Posts

Showing posts from April, 2021

कामगार दिन

Image
गेल्या शतकात एक मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन जगभरातील कामगार संघटना अतिशय उत्साहाने साजरा करत असत. या आंतरराष्ट्रीय दिनाचा सोहळा सर्वांत थाटामाटाने साजरा होई तो जगातील पहिली साम्यवादी क्रांती झालेल्या रशियातील मॉस्कोतील लाल चौकात आणि चीनमधील बीजिंग शहरात ! १९८६ साली कामगार दिनाचा सोहळा बल्गेरियाची राजधानी सोफिया येथे पाहण्याची संधी मला मिळाली. त्या वेळी गोवा युनियन ऑफ जर्नलिस्ट्स या कामगार संघटनेचा सरचिटणीस या नात्याने रशिया दौऱ्याची आणि बल्गेरियात पत्रकारितेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी मला मिळाली होती. कामगार चळवळीचे महत्त्व अधोरेखित करणारा तो मेळावा आणि तेथील सैन्याच्या कवायतीमुळे मी अगदी भारावून गेलो होतो. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाला साम्यवादी जगात म्हणजे रशिया, चीन आणि पूर्व युरोपातील देशांत, डाव्यांच्या आणि समाजवाद्यांच्या चळवळीतच अधिक महत्त्व दिले जायचे. “जगातील कामगारांनो, एक व्हा! तुम्हाला तुमच्या शृंखलांशिवाय म्हणजे गुलामगिरीशिवाय इतर काहीही गमवायचे नाही!!” असा स्पष्ट नाराच कार्ल ार्क्सने दिला होता. त्यामुळे भांडवलशाहीचे प्रस्थ असलेल्य

स्नेहसदन - पुस्तकदिन

Image
पुण्यातील शनिवार पेठेतील येशूसंघीय (जेसुईट) धर्मगुरुं चे स्नेहसदन हा संस्कृत श्र्लोक पुण्यातील शनिवार पेठेतील येशूसंघीय (जेसुईट) धर्मगुरुंच्या स्नेहसदन संस्थेच्या ग्रंथालयाच्या दरवाजावर लावलेला आहे. कल्पना अर्थात स्नेहसदन संस्थापक दिवंगत जर्मन फादर मॅथ्यू लेदर्ले यांची ! तैलाद्रक्षेत् जलाद्रक्षेत् रक्षेत् शिथिलबंधनात् । मूर्खहस्ते न दातव्यमेवं वदति पुस्तकम् ॥ अर्थ : पुस्तक म्हणते की तेलापासून माझे रक्षण करा, पाण्यापासून माझे रक्षण करा, माझे बंध शिथिल होणार नाहीत असे बघा, आणि मूर्ख लोकांच्या हातात मला देऊ नका. पुस्तकदिनस्य शुभकामनाः। `ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या माझ्या पुस्तकात फादर लेदर्ले यांचेही चरित्र आहे. Camil Parkhe Books Day 23 April 2021

‘घरवापसी’ आणि ‘लव जिहाद’च्या गोष्टी... पण वेगळ्या प्रकारच्या

‘घरवापसी’ आणि ‘लव जिहाद’च्या गोष्टी... पण वेगळ्या प्रकारच्या पडघम  - सांस्कृतिक कामिल पारखे ‘घोगरगावचे जाकियरबाबा - मराठवाड्यातील ख्रिस्ती मिशन कार्य : इ  स. १८९२ पासून’ या माझ्या पुस्तकात आतील पानावर एक रंगीत छायाचित्र आहे. मराठवाड्यात विशेषतः औरंगाबाद जिल्ह्यात ख्रिस्ती धर्माचा पाया रचणारे फ्रेंच फादर गुरियन जाकियर यांच्या कार्यावर आणि पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य असलेल्या ख्रिस्ती समाजाविषयीचं हे पुस्तक आहे. ‘घोगरगावातील एक ख्रिस्ती कुटुंब’ असं त्या छायाचित्राखाली लिहिलेलं आहे. त्यात नऊवारी पातळ घातलेली माझी आई, मार्थाबाई आपला भाचा, नाथू शिनगारे आणि त्याची बायको-मुलं-नातवंडं आणि माझ्या एका पुतणीबरोबर आहे. आम्ही श्रीरामपूरला परतताना नाथुने स्वतः जमिनीतून भराभरा उपटून हरभऱ्याच्या टहाळीचा वानवळा आम्हाला दिला होता, तेव्हा त्याच्या हिरव्यागार शेतात मी ते छायाचित्र काढलं होतं.   फ्रान्समधून १८९२ साली येऊन औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात घोगरगाव येथे ग्रामीण लोकांच्या सेवेत स्वतःला वाहून, ५० वर्षांच्या काळात शेकडो लोकांना बाप्तिस्मा देणारे जाकियरबाबा आज संत मानले जातात. कॅथोलिक धर्मात

AAP should learn from Janata Party experiment

  AAP should learn from Janata Party experiment Sakal Times blog April 9, 2015 The recent unprecedented victory of the Aam Aadmi Party in the Delhi state polls reminded me of the landslide victory of the then unborn Janata Party in the 1977 general elections. At that time, for the first time, the country's sitting prime minister Indira Gandhi was defeated and the Congress was routed in nine northern cow-belt states. I, then still a higher secondary school student and so non-voter, was an active participant of this political bloodless revolution (as naively we had then called it). I was one of the polling agents representing the Peasants and Workers Party, one of the constituents of the Janata Party, in the counting of votes held at Satara. Congress candidates in Satara and Karad Lok Sabha constituencies were Union Minister Yashwantrao Chavan and Pramila Chavan, mother of former Maharashtra chief minister Prithviraj Chavan, respectively. As the counting of votes continued, at aro

महाबळेश्वरचे होली क्रॉस चर्च

Image
                                                                  महाबळेश्वरचे होली क्रॉस चर्च    महाबळेश्वरला तुम्ही कधी भेट दिली असेल तर या पर्यटक स्थळाच्या मुख्य बाजारपेठेत अगदी मध्यवर्ती ठिकाणी असलेले एक छोटेसे टुमदार बंगलीवजा बांधकाम तुम्ही नक्कीच पाहिले असणार. गेटपाशीच मदर मेरीचा डोंगर म्हणजे ग्रोटो आहे आणि बंगलीच्या शिखरवजा टोकावर क्रूस आहे. यावरुन हे एक कॅथोलिक चर्च आहे हे माहितगार व्यक्तीला लगेच कळते. महाबळेश्वर एसटी बसडेपोपासून एक मिनिटाच्या अंतरावर आणि टुरिस्ट टॅक्सींच्या वाहनतळापाशी हे महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि अनेक कारणांनी आगळेवेगळे असलेले असलेले होली क्रॉस चर्च आहे. मुंबई आणि वसई परीसर वगळता उर्वरित महाराष्ट्रातील हे सर्वात जुने कॅथोलिक चर्च आहे. ब्रिटिश अमदानीत 1831 साली या चर्चची स्थापना झाली होती. जुन्या वास्तुशास्त्राच्या धर्तीवर बांधलेले हे चर्च या हिलस्टेशनवर सुट्टीसाठी आलेल्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. या प्रसिध्द थंड हवेच्या ठिकाणी उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि अगदी दिवाळीच्या सुट्टीतही हजारो लोक एकदोन दिवसांच्या पिकनिकसाठी कुटुंबियांसह वा मित्