गोमंतकातील शहरांत आणि गावागावांत गणेशोत्सव उत्साहात By कामिल पारखे सकाळ Published on : 27 August 2020, 7:31 pm A+ A- Camil Parkhe Writes Article About Ganeshotsav Goa गणपती उत्सव हा गोव्यातील लोकांचा एक प्रमुख सण. मुंबईत आणि जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यांत राहणाऱ्या गोयंकरांना ऑगस्ट अखेरीस आपल्या घरांकडे जाण्याचे वेध लागतात ते आपल्या घरच्या गणपती उत्सवात सहभागी होण्यासाठी. यावर्षी कोरोनामुळे जगभर लोकांच्या प्रवासावर, हिंडण्याफिरण्यावर बंधने आली आहेत. असे असले तरी मुंबई-पुण्यातील आणि इतर शहरांतील अनेक गोमंतकिय गणपती बाप्पांच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी विमानाने, खास वाहने करुन, ईपास आणि आवश्यक ती सर्व वैद्यकिय कागदपत्रांची पूर्तता करुन आपापल्या घरी पोहोचली आहेत. यापैकी काही जणांना स्वतःच्या घरातच काही दिवस विलगीकरणात राहावे लागले होते. मात्र आपल्या वार्षिक धार्मिक उत्सवात हजर राहण्यासाठी हे सर्व सोपस्कार यांनी पूर्ण केले आहेत. पुण्यातला इंग्रजी दैनिकातील अलिकडेच लग्न झालेला माझा एक पत्रकार सहकारी आपल्या बायकोच्या माहेरी गोव्यात कोरतालिम येथे गणपती उत...
Posts
Showing posts with the label Ganesh festival
- Get link
- X
- Other Apps
गोव्याला पर्यटक म्हणून गेल्यावर तिथे काय करावे, काय पाहावे गोव्याला पर्यटक म्हणून गेल्यावर तिथे काय करावे, काय पाहावे असा प्रश्न मला अनेक जण विचारतात. माझा अनुभव असा आहे कि गोव्याला अनेकदा जाऊन आणि तिथे काही वर्षे राहूनही अनेक लोकांनी खराखुरा गोवा पाहिलाच नसतो किंवा अनुभवला नसतो. गोव्यात सुट्टीला गेले म्हणजे समुद्रकिनारी जायचे, मासे आणि इतर मांसाहारी पदार्थांचा यथेच्छ आस्वाद घ्यायचा आणि पिण्याचा कार्यक्रम करायचाअशीच अनेकांची कल्पना असते. खरे पाहिले तर याहून अधिक कितीतरी गोष्टी गोव्यात असताना पाहायच्या आणि अनुभवयाच्या असतात. या महिन्यात चार सुट्ट्या सलग आलेल्या आहेत, आणि तेव्हापासून गोव्यात पर्यटक हंगामही जोमाने सुरु होईल. कोरोनाचा लॉकडाऊन संपला आहे. करोनामुळे दोनअडीच वर्षे घरात आणि शहरांत अडकलेली मंडळी यावेळी बाहेर पडणार आहेत. गोव्यात पर्यटनासाठी पहिल्यांदाच जाणाऱ्या लोकांना गोव्याची तोंडओळख करून घेण्यासाठी मी त्यांना दोन दिवसांच्या गोवा दर्शन टूरमध्ये सहभागी होण्याचा सल्ला देत असतो. या दोन दिवसांत उत्तर आणि दक्षिण गोवा असे पूर्ण गोवा राज्यातील सर्व प्रमुख पर्यटनस्थळे,...