Posts

Showing posts with the label Black Panther
Image
  दलित पॅन्थर, नामदेव ढसाळ, नारायण आठवले गोव्यातील कॉलेजशिक्षणाचा आणि नंतर बातमीदाराच्या नोकरीचा काळ संपवून ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस मी महाराष्ट्रात परतलो, औरंगाबादला `लोकमत टाइम्स'ला रुजू झालो तेव्हा राज्यातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांपासून आणि राजकारणापासून आपण फार काळ दूर राहिलो होतो याची जाणीव झाली . औरंगाबाद शहरात आणि मराठवाड्याच्या अनेक भागांत त्याकाळात `भारतीय दलित पॅन्थर' असे फलक दिसत. हे नाव वाचून कुतूहल आणि जिज्ञासा निर्माण झाली.    फार पूर्वी मी श्रीरामपूरला शाळेत असताना सत्तरच्या दशकात दलित पँथरची स्थापना झाली होती, मुंबईतील त्याकाळातल्या दंगली आणि अशांत सामाजिक परिस्थिती याविषयी अंधुक आठवत होतं, मात्र इनमिन अडीच वर्षे मात्र खळबळजनक आयुष्य लाभलेल्या या संघटनेविषयी फार माहिती नव्हती.    अशा प्रकारची फलके त्या संघटनांचं त्यात्या परिसरातलं अस्तित्व आणि ताकद दाखवून देत असतात. आपल्या परिसरात स्वतःच्या वाढदिवसानिमित्त फ्लेक्स उभारून काय पडसाद उमटतात याचा अनुभव घ्या म्हणजे मी काय म्हणतो आहे हे कळेल. अशी फलके उभारणं म्हणजेच प्रस्थापित घटकांवि...
Image
  हा आफ्रिकन किंवा ब्लँक नेटिव्हिटीचा फोटो आहे. लाकडावर कोरलेले हे ब्लॅक नेटिव्हिटीचे शिल्प अनेक वर्षांपासून माझ्याकडे आहे. नेटिव्हिटी किंवा Nativity of Jesus म्हणजे ख्रिसमस किंवा नाताळ. या शिल्पात ख्रिसमसला सजवतात त्या क्रिब ( crib) किंवा गव्हाणीत जी मुख्य पात्रे असतात ती सर्व या शिल्पात आहेत. फरक इतकाच कि नेहेमीच्या ख्रिसमसच्या चित्रात जसे गोरेेगोरेपान, लालचुटुक ओठाचे बेबी जिझस, तितक्याच गौरवर्णाचे मदर मेरी, सेंट जोसेफ आणि आकाशातले देवदूत असतात तसे या चित्रात नाही. या शिल्पातला बाळ येशू, त्याची आई मारिया, सेंट जोसेफ आणि देवदूतसुद्धा चक्क घनदाट कुरळे केस असणारे काळे म्हणजे आफ्रिकन आहेत ! म्हणूनच मी या शिल्पासाठी `ब्लॅक नेटिव्हिटी' हा शब्द वापरला आहे. जसे आपल्याकडे मदर मेरीला साडीत आणि योसेफला धोतर आणि कांबळींसह दाखवतात अगदी तस्सेच येशू ख्रिस्ताचा जन्म इस्राएलमध्ये झाला, त्याअर्थाने तो आशियाई, मात्र संपूर्ण जगभर येशू आणि त्याच्या जीवनातील प्रसंग चित्रांत आणि शिल्पांत रेखाटले जातात ते पाश्चिमात्य लोकांप्रमाणे. याचे कारण म्हणजे हे चित्रे आणि शिल्पे साकारणारे लिओनार्दो द व्हि...