Posts

Showing posts with the label Nanasaheb Goray
Image
 पुण्याने राष्ट्रपातळीवर केलेले  नेतृत्व  पुण्यात इंडियन एक्सप्रेसला मी १९८९ ला जॉईन झालो तेव्हा पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या एका वादळी चर्चेला मी हजर होतो. विषय होता एरंडवणे परिसरातल्या सर्व्हे नंबर ४४ मध्ये टेकडीवर बांधकामास परवानगी देण्याबाबत. या प्रस्तावाला विरोध करत सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्याच नगरसेविका वंदना चव्हाण यांनी अत्यंत आक्रमकतेतेने हा विषय लावून धरला होता.  इंडियन एक्सप्रेसचे पुणे निवासी संपादक प्रकाश कर्दळे यांच्यासह आम्ही इतर काही बातमीदार या सभेला उपस्थित असण्याचे कारण म्हणजे इंडियन एक्सप्रेस फोरमने हा पर्यावरणाचा विषय हाती घेतला होता. पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला हजर राहण्याची ही माझी पहिली आणि एकमेव वेळ.  राज्यपातळीवर, देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या स्थानिक संस्थेच्या सदस्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि कारभाऱ्यांनी नेतृत्व केले आहे हे नंतर माझ्या लक्षात आले.  डॉ मं पा मंगुडकर यांनी पुणे महापालिकेच्या शंभराव्या वर्धापनानिमित्त संपादित केलेल्या स्मरणिकेत या संस्थेच्या आणि पुणे शहराच्या इतिहासाचा मागोवा घेतला ...
Image
  पंडित नेहरु आणि गोवा .... ``गोवा के लोक अजीब है'' ( मांडवीतून बोटीने पणजीत आलेल्या पंतप्रधान पंडित नेहरुंचा हा दुर्मिळ फोटो. पंडितजींनी गोव्याला २२ मे १९६३ रोजी पहिल्यांदाच भेट दिली. ) `` पोर्तुगीजांची वसाहत असणाऱ्या गोव्याच्या मुक्तीसाठी १९५५ साली गोव्यात आपला ऐतिहासिक सत्याग्रह करण्यापूर्वी समाजवादी नेते श्री. ना. ग. उर्फ नानासाहेब गोरे यांनी त्यावेळच्या गोव्यातील पोर्तुगीज गव्हर्नर जनरलला एक पत्र लिहिले होते. गोव्यात सत्याग्रह करण्यामागील आपली भूमिका त्यांनी या पत्रात स्पष्ट केली होती. `आमच्या या कृतीने तुमची सत्ता मोडेल असे मानण्याचे अतिरेकी धाडस आम्ही करत नाही’ अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली होती पण या वाक्याला जोडूनच त्यांनी लिहिले होते. ``परंतु आमच्या प्रयत्नांचा काहीच परिणाम होणार नाही असे मात्र आम्हाला वाटत नाही. गोव्याच्या लढ्यात आम्ही (गोवेकर सोडून इतर भारतीय) सहभागी केल्यामुळे गोवा आणि भारत यामधील कृत्रिम सरहद्दीच्या दोन्ही बाजूस राहणारे लोक शाश्वत बंधुप्रेमाने एकत्र येतील. शिवाय ज्यांचा भविष्यकाळ सध्या पोर्तुगालच्या हातात आहे. त्यांच्या स्वातंत्र्याची सुप्रभात...