Posts

Showing posts with the label Shrirampur
Image
गांधीजी यांच्याइतकी राजमान्यता आणि लोकमान्यता देशात गेली अनेक दशके इतर कुठल्याही व्यक्तीला मिळालेली नाही. गांधींना मानत नसलेली सत्ता आज देशात आणि राज्यात आली तरी त्यात कुठलाही बदल झाला नाही हे तर गांधींची अपरिहार्यता आणि थोरवीच अधोरेखित करते. सत्तरच्या दशकात श्रीरामपूरला आमच्या शाळेत ज्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या होत त्यांत गांधीबाबा होते, पंडित नेहरु होते, टिळक आणि सावरकर होते, भगत सिंगसुद्धा असावेत. टिळक पुण्यतिथीला १ ऑगस्टला हमखास वकृत्व स्पर्धा असायची. शिवाजी महाराजांचा शाळेत फोटो असायचा, मात्र शिवजयंती वगैरे उत्सव साजरे होत नसत. शाहू महाराज, जोतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांचा तर कुठल्याही कार्यक्रमात नावाने उल्लेखसुद्धा नसायचा. सत्तरच्या दशकाच्या अखेरीस आणि ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीस गोव्यात पणजीला पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणात तत्त्वज्ञान माझा खास विषय होता, त्यावेळी टिळकांचे `गीतारहस्य', मानवेंद्र नाथ रॉय आणि गांधीजी भारतीय तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात होते. जोतिबा फुले किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तत्त्वज्ञानाच्या किंवा इतर कुठल्याही शाखांतल्या अभ्यासाचा ...
Image
पॅरीसहून आम्ही रेल्वेने लुर्ड्स\च्या दिशेने निघालो. ग्रामीण फ्रान्सचे या प्रवासातून ओझरते दर्शन घडले..आपल्याकडे असते तशी घनदाट वस्तीची गावे व शहरे या प्रवासात अजिबात दिसली नाही. लुर्ड्स रेल्वेस्टेशनवर उतरलो तेव्हा फ्रान्समधल्या वाटेरवरच्या इतर रेल्वे स्टेशनांपेक्षा मोठ्या संख्येने येथे लोक उतरले होते. कारण स्पष्टच होते, लुर्ड्स हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे एक महत्त्वाचे धार्मिक पर्यटन क्षेत्र आहे. मेरीयन डिव्होशन म्हणजे मदर मेरीच्या भक्तीसाठी जगात काही प्रसिद्ध तिर्थक्षेत्रे आहेत, त्यापैकी लुर्डस हे एक महत्त्वाचे जागतिक धार्मिक स्थळ आहे .. युरोपच्या दौऱ्यावर जॅकलिन आणि आमची मुलगी अदितीसह मी आलो होतो. रेल्वे स्टेशनवर उतरुन टॅक्सीने आम्ही आधीच आरक्षण केलेल्या हॉटेलकडे आलो. हॉटेलची रुम पॅरीसच्या हॉटेलच्या मानाने आधीच ऐसपैस आणि स्वस्त होती. लुर्ड्स शहरात आमच्या या हॉटेलमधल्या वास्तव्यात घडलेली ही घटना येथे सांगायलाच हवी. हॉटेलच्या रिसेप्शन काऊंटरपाशी मी उभा होतो तेव्हा एक महिला तेथे क्लार्कशी बोलत होती, आमच्याप्रमाणे तीही आशियाई देशातील होती हे नक्कीच होते. का कुणास ठाऊक, त्या महिलेने मला ...
Image
एके काळी भारतात आणि जगातील अनेक भागांत ख्रिस्ती धर्मगुरु आणि नन्स विविध क्षेत्रांत सेवाभावी वृत्तीने कार्यरत होते. अव्वल ब्रिटिश अमदानीत तर देशातील अनेक समाजसुधारकांनी ख्रिस्ती मिशनरी लोकांनी सुरु केलेल्या शाळांत शिक्षण घेतले. पुण्यात स्कॉटिश मिशनरी रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या शाळेत शिकलेले जोतिबा फुले हे त्यापैकी एक प्रमुख नाव. एक काळ असा होता की समाजातील अनेक क्षेत्रांतील मोठ्या व्यक्तींनी ख्रिस्ती शाळांत आणि कॉलेजात शिक्षण घेतलेले असायचे. कारण त्यावेळेस भारतात सरकारी शाळानंतर सर्वाधिक मोठ्या संख्येने चालवल्या जाणाऱ्या शाळा ख्रिस्ती संस्थांच्या असत. त्याशिवाय शहरांत आणि ग्रामीण भागांत अनेक छोटेमोठे दवाखाने ख्रिस्ती मिशनरी चालवत असत. येथे आजारी लोकांना नाममात्र खर्चात आरोग्य सेवा मिळायची. त्या काळात शिक्षण क्षेत्रांचे आणि आरोग्य सेवांचे आजच्यासारखे बाजारीकरण किंवा खासगीकरण झालेले नव्हते. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील संत लूक इस्पितळ किंवा शेवगाव येथील नित्य सेवा हॉस्पिटल ही काही वानगीदाखल नावे. या शाळांचा किंवा दवाखान्याचा धर्मांतरासाठी वापर केला जातो असा सर्रा...
Image
  कामिल पारखे' हे नाव कसे आहे? म्हणजे ऐकायला कसे वाटते? आपल्याकडे कुठलेही नाव ऐकल्यावर मनात तत्क्षणी काही तरंग, प्रतिक्रिया उमटतातच. कधी सकारात्मक कधी नकारात्मक .. सुरुवातीलाच सांगतो, कामिल पारखे हे नाव आजच्या गुगल जगातही अगदी आगळेवेगळे आहे, अद्वितीय की काय म्हणतात तसे आहे. काही दिवसांपूर्वी सायबर कॅफेमधल्या एका पोराने मला माझा ईमेल विचारला, मी म्हणालो माझे कामिल पारखे हे नाव आणि Gmail.com. . तर तो म्हणाला, लकी आहात नावाबाबत, आम्हा लोकांना नावासह काही आकडे टाकावे लागते तेव्हा कुठे ईमेल तयार होतो. तेव्हा पुन्हा एकदा माझ्या नावाच्या युनिकपणाची जाणिव झाली. आजही या घडीला या पृथ्वीतलावर `कामिल पारखे' या नावाची दुसरी असामी नाही, आहे की नाही गंमत? काही नावे आणि आडनावे खूपच कॉमन असतात तशांपैकी हे नाव नक्कीच नाही. नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ शोधू नये अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आम्ही पारखे मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातले. मात्र शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपुरात माझे आईवडील चाळीसच्या दशकात स्थायिक झाले होते. या जोडप्याच्या लहान बाळाला साठीच्या दशकाच्या उंबरठ...
Image
  महाराष्ट्रात भौगोलिकदृष्ट्या हरेगावचे स्थान काय आहे हे फार लोकांना माहित नाही. हरेगाव हल्लीच्या हमरस्त्यावर नाही, मात्र याच हरेगावामुळे या परिसरात हमरस्ते आणि रेल्वे स्टेशने तयार झाले, औद्योगिक आणि आर्थिक विकास झाला आणि आसपास श्रीरामपूरसारखे त्याकाळात अस्तित्वात नसलेले शहर निर्माण झाले. ही बाबसुद्धा लोकांना माहित नसणार अहमदनगर जिल्ह्यातच आणि श्रीरामपूरजवळ असलेले शिर्डी हे स्थळ जगाच्या नकाशावर आपली जागा राखून आहे. मात्र शिर्डी हे नावारुपाला आले ते अलीकडच्या काळात, म्हणजे सत्तरच्या दशकात. त्याकाळात श्रीरामपूरहून मी आणि माझा एक मित्र सायकलने शिर्डीला जायचो, तिथे दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही मुले आणि इतर भाविक लोक थेट साईबाबांच्या मूर्तीसमोर बसायचो. देवदर्शन झाल्यावर काही क्षण मंदिरात किंवा पायऱ्यांवर स्वस्थ बसायचे असते, हे मी त्यावेळी शिकलो. आजूबाजूला भिंतीही नव्हत्या आणि अजिबात गर्दी नसायची यावर आज कुणाचा विश्वासही बसणार नाही. याउलट हरेगाव मात्र फार पूर्वीपासून एक गजबजलेले ठिकाण होते. समाजमाध्यमावर ``आम्ही हरेगावकर'' या ग्रुपचा गेली काही वर्षे मी सभासद आहे. हरेगावशी म...
Image
  दलित पॅन्थर, नामदेव ढसाळ, नारायण आठवले गोव्यातील कॉलेजशिक्षणाचा आणि नंतर बातमीदाराच्या नोकरीचा काळ संपवून ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस मी महाराष्ट्रात परतलो, औरंगाबादला `लोकमत टाइम्स'ला रुजू झालो तेव्हा राज्यातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांपासून आणि राजकारणापासून आपण फार काळ दूर राहिलो होतो याची जाणीव झाली . औरंगाबाद शहरात आणि मराठवाड्याच्या अनेक भागांत त्याकाळात `भारतीय दलित पॅन्थर' असे फलक दिसत. हे नाव वाचून कुतूहल आणि जिज्ञासा निर्माण झाली.    फार पूर्वी मी श्रीरामपूरला शाळेत असताना सत्तरच्या दशकात दलित पँथरची स्थापना झाली होती, मुंबईतील त्याकाळातल्या दंगली आणि अशांत सामाजिक परिस्थिती याविषयी अंधुक आठवत होतं, मात्र इनमिन अडीच वर्षे मात्र खळबळजनक आयुष्य लाभलेल्या या संघटनेविषयी फार माहिती नव्हती.    अशा प्रकारची फलके त्या संघटनांचं त्यात्या परिसरातलं अस्तित्व आणि ताकद दाखवून देत असतात. आपल्या परिसरात स्वतःच्या वाढदिवसानिमित्त फ्लेक्स उभारून काय पडसाद उमटतात याचा अनुभव घ्या म्हणजे मी काय म्हणतो आहे हे कळेल. अशी फलके उभारणं म्हणजेच प्रस्थापित घटकांवि...