गेली काही दिवस कर्मधर्मसंयोगाने डेक्कन जिमखाना पुन्हा एकदा माझ्या नेहेमीच्या वहिवाटीचा परिसर बनला आहे. या जागी मी आलो, इथलाच रहिवासी झालो ते पंचेचाळीस वर्षांपूर्वी, ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस. इंडियन एक्सप्रेसला रुजू झाल्यावर इथेच ब्रिटिश कौंसिल लायब्ररीच्या (बीसीएल) च्या मागे मंथली कॉट बेसिसवर चार वर्षे राहिलो तेव्हा हॉटेल गुडलक जिवाभावाचे स्थळ बनले होते. काही महिन्यांपूर्वी वाचले होते कि हॉटेल गुडलकच्या इमारतीचे रिनोव्हेशन होणार असल्याने हे हॉटेल काही काळ बंद राहणार आहे. काल संघ्याकाळीच इथे गेलो तिथली आत बाहेरची नेहेमीची वर्दळ पाहिली तेव्हा ही घटिका आता इतकी जवळ आली अशी पुसटशी शंकाही मनात नव्हती. आज दुपारी आम्ही दोघेही इथे जात होते आणि गुडलक बंद दिसले आणि मनात चर्रर्र झाले. पण दारापाशी काहीच लिहिलेले नव्हते, थोड्या वेळाने परत तिथे आलो तेव्हा ती सूचना चारपाच ठिकाणी लिहिलेली दिसली. रिनोव्हेशनसाठी बंद आहे म्हणून. आता कळते कि अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या दंडात्मक कारवाईमुळे हे हॉटेल तात्पुरते बंद करण्यात आले आहे आता हॉटेल गुडलकच्या अनेक ठिकाणी शाखा उघडल्या आहेत, तिथे गेल्यावर या मूळ...
Posts
Showing posts with the label Pune
- Get link
- X
- Other Apps
`बिशपांची स्कल कॅप, कार्डिनलची रेड कॅप आणि पुण्याच्या नूतन बिशपांची पुणेरी पगडी' फक्त दीड वर्षांपूर्वी मी इथे ही पोस्ट लिहिली होती. बिशप थॉमस डाबरे, कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस आणि पुण्याचे नूतन बिशप जॉन रॉड्रीग्स नूतन बिशपांना पुणेरी पगडी का दिली ? असेही काहींनी विचारले होते. या पोस्टमध्ये मी हे वाक्य लिहिले होते. ``पुण्यात बदली होऊन येण्याआधी वसईचे बिशप थॉमस डाबरे हे मराठी संत वाङमयाचे अभ्यासक म्हणून पुऱ्या महाराष्ट्राला परिचित होते. वय अवघे ५६ वर्षांचे असणाऱ्या नूतन बिशप रॉड्रिग्स यांची पाटी त्या तुलनेत तशी कोरी आहे आणि त्यामुळे सर्वांकडून अपेक्षाही खूप आहेत.'' तर बिशप जॉन रॉड्रिग्स यांची आता मुंबईचे कोॲडजुटेर (वारसाधिकारी) बिशप पदावर बढती झाली आहे. पोप फ्रान्सिस यांनी काल ३० नोव्हेम्बरला पुणे धर्मप्रांताचे बिशप जॉन रॉड्रिग्स (५७) यांची मुंबई सरधर्मप्रांताचे कोॲडजुटेर (वारसाधिकारी) बिशप म्हणून नेमणूक केली आहे. व्हॅटिकनच्या कॅनन लॉनुसार बिशप रॉड्रिग्स यांना मुंबई सरधर्मप्रांताचे विद्यमान आर्चबिशप ओस्वाल्ड ग्रेशियस यांचे वारस नेमण्यात आले आहे. रोममध्ये म्हणजे व...
- Get link
- X
- Other Apps
एके काळी भारतात आणि जगातील अनेक भागांत ख्रिस्ती धर्मगुरु आणि नन्स विविध क्षेत्रांत सेवाभावी वृत्तीने कार्यरत होते. अव्वल ब्रिटिश अमदानीत तर देशातील अनेक समाजसुधारकांनी ख्रिस्ती मिशनरी लोकांनी सुरु केलेल्या शाळांत शिक्षण घेतले. पुण्यात स्कॉटिश मिशनरी रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या शाळेत शिकलेले जोतिबा फुले हे त्यापैकी एक प्रमुख नाव. एक काळ असा होता की समाजातील अनेक क्षेत्रांतील मोठ्या व्यक्तींनी ख्रिस्ती शाळांत आणि कॉलेजात शिक्षण घेतलेले असायचे. कारण त्यावेळेस भारतात सरकारी शाळानंतर सर्वाधिक मोठ्या संख्येने चालवल्या जाणाऱ्या शाळा ख्रिस्ती संस्थांच्या असत. त्याशिवाय शहरांत आणि ग्रामीण भागांत अनेक छोटेमोठे दवाखाने ख्रिस्ती मिशनरी चालवत असत. येथे आजारी लोकांना नाममात्र खर्चात आरोग्य सेवा मिळायची. त्या काळात शिक्षण क्षेत्रांचे आणि आरोग्य सेवांचे आजच्यासारखे बाजारीकरण किंवा खासगीकरण झालेले नव्हते. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील संत लूक इस्पितळ किंवा शेवगाव येथील नित्य सेवा हॉस्पिटल ही काही वानगीदाखल नावे. या शाळांचा किंवा दवाखान्याचा धर्मांतरासाठी वापर केला जातो असा सर्रा...
- Get link
- X
- Other Apps
बारामतीकर. तसे पाहिले तर आम्ही मूळचे बारामतीकर. अगदी अलीकडच्या काळापर्यंत पुणे जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ होते. पुणे, बारामती आणि खेड. तर या बारामती लोकसभा मतदारसंघात आमच्या पिंपरी चिंचवड शहराचा अंतर्भाव होता. गोवा सोडून मी पुण्यात तात्पुरता स्थायिक झालो, डेक्कन जिमखाना येथे रानडे इन्स्टिट्युटसमोर लॉजमध्ये मंथली कॉट बेसिसवर चांगली तीनचार वर्षे राहिलो. लग्नानंतर मात्र सेटल व्हावे लागले. जॅकलिनची नोकरी चिंचवडला म्हणून तेथेच घर घेतले आणि अशाप्रकारे आम्ही निदान लोकसभा मतदार संघापुरते बारामतीकर बनलो. त्यावेळी खेड मतदारसंघात अशोक मोहोळ, विदुरा नवले, निवृत्ती शेरकर खासदार होते, नंतर किसनराव बाणखेले खासदार बनले, पुण्यातले खासदार मंडळी तर सर्वपरिचित आहेत. आमच्या बारामती मतदारसंघात मात्र खासदारांचे नेहेमीच एकच आडनाव असायचे. फक्त पहिले नाव बदलायचे. शरद पवार, अजित पवार, पुन्हा शरद पवार. त्यांच्या विरोधात नेहेमीच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असल्याने लोकसभा निवडणुकीत मतदान कुणाला करायचे याचा विचार करण्याची कधी गरजच भासली नाही. पण एकदा ती वेळ आली. त्याआधीची ही घटना सांगतो. उन्...
- Get link
- X
- Other Apps
`हा, तर आज तुमच्यापैकी किती जणांनी उपवास केला आहे ?'' प्रवचन करणाऱ्या धर्मगुरुंनी अचानक हा प्रश्न केला अन देवळात एकदम शांतता पसरली. तशीही जगभरच्या आमच्या सर्वच देवळांत हजारोंचा समुदाय असला तरी तशी शांतता असतेच, ऐतिहासिक आणि वास्तुशास्त्राचे उत्तम नमुने असलेल्या आणि त्यामुळे आता केवळ पर्यटन वास्तू ठरलेल्या युरोपातील अनेक देवळे अर्थात याला पूर्ण अपवाद. व्हॅटिकन सिटीमध्ये सेंट पिटर्स बॅसिलिकातील सर्वाधिक अतिपवित्र मानलेल्या सिस्टाईन चॅपलमध्ये पर्यटकांचा असाच गोंगाट मी अनुभवला आहे. मायकल अँजेलोच्या ती जगप्रसिद्ध छतावरील आणि भिंतीवरील चित्रे पाहताना न राहवून मीसुद्धा त्या कोलाहलात सामील झालो होतो. तर धर्मगुरुंनी तो प्रश्न विचारला तेव्हा काही काळ शांतता पसरली आणि केवळ दोनचार हात वर झाले. ही खूपच आश्चर्याची गोष्ट होती. कारण हा प्रश्न विचारला गेला तो कालचा दिवस होता ऍश वेन्सडे, भस्म किंवा राखेचा बुधवार. चाळीस दिवसांच्या उपवासकाळाची या दिवसापासून सुरुवात होते आणि गुड फ्रायडेला त्याची समाप्ती होती. या...
- Get link
- X
- Other Apps
पंचहौद चर्च पुण्यात अगदी अलीकडच्या काळापर्यंत काही वास्तू आणि ठिकाणे या शहराची ओळख होती, मैलाचे दगड होती. पुण्यातल्या मध्यवर्ती भागातली महात्मा फुले मंडईची नाविन्यपुर्ण आकाराची इमारत, मध्यवस्तीतला शनिवारवाडा, पुणे कॅम्पाव्या एका तोंडाशी असलेले लाल रंगाचे आणि म्हणून लाल देऊळ याच नावाने ओळखले जाणारे ज्यु धर्मियांचे प्रार्थनास्थळ म्हणजे सिनेगॉग. तिकडे शहराच्या आणखी एका टोकाला वानवडीजवळ आणि रेस कोर्ससमोर असलेले १८६० साली बांधले गेलेले भव्य आकाराचे सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रल आणि गुरुवार पेठेतील उंचच उंच मनोरा असलेले पवित्र नाम देवालय अर्थात होली नेम चर्च. शहराच्या उंच भागावर असलेले पेशवेकालीन पर्वती मंदिर सुद्धा असेच. क्वार्टर गेटपाशी असलेले आणि माधवराव पेशवे यांनी १७९२ साली दिलेल्या जागेवर उभे असलेलें छोटेखानी सिटी चर्च मात्र तसे दुर्लक्षित राहिले, हमरस्त्यावर नसल्याने आजही या ऐतिहासिक वास्तुकडे सहज लक्ष जात नाही. त्याकाळच्या पुण्याच्या सिमित क्षितिजावर दुरुन या वास्तू कुणाचेही लक्ष वेधून घ्यायच्या. शहराच्या स्कायलाईनवर त्यांचे महत्त्वाचे स्थान असायचे. शहरात टोलेगंज उंच इमारतींचे...
- Get link
- X
- Other Apps
महाराष्ट्रात भौगोलिकदृष्ट्या हरेगावचे स्थान काय आहे हे फार लोकांना माहित नाही. हरेगाव हल्लीच्या हमरस्त्यावर नाही, मात्र याच हरेगावामुळे या परिसरात हमरस्ते आणि रेल्वे स्टेशने तयार झाले, औद्योगिक आणि आर्थिक विकास झाला आणि आसपास श्रीरामपूरसारखे त्याकाळात अस्तित्वात नसलेले शहर निर्माण झाले. ही बाबसुद्धा लोकांना माहित नसणार अहमदनगर जिल्ह्यातच आणि श्रीरामपूरजवळ असलेले शिर्डी हे स्थळ जगाच्या नकाशावर आपली जागा राखून आहे. मात्र शिर्डी हे नावारुपाला आले ते अलीकडच्या काळात, म्हणजे सत्तरच्या दशकात. त्याकाळात श्रीरामपूरहून मी आणि माझा एक मित्र सायकलने शिर्डीला जायचो, तिथे दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही मुले आणि इतर भाविक लोक थेट साईबाबांच्या मूर्तीसमोर बसायचो. देवदर्शन झाल्यावर काही क्षण मंदिरात किंवा पायऱ्यांवर स्वस्थ बसायचे असते, हे मी त्यावेळी शिकलो. आजूबाजूला भिंतीही नव्हत्या आणि अजिबात गर्दी नसायची यावर आज कुणाचा विश्वासही बसणार नाही. याउलट हरेगाव मात्र फार पूर्वीपासून एक गजबजलेले ठिकाण होते. समाजमाध्यमावर ``आम्ही हरेगावकर'' या ग्रुपचा गेली काही वर्षे मी सभासद आहे. हरेगावशी म...
- Get link
- X
- Other Apps
बॉसच्या फार जवळ जाऊ नये, फार पुढेपुढे, सलगी करु नाही असे शहाणी माणसे म्हणतात. हा मंत्र मी फार कसोशीने पाळत आलो आहे. चार दशकांच्या पत्रकारितेच्या कारकीर्दीत एकदोन जणांचा किंवा अख्ख्या टीमचा बॉस होण्याची आपत्ती माझ्यावर फार कमी काळ -अगदी नोकरीच्या शेवटच्या टप्प्यावर - आली. माझे कनिष्ठ सहकारी किंवा माझ्याबरोबरीचे कालांतराने माझे बॉस झाले तेव्हाही मी वरचा हा मंत्र सतत ध्यानात ठेवला. माझ्या अगदी पडझडीच्या काळात संपूर्ण जग नव्या सहस्त्रकाच्या उंबरठ्यावर असताना पुण्यात नुकत्याच सुरु झालेल्या टाइम्स ऑफ इंडियाच्या संपादकीय विभागाच्या बॉसने शेरना गांधी (आणि मुख्य वार्ताहर अभय वैद्य ) यांनी मला इंडियन एक्स्प्रेसमधून बोलावले. कॉनी मस्कारेन्हास याने म्हटले आहे की शेरना यांना फक्त कामाशी मतलब होता, एखाद्या व्यक्तीच्या खासगी किंवा पूर्वायुष्याशी नाही. पुण्यात टाइम्समध्ये दोन वर्षे शेरना गांधी Sherna Gandhy बॉस होत्या. (Gandhy हे नाव गांधी असे लिहिले जाऊ नये असा एक मुद्दा इथे मागच्या वर्षी एका पुस्तकाविषयी वाद झाला तेव्हा मांडला गेला होता.) वर म्हटल्याप्रमाणे मी कधीही शेरना मॅडमच्या घरी खाण्यापि...