मराठी ई-बुक्स या दोन घटना लागोपाठ घडल्या. पुण्यातल्या शनिवार पेठेतल्या जेसुईट फादरांच्या `स्नेहसदन' येथे `निरोप्या' मासिकाच्या (वय अवघे १२० वर्षे ) ऑफिसात गेलो होतो. तेथून बाहेर पडल्यावर समोरच असलेल्या `मॅजेस्टिक' बुक स्टॉलमध्ये गेलो. माझा हा नेहमीचा शिरस्ता आहे. पुस्तक घ्यायचे नाही, असा दुसरा शिरस्त्याचा निर्धार असतानाही शेवटी खरेदी ही झालीच. गोविंद तळवलकर यांचे `पुष्पांजली' खंड दुसरा हे पुस्तक बॅगेत टाकून आलो आणि परतीच्या मेट्रो प्रवासात वाचायला सुरुवातही केली. `महाराष्ट्र टाइम्स'मध्ये १९८० च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या मृत्युलेखांचे हे संकलन आहे. काही ठराविक, मला परिचित आणि आवडीच्या क्षेत्रांतील व्यक्तींवर असलेलेच लेख वाचायचा उद्देश होता. त्यामुळे एका परदेशी दांपत्याविषयी असलेला लेख टाळून मी पुढील लेख वाचत गेलो. थोड्या वेळाने पुन्हा त्याच लेखावर नजर गेली आणि पहिली ओळ वाचताच थबकलो. तो लेख विल ड्युरंट आणि त्यांची पत्नी एरीयल ड्युरंट यांच्याविषयी होता. विल ड्युरंट यांनी लिहिलेल्या `हिस्टरी ऑफ फिलॉसॉफी' या जाडजूड ग्रंथाची गोव्यात शिकताना मी अक्षरशः पारायणे केल...
Posts
Showing posts with the label Snehsadan