Posts

Showing posts with the label St Xavier's School
Image
  फ्रान्सिस न्यूटन सोझा मुंबईतल्या सेंट झेव्हियर्स स्कूल या एका नावाजलेल्या शाळेतील मुलांच्या मुतारीत काही अश्लील चित्रे रेखाटलेली दिसून आली आणि हे प्रकरण शाळेच्या उपप्राचार्यांपर्यंत पोहोचले. ही आताची नाही, खूप जुनी, स्वातंत्र्यपूर्व काळातली घटना आहे. सेंट झेव्हियर्स हायस्कूल ही जेसुईट फादरांची संस्था. त्याकाळात ही शाळा स्पॅनिश जेसुईट्स चालवत होते. जेसुइटस फादर्स शिस्तीबाबत किती कडक असतात हे सांगायलाच नको. या शाळेतला तेरा वर्षांचा एक विद्यार्थी चित्रकलेत पारंगत होता आणि त्याचे हे कसब जेसुईट फादरांनाही चांगले माहित होते. त्यामुळे जेव्हाजेव्हा मुतारींत अशी काही रेखाटने यायची तेव्हातेव्हा या मुलावर कायम संशय असायचा. यावेळीही असेच झाले होते. साहजिकच त्या मुलाला - फ्रान्सिस न्यूटन सोझा त्याचे नाव - बोलावण्यात आले. मुतारीतली ही अश्लील भित्तीचित्रे म्हणजे मुलांमुलींच्या अवयवांची रेखाटणी होती. Anatomical designs मात्र त्या मुलाने यासंदर्भात त्याच्यावर केलेले आरोप पूर्णतः मान्य केले नाही अथवा फेटाळलेसुध्दा नाही. त्या मुलाचा याबाबतीतले स्पष्टीकरण किंवा बचाव मात्र धक्कादायक होता. `...