Posts

Showing posts with the label Vasai
Image
ग. दि. माडगूळकर   गेली अनेक वर्षे पुणे मुंबई महामार्ग माझ्या रोजच्या वहिवाटीचा रस्ता राहिलेला आहे. वाकडेवाडी येथे सिटी बस स्टॉपवर उतरले की मग रस्ता ओलांडून आधी फर्ग्युसन कॉलेज रोडवरच्या `टाइम्स ऑफ इंडिया' आणि त्यानंतर `साखर संकुल'पाशी असलेल्या `सकाळ टाइम्स' या माझ्या कार्यालयाची वाट धरायची हा माझा नेहमीचा शिरस्ता. रस्ता ओलांडला की माझी नजर आपसूक तिथल्या बैठ्या प्रशस्त कौलारु घराकडे जायची, आजही जाते. मी कितीही घाईत असलो, अगदी घड्याळाच्या काट्याशी शर्यत चालू असली तरी एक नजर त्या वास्तूकडे जातेच. सावकाश चालत असलो तर मग त्या बंगलीच्या आजूबाजूच्या जागांकडे नीट पहिले जाते, बंद दारे आणि खिडक्या, कौलांवर साचलेली झाडांची सुकलेली पाने, पार्किंगमधली वाहने याकडे नीट लक्ष जाते. यापैकी कधीही न चुकता पाहिली जाणारी गोष्ट म्हणजे वास्तूचा `पंचवटी' हा नामफलक आणि तिथे अगदी प्रथमदर्शनी असणारा तो छोटासा नीलफलक आणि त्यावरची ती अक्षरे.   '' पुणे ऐतिहासिक वास्तू स्मृती - `गीतरामायण'कार ग. दि. माडगूळकर (१९१९-१९७७) येथे राहत होते (१९५३-१९७७). ''   खूप वर्षांपूर्वी एकद...

महाबळेश्वरचे होली क्रॉस चर्च

Image
                                                                  महाबळेश्वरचे होली क्रॉस चर्च    महाबळेश्वरला तुम्ही कधी भेट दिली असेल तर या पर्यटक स्थळाच्या मुख्य बाजारपेठेत अगदी मध्यवर्ती ठिकाणी असलेले एक छोटेसे टुमदार बंगलीवजा बांधकाम तुम्ही नक्कीच पाहिले असणार. गेटपाशीच मदर मेरीचा डोंगर म्हणजे ग्रोटो आहे आणि बंगलीच्या शिखरवजा टोकावर क्रूस आहे. यावरुन हे एक कॅथोलिक चर्च आहे हे माहितगार व्यक्तीला लगेच कळते. महाबळेश्वर एसटी बसडेपोपासून एक मिनिटाच्या अंतरावर आणि टुरिस्ट टॅक्सींच्या वाहनतळापाशी हे महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि अनेक कारणांनी आगळेवेगळे असलेले असलेले होली क्रॉस चर्च आहे. मुंबई आणि वसई परीसर वगळता उर्वरित महाराष्ट्रातील हे सर्वात जुने कॅथोलिक चर्च आहे. ब्रिटिश अमदानीत 1831 साली या चर्चची स्थापना झाली होती. जुन्या वास्तुशास्त्राच्या धर्तीवर बांधलेले हे ...
Image
  ‘टिपंवणी’ : सामाजिक इतिहासाचा आणि धार्मिक, सांस्कृतिक स्थित्यंतराचा ऐवज ग्रंथनामा  - वाचणारा लिहितो कामिल पारखे पालघर जिल्ह्यातील वसई हे माझे एक आवडते सुट्टीचे ठिकाण. वर्षांतून किमान दोन-तीन दिवस माझा तेथे मुक्काम असतोच. याचे एक कारण म्हणजे माझ्याशी अत्यंत जवळचे, स्नेहाचे संबंध असलेली कुटुंबे तेथे आहेत. आणि दुसरे कारण म्हणजे वसईचे गोव्याशी अनेक बाबतीत असलेले साम्य. या दोन्ही किनारपट्टीवरील प्रदेशांमध्ये एकेकाळी पोर्तुगीजांच्या वसाहती होत्या. वसईतली नारळांची झाडे, अनेक गावांत अजूनही राहिलेली हिरवाई, फळझाडे आणि फुलझाडांमध्ये असलेली टुमदार घरे, अरुंद रस्त्यांच्या चौकाचौकांत असलेले क्रूस आणि या क्रुसांसमोर दररोज संध्याकाळी तेवणाऱ्या मेणबत्त्या, बाजारांत आणि रस्त्यांवर विक्रीला असलेली मासळी, यामुळे आपण क्षणभर गोव्यातच आहोत, असे मला अनेकदा वाटते. गोव्याचे आणि वसईचे ख्रिस्ती लोक यांच्या संस्कृतीतही खूप साम्य आहे. सिसिलिया कार्व्हालो यांचे ‘टिपंवणी’ हे आत्मचरित्र वाचताना वसईच्या या आगळ्यावेगळ्या समाजजीवनात खोलवर डोकावण्याचा अनुभव आला. कार्व्हालो या मराठी साहित्यक्षेत्रात एक कवयित्री...

‘निरोप्या’चे संपादक फादर प्रभुधर

Image
‘निरोप्या’चे संपादक फादर प्रभुधर   October 12, 2020     lokmarathi  Camil parkhe   October 12, 2020     lokmarathi  Camil parkhe कामिल पारखे रविवारची मिस्सा संपल्यावर मी माझ्या वडिलांचे बोट धरून चर्चच्या समोरील मोकळ्या जागेत उभा होतो. देवळातून बाहेर पडणारे लोक आपसांत बोलत उभे होते. श्रीरामपूरला अलिकडेच बदली होऊन आलेले ते तरुण धर्मगुरू घोळक्याने उभे असलेल्या लोकांशी बोलत होते. फादर प्रभुधर यांचे व्यक्तिमत्व अगदी देखणे असेच होते. वक्तृत्व शैलीची देणगी लाभलेल्या फादरांच्या ओघवत्या उपदेशांनी लोक प्रभावित होत असत. भरपूर उंचीचे फादर आपल्या पांढऱ्या झग्यात फिरत होते, तसे त्यांना ‘जय ख्रिस्त’ म्हणून अभिवादन करण्यासाठी लोक त्यांच्याकडे वळत होते. आमच्याकडेही ते आले आणि माझ्या वडिलांशी – दादांशी – बोलू लागले. बोलत असताना मध्येच थांबून माझ्याकडे पाहत त्यांनी विचारले, “पारखे टेलर, तुम्हाला किती मुले आहेत? आणि त्यांच्यामध्ये याचा नंबर कितवा?” माझ्या वडिलांचे श्रीरामपुरात मुख्य बाजारपेठेत सोनार लेनमध्ये ‘पारखे टेलर्स’ हे टेलरिंगचे दुकान होते. शहरातील दोन-तीन प्र...