Posts

Showing posts with the label Mapusa
Image
  गोव्यात म्हापशात त्या रात्री साध्या वेशात असलेले इन्स्पेक्टर मधुकर झेंडे आणि मी कदाचित समोरासमोर आलोही असेल, मात्र त्यांच्याशी काही बोलणे शक्यच नव्हते. आपल्या मुंबई पोलीस टिममधल्या चारपाच लोकांव्यतिरिक्त कुणाशीही एक शब्दसुद्धा बोलण्याच्या मनःस्थितीत ते त्यावेळी नव्हते. त्या रविवार ६ एप्रिल १९८६च्या रात्री तिथे जमलेल्या आम्हा काही मोजक्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास त्यांना अजिबात स्वारस्य नव्हते. पर्वरी येथील `हॉटेल ओ कोकेरो' येथे चार्ल्स सोबराजच्या शिताफीने मुसक्या बांधल्यानंतर म्हापसा हॉटेलातून चेक-आऊट करून सोबराजसह शक्य तितक्या लवकर गोवा सोडून मुंबई गाठण्याच्या घाईत ते होते. काल शुक्रवार दुपारी घरच्या टिव्हीवर पिक्चर सुरु झाल्यानंतर `इन्स्पेक्टर झेंडे' असे चित्रपटाचे शिर्षक झळकले आणि डोक्यात तिडीक उठली. ''इन्स्पेक्टरसाठी हेच नाव निवडण्याची काही गरज होती काय?'' असे मी मोठ्याने बोललोसुद्धा. दोनचार मिनिटे गेली आणि लक्षात आले, ``अरे हो, हा तर मधुकर झेंडे आणि चार्ल्स सोबराज यांच्यावर चित्रपट आहे !'' त्यानंतर मी टिव्हीवरुन नजर वळवली. आज...
Image
एकमेव प्रवेशद्वार पाटो ब्रिज   गोव्याची राजधानी पणजी येथे चारशे-पाचशे वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या काही वास्तू आणि इतर बांधकाम आहेत. पोर्तुगीज राजवटीची पहिली राजधानी असलेल्या ओल्ड गोवा येथे तर त्याहून अधिक जुनेपुराणे बांधकामे आहेत. पोर्तुगिजांनीं आपली राजधानी नोवे गोवा किंवा पणजी येथे १८४३ या साली हलवली आणि त्यानंतर इथला आधीच असलेला आदिलशाहचा राजवाडा मग पोर्तुगीज इंडियाचे मुख्यालय बनला. त्यानंतर या पणजी येथे पोर्तुगीजांनी पाश्चात्य धर्तीच्या अनेक इमारती बांधल्या, पोर्तुगीज राजवटीच्या वेगवेगळ्या खात्यांची आणि संस्थांची कामकाज या इमारतींतून चालायचे. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी भारतीय लष्कर पाठवून गोवा, दमण आणि दीव पोर्तुगीज सत्तेतून मुक्त केला आणि मग पोर्तुगीजकालीन या इमारती विविध सरकारी खात्यांची, लष्करी विभागांची कार्यालये बनल्या. मांडवीच्या तिरावरचे आदिलशाह पॅलेस अनेक वर्षे गोवा, दमण आणि दिवचें सचिवालय आणि विधानसभा भवन होते. पणजी येथे फॉन्टइनेस, कंपाल आणि अल्तिन्हो येथे सहज एक फेरफटका मारला तर पोर्तुगीजकालीन तीनशे-चारशे वर्षे जुनी असलेल्या आणि आजही अगदी सुस्थितीत अ...
Image
  गोमंतकातील शहरांत आणि गावागावांत गणेशोत्सव उत्साहात By कामिल पारखे सकाळ    Published on : 27 August 2020, 7:31 pm A+ A- Camil Parkhe Writes Article About Ganeshotsav Goa  गणपती उत्सव हा गोव्यातील लोकांचा एक प्रमुख सण. मुंबईत आणि जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यांत राहणाऱ्या गोयंकरांना ऑगस्ट अखेरीस आपल्या घरांकडे जाण्याचे वेध लागतात ते आपल्या घरच्या गणपती उत्सवात  सहभागी होण्यासाठी. यावर्षी कोरोनामुळे जगभर लोकांच्या प्रवासावर, हिंडण्याफिरण्यावर बंधने आली आहेत. असे असले तरी मुंबई-पुण्यातील आणि इतर शहरांतील अनेक गोमंतकिय गणपती बाप्पांच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी विमानाने, खास वाहने करुन, ईपास आणि आवश्यक ती सर्व वैद्यकिय कागदपत्रांची पूर्तता करुन आपापल्या घरी पोहोचली आहेत. यापैकी काही जणांना स्वतःच्या घरातच काही दिवस विलगीकरणात राहावे लागले होते. मात्र आपल्या वार्षिक धार्मिक उत्सवात हजर राहण्यासाठी हे सर्व सोपस्कार यांनी पूर्ण केले आहेत. पुण्यातला इंग्रजी दैनिकातील अलिकडेच लग्न झालेला माझा एक पत्रकार सहकारी आपल्या बायकोच्या माहेरी गोव्यात कोरतालिम येथे गणपती उत...

पणजी-म्हापशाचं ‘लॉकडाऊन’ झालं, गोव्यातला मांडवी पूल कोसळला तेव्हा Collapse of Mandovi bridge

Image
मांडवी पुलाची संग्रहित छायाचित्रं पणजी-म्हापशाचं ‘लॉकडाऊन’ झालं, गोव्यातला मांडवी पूल कोसळला तेव्हा… पडघम  - माध्यमनामा कामिल पारखे त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मी ताळेगावहून पणजीला जाणाऱ्या बसमध्ये बसलो होतो. त्या काळात म्हणजे १९८०च्या दशकात सांत इनेज- ताळेगाव- करंझले- मिरामार -पणजी अशा मार्गे बस जात असे. ‘नवहिंद टाइम्स’चा बातमीदार म्हणून मी साधारणतः सकाळी साडेनऊला पणजीतल्या सचिवालयातल्या प्रेस रूममध्ये जात असे. त्या दिवशी आम्ही काही प्रवासी त्या खासगी बसमध्ये चढलो आणि कंडक्टरने ती धक्कादायक घोषणा केली - “सोगळे ध्यान द्या हांव कित्ये सांगता त्ये. पोणजिचो मांडवीचो पूल मोडलोय. म्हापश्याचे अन नॉर्थ गोयांक आता सोगळी बस बंद असात.” बहुतेक प्रत्येक बस स्टॉपवर तो ती घोषणा करता असावा. कंडक्टर काय सांगत होता त्याचा मला अर्थ स्पष्ट होण्यास काही क्षण जावे लागले. इतकी ती धक्कादायक आणि भयानक घटना होती. पणजी शहर हे मुंबईसारखेच एक बेट आहे, अनेक बाजूंनी पाण्याने घेरलेले. म्हणजे एका बाजूने मांडवी नदीने, दुसऱ्या बाजूने झुआरी नदीने आणि बाकी अरबी समुद्राच्या पाण्याने घेरले...

गोव्यातल्या सर्वात लोकप्रिय नाश्त्याच्या चमचमीत आठवणी.. Goa Bhaji Pao .

Image
गोव्यातल्या सर्वात लोकप्रिय नाश्त्याच्या  चमचमीत आठवणी... ... गोव्यात सगळीकडे नवीन पहाट उगवते ती एका विशिष्ट आवाजाने. 'पुई-पुई' यासारखा तो आवाज असतो. तुमच्या परिसरात पाववाला आल्याची ती वर्दी असते. पूर्वी ऑटोरिक्षांना हॉर्नसाठी हवेच्या दाबावर काम करणारे उपकरण असते, त्याचा गोलाकार रबरी भाग दाबला कि त्या 'पुई-पुई' असा आवाज यायचा. तेच उपकरण आपल्या सायकलच्या हँडलवर बसवून, त्यातून आवाज काढत गोव्यात हे पाववाले किंवा पोदेर घरोघरी आपल्या आगमनाची खबर देत असतात. आपल्या सायकलवर विविध प्रकारचे पाव प्लास्टिकच्या कापडांत झाकून पाववाला यावेळी येतो. पोर्तुगीज भाषेत पाववाल्याला किंवा बेकरी मालकास पोदेर म्हटले जाते. पुण्यात दुधाच्या पिशव्यांसाठी फ्लॅटच्या बाहेर ग्रिलमध्ये सकाळी पिशव्या लटकवलेल्या असतात तसे गोव्यात प्रत्येक घराच्या कुंपणाच्या दरवाजापाशी पावांसाठी पिशव्या टांगलेल्या असतात. प्रत्येक घराचा सकाळचा आणि संध्याकाळचा वेगवेगळ्या पावांचा रतीब ठरलेला असतो. कमीजास्त मागणी असेल तर आधी तसे सांगावे लागते. मागे अंजुना-वागातोर समुद्रकिनारी असलेल्या बहिणीच्या घरी सुट्टीसाठी आ...