Posts

Showing posts with the label tea party
Image
  गोपाळराव जोशी .. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास गोपाळराव जोशी हे नाव वगळून पूर्ण होऊच शकत नाही . आधुनिक वैद्यकशास्त्रात पदवी मिळवणाऱ्या डॉक्टर होणाऱ्या हिंदुस्थानातल्या पहिल्या महिला आनंदीबाई जोशी यांचे पती म्हणून गोपाळराव जोशी ओळखले जात असले तरी ही त्यांची पूर्ण ओळख नाही . इतिहासात मात्र   हे पात्र नकारात्मक दृष्टिकोनातून,   त्यांच्या विविध अवगुणांवर   बोट ठेवून रंगवले गेले आहे . एक इरसाल , विक्षिप्त हेकेखोर   व्यक्ती, आपल्या बायकोने शिकावं, डॉकटर व्हावं म्हणून त्यांचा खूप छळ करणारा नवरा , पुण्यातल्या आणि मुंबईतल्या भल्याभल्या लोकांना आपल्या जेरीस आणणारा पण अत्यंत बुद्धिमान असणारा गोपाळराव जोशी अगदी वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व आहे . वर उल्लेख केलेली अनेक स्वभाववैशिष्ट्ये गणपतरावांच्या जीवनातील विविध प्रसंगांतून दिसून येतात . श्री ज. जोशी यांनी आनंदीबाई आणि गोपाळराव जोशी .. यांच्या जीवनांवर लिहिलेली ` आनंदी गोपाळ’ ही कादंबरी बरीच गाजली . मात्र गोपाळराव यांच्या...