Posts

Showing posts from November, 2026
Image
  एखादी नवी वसाहत केवळ एका विशिष्ट समुदायासाठी वसवली जावी याची संपूर्ण जगात फार कमी उदाहरणे असतील. मराठवाड्यात जालना शहरापासून अगदी जवळ असलेल्या एका ठिकाणी असा प्रयोग मागील शतकात पहिले देशस्थ ब्राह्मण ख्रिस्ती मिशनरी असलेल्या नारायणराव शेषाद्री परळीकर यांनी केला. बेथेल असे बायबलशी संबंधित नाम धारण करणारी ही वसाहत आजही आहे. बेथेल या नावाची पूर्वपीठिका महत्त्वाची आहे. बायबलमधील जुन्या करारात आधीच वर्णिल्याप्रमाणे दाविदाच्या घराण्यातील कुटुंबात बेथेलहेम या गावात येशू या मसिहाचा जन्म झाला होता. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषवलेल्या माजी न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर यांनी खूप कष्ट घेऊन नारायणराव शेषाद्री परळीकर यांच्या बेथेल गावाची जन्मकहाणी विस्तृतपणे लिहिली आहे. महान योगदान करणाऱ्या केवळ काही ख्रिस्ती व्यक्तींच्या चरित्रांवर असलेल्या नरेंद्र चपळगावकर यांच्या ' सावलीचा शोध' (मौज प्रकाशन २०१२) या पुस्तकात आगळ्यावेगळ्या बेथेल वसाहतीची कथा सांगण्यात आली आहे. एका विशिष्ट समुदायाची वसाहत बनवण्याचा असा प्रयोग आधुनिक काळात दुसऱ्या महायुद्धानंतर मध्य आशियात करण्यात आला. इस्राए...