साधारणतः १९८२चा काळ. गोव्यात पणजीतल्या The Navhind Times (‘नवहिंद टाइम्स’) चा ‘कॅम्पस रिपोर्टर’ म्हणून मी नुकतीच सुरुवात केली होती. पणजीतले धेम्पे आर्टस् आणि सायन्स कॉलेज, डेम्पो कॉमर्स कॉलेज, बांबोळीचे गोवा मेडिकल कॉलेज, फार्मागुडीचे सरकारी गोवा इंजिनियरिंग कॉलेज, मडगावचे दामोदर कॉमर्स कॉलेज, म्हापशाचे डीएमसी आणि वॉस्कोचे एमईएस कॉलेज, अशी काही मोजकीच पदवी आणि व्यावसायिक महाविद्यालये तेव्हा गोव्यात होती. आठवड्यातून या प्रत्येक महाविद्यालयात जाऊन गरजेनुसार तेथील प्राचार्यांना, काही शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, विद्यार्थी आणि शिक्षक संघटनांच्या नेत्यांना भेटून शिक्षणक्षेत्रातील बातम्या दररोज किंवा ‘कॅम्पस रिपोर्टर’ या प्रत्येक सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक सदरात द्यायच्या, हा माझा नेहमीचा शिरस्ता होता. त्याशिवाय नोकरी करत असतानाच मी एम.ए.च्या तत्त्वज्ञान विषयाचा विद्यार्थी म्हणून नियमितपणे लेक्चर्सला हजर राहत असे. त्या वेळी मुंबई विद्यापिठाचे पदव्युत्तर केंद्र पणजीतल्या १८वा जून रोडवरील सुशिला बिल्डिंगमध्ये होते. गोवा विद्यापीठाची स्थापना होण्यास अजून अवकाश होता. या पोस्ट-ग्र...
Posts
Showing posts from 2026
- Get link
- X
- Other Apps
पुणे ख्रिस्ती साहित्य संघाच्या शुक्रवारी २४ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या मासिक बैठकीत रेव्हरंड सुभाष चांदोरीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. चांदोरीकर यांचे प्रदीर्घ आजाराने शुक्रवारी सकाळी वयाच्या ७३व्या वर्षी निधन झाले होते. या प्रसंगी बोलताना रेव्हरंड डॉ. अजितकुमार फरांदे यांनी चांदोरीकरांच्या आगळ्यावेगळ्या धर्मकार्याची, शब्दसेवेची आणि सामाजिक कार्याची प्रशंसा केली. पुण्यातील भैरोबा नालाशेजारी असलेल्या युनायटेड थिऑलॉजिकल सेमिनरी ऑफ महाराष्ट्र (यू.टी.एस.एम.) येथे अनेक वर्षे प्राध्यापक असलेल्या चांदोरीकरांनी आपल्या धार्मिक कार्याचाच एक भाग म्हणून समाजाच्या विविध दुर्लक्षित घटकांसाठी विशेषतः पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्यांसाठी समाजकार्य केले असे ते म्हणाले. चांदोरीकर एक विलक्षण व्यक्तिमत्त्व, समर्पित विद्वान आणि देवाचे विश्वासू सेवक होते असे फरांदे म्हणाले. ``प्राध्यापक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये ईशज्ञानाची आवड आणि बौद्धिक प्रामाणिकता रुजवली. तसेच एक धर्मगुरू म्हणून त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञान आणि करुणेने मार्गदर्शन केले. त्यांचे जीवन हे श्रद्धा आणि तर्क यांच्या सु...
- Get link
- X
- Other Apps
Mother Mary Comes To Me दोन दिवसांपूर्वी वाचून हातावेगळे केले. बुकर प्राईझ विजेत्या आणि भारतातल्या एक आघाडीच्या `लेखिका आणि कार्यकर्त्या' अरुंधती रॉय यांचे हे आत्मचरित्रावजा हार्ड बाऊंड पुस्तक बुक फेस्टिव्हलमध्ये डिसेंबरात विकत घेतले होते. अनेक आणि भरपूर (आणि स्वस्तातली) जाडजूड पुस्तके मी त्या बुक फेस्टिव्हलमध्ये घेतली. त्यासाठी जवळजवळ आठवडाभर दररोज काही तास मी पाय तुडवत अनेक स्टॉल्स पालथी घातली होती. आता ही पुस्तके कधी वाचून होतील ते देव जाणे. सर्वात आधी नारायण विष्णू जोशी यांचे 'पुणे शहरचे वर्णन' (प्रकाशन वर्ष १८६६ !) हे पुस्तक जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत माझ्या चालू असलेल्या संशोधन कामामुळे सर्वात आधी वाचून काढले आणि त्यावर येथे लिहिलेसुद्धा. वर उल्लेख केल्याप्रमाणे अरुंधती रॉय यांची अनेकदा Writer-Activist अशी ओळख दिली जायची, तेव्हा हा शब्दप्रयोग त्यांना विचित्र वाटायचा. म्हणजे `पिवळा पिंताम्बर' या शब्दासारखी पुनरुक्ती आहे असे त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे. To me, `writer-activist' sounded like a sofa-bed', असे त्यांनी लिहिले आहे. Mo...