Posts

Showing posts with the label Bikram Vohra
Image
प्रिन्स चार्ल्स आणि डायना स्पेन्सर यांचे लग्न   गोव्यातील वृत्तपत्रात लंडनच्या शाही लग्नाचे फोटो मिळविण्यासाठी २९ जुलै १९८१ला आम्ही केलेला हा आटापिटा. प्रिन्स चार्ल्स आणि डायना स्पेन्सर यांचे लग्न ठरले, तेव्हाच ते विसाव्या शतकातील सर्वांत मोठे शाही, सेलेब्रिटी लग्न असेल असे म्हटले जात असे. ब्रिटिश राजघराणे , ब्रिटिश पर्यटन खाते आणि संपूर्ण जगभरातील प्रसारमाध्यमांतून या होणाऱ्या विवाहाविषयी प्रचंड गाजावाजा केला गेला. त्यात तसे वावगे असे काहीही नव्हते.    यापूर्वी म्हणजे तीन दशकांपूर्वी १९४७ला राणी एलिझाबेथ व्दितीय यांचा स्वतःचा विवाह झाला तेव्हा ग्रेट ब्रिटन हे जगातले एक प्रमुख राष्ट्र असले तरी प्रसारमाध्यमांचे क्षेत्र आताइतके जनसामान्यांपर्यंत पोहोचले नव्हते.    मात्र १९८०च्या सुरुवातीच्या काळात प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांची एंगेजमेंज वा साखरपुडा झाला तेव्हा रेडिओ सामान्य माणसांपर्यंत पोहोचला होता, वृत्तपत्रे शहरांत आणि खेड्यापाड्यांत जाऊ लागली होती आणि ब्लँक अँड व्हाईट टेलिव्हिजनचे भारताच्या काही प्रमुख शहरांत आगमन झाले होते.    एके काळी ब्र...

Journalism Stories waiting to be told

Image
  Covering Goa since 1963 Wednesday, March 10, 2021 GOA NEWS OPINION NATIONAL NEWS SPORTS WORLD NEWS BUSINESS MAGAZINES Home     Magazines     Panorama     Sto ries waiting to be told Magazines Panorama Stories waiting to be told By   NT Desk  - 2020-09-06 0 683 Why don’t journalists tell their stories, beyond the news they report on? One would suspect that they would have many stories waiting to be told Frederick Noronha In pandemic times, many of us have been trapped for longer periods at home. So, reading and reminiscing comes almost naturally. Some don’t like too much of this happening online. But, to me, going down memory lane is also a way of understanding our recent history. Some journalist colleagues have been giving us a ringside view to understanding people and events, issues and trends within a Goa of recent times. For instance, Camil Parkhe, a journalist who worked in The Navhind Times in the 1980s and early 1990s, has been doing ...

पत्रकारांच्या आयुष्यात ‘स्कूप’ अचानक व क्वचितच येतात. पण त्यामुळे ती घटना अविस्मरणीय होऊन जाते!

Image
मांडवीच्या काठावरचा गोव्यातील तो ऐतिहासिक फोटो दै. द नवहिंद टाइम्स, १० ऑगस्ट १९८४मधील लाठीमाराचे छायाचित्र Sat , 27 June 2020 पडघम माध्यमनामा द नवहिंद टाइम्स The Navhind Times गोवा Goa लाठीमार Lathicharch त्या दिवशी सकाळी पणजीतल्या सचिवालयापाशी आणि आजूबाजूला  कडक बंदोबस्त होता. त्या काळात म्हणजे १९८०च्या दशकात मांडवी नदीच्या तीरावर असलेल्या सोळाव्या शतकातील आदिलशहा पॅलेस गोवामुक्तीनंतर सचिवालय म्हणून वापरात होता. गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री, त्यांचे पाच-सहा सहकारी मंत्री आणि सर्व ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचे ते कार्यालय होते. असे असले तरी तेथील सुरक्षा व्यवस्था त्या काळात अगदी किरकोळ असायची. म्हणजे मुख्यमंत्री, मंत्री आणि ज्येष्ठ सरकारी येता-जाताना तेथे असलेले चार-सहा बंधूकधारी सुरक्षारक्षक त्यांना खाडकन मानवंदना देत असत. बाकी वेळेस सामान्य लोकांची ये-जा होत असताना कुणाचीही साधी चौकशी व तपासणी होत नसायची. हा, गोवा विधानसभेचे अधिवेशन चालू असताना थोडी कडक सुरक्षाव्यवस्था असायची. मात्र ९ ऑगस्ट १९८४ रोजी अधिवेशन नसतानाही सचिवालयापाशी असल...

एकच बातमी दोनदा छापण्याची गोष्ट Kiran Bedi

Image
गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१८ एकच बातमी दोनदा छापण्याची गोष्ट सोमवार , ३० जुलै, २०१८    goo.gl/U5VdQx   कामिल पारखे एकदा छापलेली बातमी तशीच्या तशी पुन्हा छापायची नाही असा संकेत आहे. मात्र, आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या विनंतीमुळे तो कसा बाजूला ठेवला गेला याची ही गोष्ट. किरण बेदी यांची दिल्लीहून गोव्याला बदली झाली तेव्हा त्या ज्युनियर पोलीस अधिकारी होत्या. गोवा, दमण आणि दीव हा केंद्रशासित प्रदेश त्यावेळी दमण आणि दीव यांच्यासह बारा तालुके असलेला एकच जिल्हा होता. त्यामुळे तेव्हा एकच जिल्हाधिकारी आणि एकच जिल्हा पोलिस अधीक्षक असे.  बेदी या वाहतूक खात्याच्या उपअधीक्षक म्हणून रुजू झाल्या होत्या. ही घटना आहे मार्च १९८३ सालची. दोनच वर्षांपूर्वी  'नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकाचा बातमीदार या पदावर मी रूजू झालो होतो. माझ्यासह आमच्या दैनिकात केवळ तीनच बातमीदार होते. आणि त्यामुळे ज्युनियर असल्याने माझ्याकडे असलेल्या अनेक बिट्समध्ये क्राईमचाही समावेश होता. बेदी ज्युनियर असल्या तरी त्यांच्याभोवती तेव्हाच एका वलय निर्माण झाले होते. इंडियन पोलीस सर्व्हि...