Posts

Showing posts from October, 2021
Image
जातीव्यवस्था आणि चातुर्वर्ण्य हे भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहेत, केवळ हिंदू धर्माचीच ती मक्तेदारी नाही… हे खरं नाही! पडघम  - सांस्कृतिक कामिल पारखे चरणजित सिंग छन्नी, बुटासिंग, बाबा पद्मनजी, रॉबर्ट डी नोबिली, पंडिता रमाबाई, ना. वा. टिळक, अमरिंदर सिंग आणि फादर फ्रान्सिस दीब्रिटो Tue , 12 October 2021 पंजाब Punjab चरणजित सिंग छन्नी Charanjit Singh Channi दलित Dalit ना. वा. टिळक Narayan Waman Tilak अमरिंदर सिंग Amarinder Singh बुटासिंग Buta Singh बाबा पद्मनजी Baba Padamji रॉबर्ट डी नोबिली पंडिता रमाबाई Pandita Ramabai फादर फ्रान्सिस दीब्रिटो Father Francis Dibrito काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये सत्ताबदल झाला. दुसऱ्या दिवशी बहुतेक वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांवरचा मथळा पुढील आशयाचा होता – ‘पंजाबमध्ये पहिल्यांदाच दलित मुख्यमंत्री’. काँग्रेसचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची उचलबांगडी होऊन चरणजित सिंग चन्नी यांची त्या जागी निवड करण्यात आली होती. वस्तुतः कॅप्टन अमरिंदर सिंग आणि चन्नी दोघंही धर्मानं शीख. १९५६ साली पंजाबची निर्मिती झाल्यापासून या राज्यात आतापर्यंत एकदाही बिगर-शीख मु