज, अशी काही मोजकीच पदवी आणि व्यावसायिक महाविद्यालये तेव्हा गोव्यात होती. आठवड्यातून या प्रत्येक महाविद्यालयात जाऊन गरजेनुसार तेथील प्राचार्यांना, काही शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, विद्यार्थी आणि शिक्षक संघटनांच्या नेत्यांना भेटून शिक्षणक्षेत्रातील बातम्या दररोज किंवा ‘कॅम्पस रिपोर्टर’ या प्रत्येक सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक सदरात द्यायच्या, हा माझा नेहमीचा शिरस्ता होता. त्याशिवाय नोकरी करत असतानाच मी एम.ए.च्या तत्त्वज्ञान विषयाचा विद्यार्थी म्हणून नियमितपणे लेक्चर्सला हजर राहत असे. त्या वेळी मुंबई विद्यापिठाचे पदव्युत्तर केंद्र पणजीतल्या १८वा जून रोडवरील सुशिला बिल्डिंगमध्ये होते. गोवा विद्यापीठाची स्थापना होण्यास अजून अवकाश होता. या पोस्ट-ग्र...
Posts
Showing posts with the label Dhempe College
गोव्याचा कार्निव्हल : हा उत्सव भारतीय पर्यटकांना अपरिचितच राहिला आहे!
- Get link
- X
- Other Apps
गोव्याचा कार्निव्हल : हा उत्सव भारतीय पर्यटकांना अपरिचितच राहिला आहे! पडघम - सांस्कृतिक कामिल पारखे गोव्याच्या कार्निव्हलचे एक संग्रहित छायाचित्र Wed , 12 February 2020 पडघम सांस्कृतिक कार्निव्हल Carnival गोवा Goa किंग मोमो King Momo गोवा कार्निव्हल Goa Carnival कार्निव्हल हा गंमतीदार उत्सव भारतात फक्त गोव्यातच साजरा होतो. या उत्सवाचा प्रमुख असलेला किंग मोमो पणजीमध्ये जनतेसमोर जाहीरनामा वाचून शहरात चार दिवसांचा आपला अंमल जारी करतो आणि सर्वांना आपापल्या हौसमजा पूर्ण करून घेण्याची परवानगी वा आज्ञा देतो. थोडक्यात ‘खाओ, फिरो, मजा करो’ असाच या किंग मोमोचा हुकूम असतो. त्याची जनताही या औटघटकेच्या राजाची आज्ञा (मुकाट्याने नव्हे तर) अगदी आनंदाने, हसत-खेळत पाळते. ख्रिस्ती धर्मातील चाळीस दिवसांच्या उपवासकाळाच्या म्हणजे लेंट सिझनच्या चार दिवस आधी कार्निव्हल या उत्सवाची सुरुवात होते. फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीस येणाऱ्या भस्म बुधवार वा अॅश वेन्सडे या दिवसापासून हा उपवासकाळ सुरू होतो आणि येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरील मरणाच्या दिवसापर्यंत म्हणजे गुड फ्रायडेला त्याची समाप्ती हो...
पत्रकारितेचा श्रीगणेशा
- Get link
- X
- Other Apps
सर, आर यु एम्प्टी नाऊ ?" माझ्या या प्रश्नावर गोव्यातील मिरामारच्या धेम्पे कॉलेजमधील त्या स्टाफ रुममध्ये एकदम शांतता पसरली. एकदोन महिला शिक्षकांनी टेबलावरील आपली पुस्तके उचलून ताबडतोब दाराकडे वाटचाल केली. बाकीच्यांनी आपसातील संभाषण थांबवून क्षणभर माझ्याकडे रोखून पाहून लगेचच माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचे दाखवत समोरचे वृत्तपत्र चाळण्यास सुरुवात केली. ज्यांना मी हा प्रश्न विचारला ते प्राध्यापक अफ़ॉन्सो तसे ज्येष्ठ शिक्षक असल्याने स्टाफ रूममधील कुणीही या प्रश्नावर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे टाळले होते. प्राध्यापक अफ़ॉन्सो यांनी मात्र प्रसंगावधान राखत त्यांना मी विचारलेला हा अवघड प्रश्न अगदी कुशलतेने हाताळला होता. ''यस जॉन, आय एम फ्री नाऊ... टेल मी, व्हाट डू यु वॉन्ट ?" त्यांनी लगेचच मला प्रतिसाद दिला होता. त्यांच्या त्या उत्तराने कॉलेजच्या त्या स्टाफ रुममध्ये माझ्या प्रश्नानंतर एकदम सन्नाटा का पसरला होता हे मला लगेच कळाले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्या स्टाफ रुममधील उपप्राचार्य आणि रसायनशास्त्राचे विभागप्रमुख साखरदांडे सर, इंग्रजीच्या शिक...