Posts

Showing posts with the label Nashik
Image
  दोनशेचौदा वर्षांपूर्वी अमेरिकेतून दोन स्वतंत्र जहाजांनी काही प्रवाशी भारताच्या दिशेने एका आगळ्यावेगळ्या कामगिरीवर निघाले होते. गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट आणि त्यांच्या पत्नी रॉक्सना नॉट ११ फेब्रुवारी १८१३ रोजी मुंबई बंदरात पोहोचले आणि १२ तारखेला ते किनाऱ्यावर उतरले. सॅम्युएल न्यूवेल ७ मार्च १८१४ रोजी मुंबईत त्यांना सामिल झाले. या मिशनरींच्या आगमनाने भारतात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. या मिशनरींनी देशात आधुनिक शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारीक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. स्त्री-पुरुष असा लिंगभेद न करता, जात-धर्म म्हणजे उच्च जाती, शूद्र, अतिशूद्र किंवा अस्पृश्य असा विचार न करता शिक्षणाची कवाडे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वांना उघडी केली होती आणि अशाप्रकारे आधुनिक सार्वत्रिक शिक्षणपद्धतीचा पाया रचला केला. आजही गॉर्डन हॉल हे नाव तसे फारसे परिचित नाही. आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान असणाऱ्या गॉर्डन हॉल या महान व्यक्तीची इतिहास संशोधकांनी मुळी दखलच घेतलेली नाही. बुधवार ८ एप्रिल रोजी गॉर्डन हॉल यांची जयंती आहे. जडसन आणि सॅम्युएल न्यूवेल हे ९ फेब्रुवारी १८१...
Image
  फार जुनी परंपरा असलेली दोन साहित्य संमेलने यंदा २०२६च्या आरंभालाच लागोपाठ होणार आहेत. मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात तर त्या पाठोपाठ शंभर वर्षांची परंपरा असलेले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन नाशिकला सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. विशेष म्हणजे एक शतकापूर्वी नाशिकलाच पहिले ख्रिस्ती साहित्य संमेलन भरले होते. मराठी साहित्य संमेलनांपासून वेगळे अस्तित्व मांडणारी ही पहिली भुमिका होती. पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन १८ आणि १९ एप्रिल १९२७ रोजी नाशिकमध्ये शरणपुरातल्या चर्च मिशनरी सोसायटीच्या मराठी शाळेत येथे पार पडले. आणि या संमेलनाचे अध्यक्ष होते `पुण्यनगरीचे मुनी' निकल मॅक्निकल. रेव्हरंड डॉ. निकल मॅक्निकल हे चर्च ऑफ स्कॉटलंडचे मिशनरी होते. डॉ. अनुपमा निरंजन उजगरे यांनी आपल्या `मराठी ख्रिस्ती वाङमयाचा इतिहास १८१०-१९२७ ‘’ या संपादित पुस्तकात लिहिले आहे कि मराठी आणि संस्कृत या भारतीय भाषांचा निकल मॅक्निकल यांचा दांडगा व्यासंग होता. महाराष्ट्रीय संत ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, एकनाथ त्यांच्या व्याख्यानांचे विषय होते. मॅक्निकल यांचे वास्तव्य पुण्यात असल्याने त्यांन...
Image
  पुढील नूतन वर्षारंभात सातारा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि नाशिक येथे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने होत आहेत. या निमित्ताने दोन्ही संमेलनांचे आयोजक लगीनघाईत असताना यानिमित्ताने गेल्या पंचवीस वर्षांत झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांच्या आणि स्वागताध्यक्षांच्या भाषणांचे मी संकलन करत आहे. मराठी `ग्रंथकारांच्या' संमेलनाबाबत पहिला विद्रोही सूर लावला होता तो महात्मा जोतिबा फुले यांनी. त्यावेळी नगरच्या अमेरिकन मराठी मिशनच्या `ज्ञानोदय' मासिकात प्रसिद्ध झालेले 'घालमोड्या दादां'ना उद्देशून लिहिलेले त्यांचे पत्र आता सर्वांना माहित आहेच. या साहित्य संमेलनापासून पहिली वेगळी चूल मांडण्याचे धाडस ख्रिस्ती साहित्य संमेलनाने १९२७ साली झालेल्या नाशिकच्या संमेलनाद्वारे केले. या १९२७ पासून सुरु झालेल्या ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांच्या भाषणांचे दस्तऐवजीकरण २००१ सालच्या संमेलनापर्यंत सुनील आढाव यांनी केले आहे. त्यानंतरच्या संमेलनाध्यक्षीय भाषणांचे संकलन आता मी करत आहे. माझा हा प्रकल्प आता शेवटच्या टप्प्यात असताना दरम्यान त्यावेळचे महाराष्ट...
Image
'गांधीहत्या आणि   'माथेफिरु' नथुराम गोडसे गोव्यात पणजी येथे मिरामार समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या धेम्पे कॉलेजात माझे पदवीचे आणि पदव्युत्तर शिक्षण झाले आणि माझा मुख्य विषय होता तत्त्वज्ञान. त्यात एक वर्षी फिलॉसॉफी ऑफ रिलीजन म्हणजे चक्क 'विविध धर्मांचे तत्त्वज्ञान" हा एक विषय होता. श्रीरामपूरला दहावीपर्यंत मराठी भाषेत शिकून येसुसंघिय फादर होण्यासाठी सत्तरच्या दशकात मी गोव्यात आलो होतो. कौटुंबिक पार्श्वभूमी कॅथोलिक धार्मिक अशी होती, नाही तर जीवनभर संन्याशी धर्मगुरु होण्याचा कुणी विचारही केला नसता. मँगोलोरियन कॅथोलिक कुटुंबातून आलेले समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस हेसुध्दा शालेय शिक्षणानंतर असेच फादर होण्यासाठी सेमिनिरीत दाखल झाले होते. पदवीला मी तत्त्वज्ञान हा विषय घेण्याचे एक कारण म्हणजे धर्मगुरु होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तत्वज्ञान आणि ईशज्ञान ( थिऑलोजी ) या विषयांचा अभ्यास करावा लागतोच, नाहीतर फॉर्मेशन टप्प्यालाच गच्छंती होते. धर्मगुरु होण्यासाठी किमान तेव्हढी बौद्धिक पातळी आवश्यक आहे असे जेसुईट संस्था मानते. माझ्या आसपासचे काही जेसुईटस शिक्षण तज्ज्ञ होते काही...