संजीवनी साखर कारखाना संस्थापक शंकरराव कोल्हे ''तुम्ही मुंबई-पुण्याकडची आणि इतर शहरांतले पत्रकार, तुम्हाला आमच्याकडच्या प्रश्नांची काय माहिती असते ? इकडे येण्याआधी तुम्ही चारदोन स्थानिक पत्रकारांशी बोलता, जुनी वार्तापत्रे नजरेकडून घालता आणि आमच्यासारख्या लोकांना तेच-तेच प्रश्न विचारता. शेतीसाठी पाणीवाटपाचा वाद, अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर आणि दक्षिण वाद आणि शंकरराव काळे -शंकरराव कोल्हे वाद, बस्स, हे विषय सोडून तुमची गाडी पुढे ढळतच नाही. हा, घ्या तुम्ही तो नाश्ता आणि चहा,,,'' कोपरगावातल्या संजीवनी साखर कारखान्याच्या आवारात साखर कारखाना संस्थापक शंकरराव कोल्हे यांची मुलाखत घेताना अगदी सलामीला झडलेला हा संवाद. माझ्यापेक्षा वयाने आणि कर्तृत्वाने तर खूप मोठे असलेल्या शंकरराव कोल्हे यांच्या समोर मी बसलो होतो आणि माझ्याकडून एकदोन प्रश्न विचारले गेल्यानंतर या साखरसम्राटांनी अशी तोफ डागली होती. अर्थात `इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी आणि राष्ट्रीय पातळीवरच्या दैनिकाचे मी प्रतिनिधीत्व करत असल्याने समोरच्या व्यक्तीच्या कर्तृत्वाने किंवा नुसत्या बोलण्याने मी दबून जाण्याचा...
Posts
Showing posts with the label Nilu Phule