Posts

Showing posts with the label New Conquest
Image
  गोव्यात आणि दमण, दीव, दादरा नगर हवेली या भारताच्या इतर प्रदेशांत पोर्तुगालची तब्बल साडेचारशे वर्षे सत्ता होती. यापैकी बहुतांश काळात या प्रदेशातील नागरिकांना पोर्तुगालच्या नागरिकांप्रमाणे पोर्तुगाल संसदेत निवडून येण्याचे अधिकार आणि हक्क होते. इंग्लंडमध्ये लोकशाहीची जुनी परंपरा आहे, लोकशाहीसाठी तिथल्या लोकांनी फार मोठी किंमत चुकती केली आहे. मात्र याच इंग्लंडने आपल्या साम्राज्यातील वसाहती देशांतील लोकांना मात्र या लोकशाही पद्धतीतील अधिकार आणि हक्क बहाल कधीही केले नव्हते. याउलट इंग्लंडच्या तुलनेत दीर्घ काळ एकाधिकारशाही अनुभवलेल्या पोर्तुगालने मात्र आपल्या साम्राज्यातील सर्व वसाहती देशांतील नागरिकांना पोर्तुगीज नागरिकांसारखे सर्व अधिकार आणि हक्क प्रदान केले होते. पोर्तुगीज नागरिकांप्रमाणे पोर्तुगालच्या सर्व वसाहतीमध्ये स्थलांतर करण्याचे अधिकार आणि हक्क गोवा, दमण आणि दीव दादरा, नगर हवेली यासारख्या इतर सर्व पोर्तुगीज वसाहतीतील लोकांनाही होते. यामुळेच पोर्तुगीज राजवटीच्या साडेचारशे वर्षांच्या कालावधीत पोर्तुगीज इंडियातील अनेक लोकांनी मोझाम्बिक, अंगोला वगैरे पोर्तुगीज वसाहतीत मोठ्या स...