Posts

Showing posts with the label Zuari
Image
एकमेव प्रवेशद्वार पाटो ब्रिज   गोव्याची राजधानी पणजी येथे चारशे-पाचशे वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या काही वास्तू आणि इतर बांधकाम आहेत. पोर्तुगीज राजवटीची पहिली राजधानी असलेल्या ओल्ड गोवा येथे तर त्याहून अधिक जुनेपुराणे बांधकामे आहेत. पोर्तुगिजांनीं आपली राजधानी नोवे गोवा किंवा पणजी येथे १८४३ या साली हलवली आणि त्यानंतर इथला आधीच असलेला आदिलशाहचा राजवाडा मग पोर्तुगीज इंडियाचे मुख्यालय बनला. त्यानंतर या पणजी येथे पोर्तुगीजांनी पाश्चात्य धर्तीच्या अनेक इमारती बांधल्या, पोर्तुगीज राजवटीच्या वेगवेगळ्या खात्यांची आणि संस्थांची कामकाज या इमारतींतून चालायचे. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी भारतीय लष्कर पाठवून गोवा, दमण आणि दीव पोर्तुगीज सत्तेतून मुक्त केला आणि मग पोर्तुगीजकालीन या इमारती विविध सरकारी खात्यांची, लष्करी विभागांची कार्यालये बनल्या. मांडवीच्या तिरावरचे आदिलशाह पॅलेस अनेक वर्षे गोवा, दमण आणि दिवचें सचिवालय आणि विधानसभा भवन होते. पणजी येथे फॉन्टइनेस, कंपाल आणि अल्तिन्हो येथे सहज एक फेरफटका मारला तर पोर्तुगीजकालीन तीनशे-चारशे वर्षे जुनी असलेल्या आणि आजही अगदी सुस्थितीत अ...

पणजी-म्हापशाचं ‘लॉकडाऊन’ झालं, गोव्यातला मांडवी पूल कोसळला तेव्हा Collapse of Mandovi bridge

Image
मांडवी पुलाची संग्रहित छायाचित्रं पणजी-म्हापशाचं ‘लॉकडाऊन’ झालं, गोव्यातला मांडवी पूल कोसळला तेव्हा… पडघम  - माध्यमनामा कामिल पारखे त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मी ताळेगावहून पणजीला जाणाऱ्या बसमध्ये बसलो होतो. त्या काळात म्हणजे १९८०च्या दशकात सांत इनेज- ताळेगाव- करंझले- मिरामार -पणजी अशा मार्गे बस जात असे. ‘नवहिंद टाइम्स’चा बातमीदार म्हणून मी साधारणतः सकाळी साडेनऊला पणजीतल्या सचिवालयातल्या प्रेस रूममध्ये जात असे. त्या दिवशी आम्ही काही प्रवासी त्या खासगी बसमध्ये चढलो आणि कंडक्टरने ती धक्कादायक घोषणा केली - “सोगळे ध्यान द्या हांव कित्ये सांगता त्ये. पोणजिचो मांडवीचो पूल मोडलोय. म्हापश्याचे अन नॉर्थ गोयांक आता सोगळी बस बंद असात.” बहुतेक प्रत्येक बस स्टॉपवर तो ती घोषणा करता असावा. कंडक्टर काय सांगत होता त्याचा मला अर्थ स्पष्ट होण्यास काही क्षण जावे लागले. इतकी ती धक्कादायक आणि भयानक घटना होती. पणजी शहर हे मुंबईसारखेच एक बेट आहे, अनेक बाजूंनी पाण्याने घेरलेले. म्हणजे एका बाजूने मांडवी नदीने, दुसऱ्या बाजूने झुआरी नदीने आणि बाकी अरबी समुद्राच्या पाण्याने घेरले...