Posts

Showing posts with the label Congress grass

दुष्काळाच्या झळा, पण ७०च्या दशकातल्या!

Image
दुष्काळाच्या झळा, पण ७०च्या दशकातल्या!  https://www.aksharnama.com/client/article_detail/3283?fbclid=IwAR2QMekqS0B4VFkhimMu_Bp0CSRuNC3pEQa-bY7QCz3E2B7-6WkRfR4Xxps पडघम  - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र) कामिल पारखे प्रातिनिधिक चित्र Wed , 15 May 2019 पडघम कोमविप दुष्काळ Drought मिलो Milo १९७०च्या दशकाच्या सुरुवातीच्या काही वर्षांत देशातील अनेक राज्ये कडक दुष्काळाने पोळून निघाली होती. हरित क्रांतीची फळे तोपर्यंत देशातील जनतेने चाखली नव्हती. सलग दोन वर्षे पुरेसा पाऊस न पडल्याने महाराष्ट्रातील अनेक भागांत भयाण परिस्थिती निर्माण झाली होती. मी त्या वेळी माध्यमिक शाळेत शिकत होतो. बहुधा १९७२ किंवा १९७३ असावे. दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य सरकारने शाळांच्या वार्षिक परीक्षा मार्चआधीच घेण्याचे आदेश दिले होते, हे स्पष्ट आठवते. यावरून दुष्काळाच्या तीव्रतेची कल्पना यावी.  त्यावेळी आम्ही राहायचो त्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात पाण्याची टंचाई नसायची. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरील अकोले तालुक्यातील भंडारदरा धर...