Posts

Showing posts with the label Kiran Thakur

पंतप्रधान राजीव गांधींची निवडणुक प्रचारसभा त्या बातमीबद्दल त्या वेळी मला वाटलेली शरम अजूनही गेलेली नाही!

Image
त्या बातमीबद्दल त्या वेळी मला वाटलेली शरम अजूनही गेलेली नाही ! पंतप्रधान राजीव गांधींची निवडणुक प्रचारसभा   पडघम  - माध्यमनामा कामिल पारखे माजी पंतप्रधान राजीव गांधी Thu , 21 May 2020 पडघम माध्यमनामा राजीव गांधी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त हा विशेष लेख... ............. पत्रकार या नात्याने पंतप्रधानपदी असलेल्या, माजी पंतप्रधान असलेल्या वा भविष्यात या महत्त्वाच्या घटनात्मक पदावर आलेल्या काही राजकीय नेत्यांना खूप जवळून पाहण्याची, भेटण्याची, त्यापैकी काहींशी बोलण्याची आणि हस्तांदोलन करण्याचीही संधी  मला मिळाली. इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, पी. व्ही. नरसिंह राव, राजीव  गांधी, विश्वनाथ प्रताप सिंग आणि चंद्रशेखर या नेत्यांना याच क्रमानुसार मी जवळून पाहिले वा त्यांना भेटलो. टेलिव्हिजनवर या नेत्यांना वा इतर कुणाला पाहणे आणि प्रत्यक्षात जवळून पाहणे यात खूप खूप अंतर असते. एखाद्या कसलेल्या कॅमेरामॅनने आपल्या कॅमेऱ्याने क्लोज अप आणि वाईड अँगलने एखाद्या व्यक्तीच्या कितीही हालचाली ...