यहुद्यांच्या वऱ्हाडणाच्या Pass Over सणानिमित्त शिक्षा झालेल्या आणि सजा भोगत असलेल्या एखाद्या गुन्हेगारास तुरुंगातून मुक्त करण्याची प्रथा होती. त्याकाळात इस्राएल रोमन साम्राज्याचा एक भाग होते. येशू ख्रिस्ताला कुठल्याही शिक्षेपासून सोडवण्यासाठी इस्त्राएलमधील रोमन सुभेदार पिलात याने या प्रथेचा वापर करण्याचे ठरवले. कारण येशूने कुठलाही गुन्हा केला नाही असे त्याचे मत होते. मात्र त्याच्यासमोर जमलेल्या जमावाने 'येशूला नको, बाराब्बास याला तुरुंगातून बाहेर सोडा'' अशी मागणी केली. बाराब्बास हा एक दरोडेखोर होता. त्यामुळे नाईलाज होऊन पिलात याने बाराब्बास याला तुरुंगातून मुक्त केले आणि त्याऐवजी येशूला क्रुसावर खिळवून ठार मारण्याची सजा द्यावी लागली. अशा प्रकारे बाराब्बास तुरुंगातून बाहेर आला. आणि येशूला क्रुसावर टांगून मारण्यात आले.
Posts
Showing posts with the label Jesus Christ
- Get link
- X
- Other Apps
ख्रिस्ती धर्मियांचा चाळीस दिवसांचा उपवास काळ - लेंट सिझन ख्रिस्ती धर्मियांचा चाळीस दिवसांचा उपवास काळ - लेंट सिझन - दरवर्षीं मार्च-एप्रिल याच काळात येतो. मुस्लीम कॅलेंडर चांद्रवर्षीय असल्याने रमझान महिना ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये सतत बदलत असतो. नाताळाची आणि इतर ख्रिस्ती सणांची तारीख ठरलेली असते, लेन्ट सिझन आणि यामध्ये येणाऱ्या झावळ्यांचा रविवार (पाम संडे), गुड फ्रायडे आणि इस्टर संडे मात्र याला अपवाद. या तारखा विशिष्ट आकडेवारी करून ठरवतात, माझ्याही डोक्यात ते अजून बसले नाही. तर या होली लेन्ट सिझनमधला अतिपवित्र आठवडा सद्या चालू आहे. पाम संडेपासून सुरु झालेला आणि ईस्टर संडेला संपणारा. खरे पाहता हा होली विक अध्यात्मिकदृष्ट्या अगदी ख्रिसमसपेक्षाही महत्वाचा. याचे कारण म्हणजे येशू ख्रिस्ताचे अवतारकार्य म्हणजे खुप वेदना सहन करून क्रुसावर मरणे आणि तीन दिवसांनंतर इस्टर रविवारी मृत्यूतून पुनरुज्जीत होणे. वर्षभर रविवारी देवळाकडे न फिरकणारे अनेक ख्रिस्ती जण ख्रिसमसप्रमाणेच या पवित्र आठवड्यातल्या सर्व प्रार्थनाविधींना आवर्जून हजर असतात. आज मौंडी थसडे किंवा पवित्र गुरुवार. य...
भव्य दिव्य सेंट पिटर स्क्वेअर
- Get link
- X
- Other Apps
भव्य दिव्य सेंट पिटर स्क्वेअर को वाडीस? बायबलमध्ये एक कथा आहे. येशू ख्रिस्त आपल्या खांद्यावर क्रूस घेऊन जातो आहे आणि त्यावेळेस आपल्या होणाऱ्या छळापासून सुटका घेण्यासाठी रोममधून पळ काढणाऱ्या सेंट पिटरची त्याची गाठ पडते. रोमकडे निघालेल्या आपल्या प्रभूला पाहून पिटर थक्क होतो. ''दोमिनी, को वाडीस ?'' 'प्रभूं, तू कुठे चाललास ? असे तो विचारतो. ''मी पुन्हा एकदा क्रुसावर मरायला निघालो आहे!'' येशू आपल्या सर्वात लाडक्या शिष्याला सांगतो आणि सेंट पिटरला आपली चूक समजते. येशू ख्रिस्ता च्या अनुयायांची रोममध्ये होणाऱ्या छळाची पर्वा न करता तो माघारी वळतो आणि रोमन साम्राज्याच्या या राजधानीत तो हौतात्म्य कवटाळतो. लॅटिन भाषेतील 'को वाडीस' (कुठे निघालास?) हा वाक्प्रचार त्यातील गर्भित आशयामुळे अनेक भाषांत रुढ झाला आहे. (बायबलमधील जुना करार हिब्रू भाषेत तर नवा करार ग्रीक भाषेत आहे. नंतरच्या काळात बायबलची आणि चर्चची अधिकृत भाषा लॅटिन बनली.) सेंट पिटरने आणि इतर अनेक ख्रिस्ती लोकांनी रोममध्ये हौतात्म्य स्वीकारल...
Pope’s emphatic ‘no’ to women priests disappoints feminists
- Get link
- X
- Other Apps
Pope’s emphatic ‘no’ to women priests disappoints feminists and others CAMIL PARKHE | Wednesday, 16 November 2016 AT 09:49 AM IST Sakal Times blog , in my opinion , Pope , Francis , feminists , Catholic Church , christian community , women priests , Camil Parkhe , goo.gl/t6OmjQ The emphatic remark ‘never’ by Pope Francis on the issue of sanctioning priesthood for women has disappointed not only the feminists but also a large number of fans of the pontiff all over the world. Almost smashing hopes of the liberals in the Catholic Church, Pope Francis has last week replied that the Catholic Church’s present ban on ordaining women as priests will continue and also stated that he saw no chances of revising this policy even in the future. Since he took over the papacy a few years ago, Pope Francis has won many admirers not only within the church but also outside due to hi...