Posts

Showing posts with the label Good Friday
Image
  "माणुसकी हाच धर्म' मुसलमान आणि ख्रिस्ती लोकांचा वर्षातील पवित्र मानला जाणारा उपवासकाळ सद्या चालू आहे. ख्रिस्ती लोकांचे कॅलेंडर ग्रेगरियन म्हणजे सौरवर्षीय आहे तर मुस्लीम धर्मियांचे कॅलेंडर चांद्रवर्षीय असते. त्यामुळे ख्रिस्तीजनांचा लेन्ट सिझन किंवा उपवासकाळ नेहेमीच फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला सुरु होतो आणि सुमारे चाळीस दिवसानंतर एप्रिलमध्ये गुड फ्रायडे या सणाने संपतो. तर मुस्लिमांचा रमझान महिना ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये वर्षभर कधीही असू शकतो. कुठल्याही धर्मात उपवासाच्या पवित्र काळात जे करावयाचे असते ते या काळात मुसलमान आणि ख्रिस्ती लोकसुद्धा करतात. उपवास धरतात, प्रार्थना करतात आणि त्यांनी याकाळात दानधर्म आणि इतर सत्कार्य करावे अशीही अपेक्षा असते. तर पुण्यातील रास्ता पेठेत राहणाऱ्या जावेद खान आणि मायकल साठे या दोघांनी त्यांच्या भिन्न धर्मांच्या या चालू पवित्र काळात एक वेगळ्या प्रकारचे पुण्यकर्म केले. त्यांच्या इमारतीशेजारी असलेल्या सुधीर किंकळे ( वय ७० वर्षे) नावाच्या माणसाचे निधन झाले, तेव्हा त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी एका बहिणीशिवाय इतर कुणीही ह...
  `हा, तर आज तुमच्यापैकी किती  जणांनी उपवास केला आहे ?''   प्रवचन करणाऱ्या धर्मगुरुंनी अचानक हा प्रश्न  केला अन देवळात एकदम शांतता पसरली.  तशीही जगभरच्या आमच्या सर्वच देवळांत हजारोंचा समुदाय असला तरी तशी शांतता असतेच,  ऐतिहासिक आणि वास्तुशास्त्राचे उत्तम नमुने असलेल्या आणि त्यामुळे आता केवळ पर्यटन  वास्तू ठरलेल्या युरोपातील अनेक देवळे अर्थात याला पूर्ण अपवाद.  व्हॅटिकन सिटीमध्ये सेंट पिटर्स बॅसिलिकातील सर्वाधिक अतिपवित्र मानलेल्या सिस्टाईन चॅपलमध्ये पर्यटकांचा असाच गोंगाट मी अनुभवला आहे.  मायकल अँजेलोच्या ती जगप्रसिद्ध छतावरील आणि भिंतीवरील चित्रे पाहताना न राहवून मीसुद्धा त्या कोलाहलात सामील झालो होतो.  तर धर्मगुरुंनी तो प्रश्न विचारला तेव्हा काही काळ  शांतता पसरली आणि केवळ दोनचार हात वर झाले.  ही खूपच आश्चर्याची गोष्ट होती.  कारण हा प्रश्न विचारला गेला तो कालचा दिवस होता ऍश वेन्सडे, भस्म किंवा राखेचा बुधवार.  चाळीस दिवसांच्या उपवासकाळाची या दिवसापासून सुरुवात होते आणि गुड फ्रायडेला त्याची समाप्ती होती.  या...
Image
  ख्रिस्ती धर्मियांचा चाळीस दिवसांचा उपवास काळ - लेंट सिझन   ख्रिस्ती धर्मियांचा चाळीस दिवसांचा उपवास काळ - लेंट सिझन - दरवर्षीं मार्च-एप्रिल याच काळात येतो. मुस्लीम कॅलेंडर चांद्रवर्षीय असल्याने रमझान महिना ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये सतत बदलत असतो. नाताळाची आणि इतर ख्रिस्ती सणांची तारीख ठरलेली असते, लेन्ट सिझन आणि यामध्ये येणाऱ्या झावळ्यांचा रविवार (पाम संडे), गुड फ्रायडे आणि इस्टर संडे मात्र याला अपवाद. या तारखा विशिष्ट आकडेवारी करून ठरवतात, माझ्याही डोक्यात ते अजून बसले नाही. तर या होली लेन्ट सिझनमधला अतिपवित्र आठवडा सद्या चालू आहे. पाम संडेपासून सुरु झालेला आणि ईस्टर संडेला संपणारा. खरे पाहता हा होली विक अध्यात्मिकदृष्ट्या अगदी ख्रिसमसपेक्षाही महत्वाचा. याचे कारण म्हणजे येशू ख्रिस्ताचे अवतारकार्य म्हणजे खुप वेदना सहन करून क्रुसावर मरणे आणि तीन दिवसांनंतर इस्टर रविवारी मृत्यूतून पुनरुज्जीत होणे. वर्षभर रविवारी देवळाकडे न फिरकणारे अनेक ख्रिस्ती जण ख्रिसमसप्रमाणेच या पवित्र आठवड्यातल्या सर्व प्रार्थनाविधींना आवर्जून हजर असतात. आज मौंडी थसडे किंवा पवित्र गुरुवार. य...