Posts

Showing posts with the label Vikrant Londhe
Image
  `ज्ञानोदय' मासिकात सिंथिया फरारबाईंच्या निधनाचे आणि अंत्यविधीचे १ फेब्रुवारी १८६२ च्या अंकात छापलेले वृत्त मागच्याच आठवड्यात १६ ऑकटोबर २०२६ रोजी अभिजित एकनाथ वाघ, भैरवनाथ वाकळे आणि असिफ खान दुलेखान यांनी अहिल्यानगर येथील सेंट झेव्हियर्स कॅथेड्रल आणि ख्राईस्ट चर्च यांच्या बुऱ्हाणनगर रस्त्यावरील दफनभूमीतली फरारबाईंची चिरनिद्रेची जागा शोधून काढली. अहिल्यानगर येथील पास्टर विक्रांत लोंढे यांनी अहमदनगर कॉलेजच्या ग्रंथालयातील `ज्ञानोदय' मासिकाच्या अर्काईव्हमधून फरारबाईंच्या निधनाचे आणि अंत्यविधीचे १ फेब्रुवारी १८६२ च्या अंकात छापून आलेले मूळ इंग्रजीतील आणि मराठी भाषांतर शोधून काढले आहे. हा दुर्मिळ दस्तऐवज मिळवल्याबद्दल आणि त्याद्वारे पर्यायाने सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबा फुले यांचे चरित्र अधिक परिपूर्ण बनवण्यात मदत केल्याबद्दल पाळक विक्रांत लोंढे यांचे अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार येथे तूर्त फक्त मराठी भाषांतर देत आहे. Camil Parkhe October 22, 2026 ०फे. ता. ० १ सन १८६२ `ज्ञानोदय पान ४१ आणि ४२ फरार मडम साहेबांचे मरण शनवार तारीख २५ माहे ज्यानुएरी रोजी प्रातःकाळी अहमदनगर एथील अम...