Posts

Showing posts from January, 2019

महात्मा गांधींचा मानसपुत्र – मार्टिन ल्युथर किंग

Image
महात्मा गांधींचा मानसपुत्र – मार्टिन ल्युथर किंग ग्रंथनामा  - आगामी                     कामिल पारखे                                                              goo.gl/KSfTht   ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ मार्टिन ल्युथर किंग : भारतातील अस्पृश्यता आणि अमेरिकेतील वर्णभेद’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ Fri , 14 December 2018 ग्रंथनामा Granthnama आगामी बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ मार्टिन ल्युथर किंग Babasaheb Ambedkar ani Dr. Martin Luther King कामिल पारखे Kaamil Parkhe ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे यांचं ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ मार्टिन ल्युथर किंग : भारतातील अस्पृश्यता आणि अमेरिकेतील वर्णभेद’ हे पुस्तक लवकरच सुगावा प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश... ............................................................................................................................................. “माझं एक सुंदर स्वप्न आहे की, आता छोटी असलेली माझी चार मुलं एक दिवस अशा राष्ट्रात राहतील, जिथं त्यांच्या गुणांची प

सांता क्लॉजची खरी ओळख

Image
सांता क्लॉजची खरी ओळख समोरच्यांना कळली नाही, तो सस्पेन्स खूप वेळ टिकला तर त्यातली गंमत अधिक वाढते! पडघम  - सांस्कृतिक  कामिल पारखे लेखक कामिल पारखे सांता क्लॉजच्या वेषात Mon , 24 December 2018 पडघम सांस्कृतिक नाताळ मेरी ख्रिसमस Merry Christmas पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी मी १९८५ साली लखनौत होतो. डिसेंबरची अखेर येऊ लागली, तसे मला नाताळाचे वेध लागले. पण लखनौमध्ये गोव्यासारखे ख्रिसमसचे वातावरण नव्हते. लखनौ विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्टस आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ जर्नालिस्टसने आयोजित केलेल्या या अभ्यासक्रमात देशातील विविध राज्यांतील पत्रकार सामील होते. गोव्यातून मी एकटाच होतो. सहभागी पत्रकारांपैकी बहुतेकांनी ख्रिस्तमसचा कधी अनुभव घेतला नव्हता. त्यामुळे लखनौत या पत्रकार मित्रांसह नाताळ साजरा करण्याचे मी ठरवले. माझ्या पत्रकार सहकाऱ्यांना नाताळचा आनंद देण्याचे, त्यांच्यासाठी सांता क्लॉज बनून त्यांना चकित करण्याचे मी ठरवले. नाताळाचे व कुठल्याही सणाचे, उत्सवाचे त्या काळात आजच्यासारखे बाजारीकरण झाले नव्हते. सांता क्लॉ