पॅरीसहून आम्ही रेल्वेने लुर्ड्स\च्या दिशेने निघालो. ग्रामीण फ्रान्सचे या प्रवासातून ओझरते दर्शन घडले..आपल्याकडे असते तशी घनदाट वस्तीची गावे व शहरे या प्रवासात अजिबात दिसली नाही. लुर्ड्स रेल्वेस्टेशनवर उतरलो तेव्हा फ्रान्समधल्या वाटेरवरच्या इतर रेल्वे स्टेशनांपेक्षा मोठ्या संख्येने येथे लोक उतरले होते. कारण स्पष्टच होते, लुर्ड्स हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे एक महत्त्वाचे धार्मिक पर्यटन क्षेत्र आहे. मेरीयन डिव्होशन म्हणजे मदर मेरीच्या भक्तीसाठी जगात काही प्रसिद्ध तिर्थक्षेत्रे आहेत, त्यापैकी लुर्डस हे एक महत्त्वाचे जागतिक धार्मिक स्थळ आहे .. युरोपच्या दौऱ्यावर जॅकलिन आणि आमची मुलगी अदितीसह मी आलो होतो. रेल्वे स्टेशनवर उतरुन टॅक्सीने आम्ही आधीच आरक्षण केलेल्या हॉटेलकडे आलो. हॉटेलची रुम पॅरीसच्या हॉटेलच्या मानाने आधीच ऐसपैस आणि स्वस्त होती. लुर्ड्स शहरात आमच्या या हॉटेलमधल्या वास्तव्यात घडलेली ही घटना येथे सांगायलाच हवी. हॉटेलच्या रिसेप्शन काऊंटरपाशी मी उभा होतो तेव्हा एक महिला तेथे क्लार्कशी बोलत होती, आमच्याप्रमाणे तीही आशियाई देशातील होती हे नक्कीच होते. का कुणास ठाऊक, त्या महिलेने मला ...
Posts
Showing posts with the label Haregaon
- Get link
- X
- Other Apps
अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ आमचा अहमदनगर जिल्हा एकेकाळचा कम्युनिस्ट विचारसरणीचा बालेकिल्ला.. इथले नंतर राज्यात आणि केंद्रात प्रस्थापित झालेले अनेक नेते मूळचे कम्युनिस्ट विचारधारेचे. मला आठवते ती इथली पहिली लोकसभेची निवडणूक १९७१ सालची. त्यावेळचे तेव्हाच्या कोपरगाव मतदारसंघातले सर्वांत तगडे उमेदवार होते कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड पी. बी. कडू पाटील आणि त्यांच्या विरोधात होते होतकरु तरुण उमेदवार एकनाथ विठ्ठलराव विखे पाटील. निवडणूक प्रचारादरम्यान या दोघांना त्यावेळी श्रीरामपूर येथे आमच्या `पारखे टेलर्स' दुकानासमोर मी पाहिले. कॉम्रेड कडू पाटील यांची प्रचारात आघाडी होती. इंदिराबाईंच्या `गरिबी हटाव'च्या त्या लाटेत निवडणूक अर्थात बाळासाहेब विखे जिंकले आणि त्यानंतर जिल्ह्यातला कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव ओसरत गेला, राज्यात सुद्धा. आताचा शिर्डी मतदारसंघ राखीव झाला, त्यामुळे विखे घराण्याने शेजारच्या अहमदनगर मतदारसंघात लक्ष केंद्रित केले आहे. तरी शिर्डी मतदारसंघात विखे चालवतील त्या उमेदवाराला भरपूर मते मिळतील अशीच स्थिती आहे. रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठ...
- Get link
- X
- Other Apps
महाराष्ट्रात भौगोलिकदृष्ट्या हरेगावचे स्थान काय आहे हे फार लोकांना माहित नाही. हरेगाव हल्लीच्या हमरस्त्यावर नाही, मात्र याच हरेगावामुळे या परिसरात हमरस्ते आणि रेल्वे स्टेशने तयार झाले, औद्योगिक आणि आर्थिक विकास झाला आणि आसपास श्रीरामपूरसारखे त्याकाळात अस्तित्वात नसलेले शहर निर्माण झाले. ही बाबसुद्धा लोकांना माहित नसणार अहमदनगर जिल्ह्यातच आणि श्रीरामपूरजवळ असलेले शिर्डी हे स्थळ जगाच्या नकाशावर आपली जागा राखून आहे. मात्र शिर्डी हे नावारुपाला आले ते अलीकडच्या काळात, म्हणजे सत्तरच्या दशकात. त्याकाळात श्रीरामपूरहून मी आणि माझा एक मित्र सायकलने शिर्डीला जायचो, तिथे दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही मुले आणि इतर भाविक लोक थेट साईबाबांच्या मूर्तीसमोर बसायचो. देवदर्शन झाल्यावर काही क्षण मंदिरात किंवा पायऱ्यांवर स्वस्थ बसायचे असते, हे मी त्यावेळी शिकलो. आजूबाजूला भिंतीही नव्हत्या आणि अजिबात गर्दी नसायची यावर आज कुणाचा विश्वासही बसणार नाही. याउलट हरेगाव मात्र फार पूर्वीपासून एक गजबजलेले ठिकाण होते. समाजमाध्यमावर ``आम्ही हरेगावकर'' या ग्रुपचा गेली काही वर्षे मी सभासद आहे. हरेगावशी म...
- Get link
- X
- Other Apps
श्रीरामपुरातल्या ‘लोकमान्य टिळक वाचनालया’ने माझ्या आयुष्याला कलाटणी दिली! ‘अक्षरनामा’ ग्रंथनामा - वाचणारा लिहितो कामिल पारखे प्रातिनिधिक चित्र Fri , 04 June 2021 ग्रंथनामा वाचणारा लिहितो पुस्तके Books गो. नि. दांडेकर G. N. Dandekar वि. स. खांडेकर V. S. Khandekar साने गुरुजी Sane Guruji श्यामची आई Shyamchi Aai साने गुरुजी कथामाला Sane Guruji Kathamala चांदोबा Chandoba हंस Hans नवल Naval किर्लोस्कर Kirloskar ललित Lalit अनिल बर्वे Anil Barve द. मा. मिरासदार D. M. Mirasdar पु. ल. देशपांडे P. L. Deshpande केशवसुत Keshavsut आचार्य अत्रे Aachary Atre श्रीरामपुरात मेन रोडवरील सोनार आळीतील आमच्या ‘पारखे टेलर्स’ या दुकानासमोर नगरपालिकेचे लोकमान्य टिळक वाचनालय होते. अगदी जुनाट दिसत असलेल्या या वाचनालयात पाचव्या इयत्तेत असल्यापासून मी नियमितपणे जायला सुरुवात केली. संध्याकाळी साडेपाचला शाळा सुटली की, मी आमच्या दुकानाकडे येई आणि वाचनालयाच्या सहा वाजता खुला होणाऱ्या बालविभागाच्या कक्षात जाऊन बसे. १९७०-७१सालची ही घटना. त्या काळात महाराष्ट्रातील सर्वांत उत्तम पद्धतीने चालवल्या ...
फादर जॉन बेल्सर
- Get link
- X
- Other Apps
फादर जॉन बेल्सर हरेगावला १९७० च्या सुमारास संत तेरेजा विद्यालयाच्या बोर्डिंगात असताना फादर ह्युबर्ट सिक्स्थ, फादर रिचर्ड वास्सरर तेथे धर्मगुरु होते. तेथे असताना मग फादर झेम्प, फादर बेन्झ, फादर जॉन हल्दनर, फादर जॉन बेल्सर अशी नावे असलेली युरोपियन फादर अनेकदा तेथील मतमाऊलीच्या यात्रेला आणि चर्चच्या सणासुदीला यायचे. श्रीरामपूरला धर्मगुरु असलेल्या फादर आयवो मायर यांनी तर माझा बाप्तिस्मा केलेला होता. आणि १७ जूनला मी जन्मलो म्हणून त्या दिवशी सण असलेल्या कामिल या संताचे नाव त्यांनीच दिले होते. (अर्थात हे नंतर माझ्या लग्नाच्या वेळेस बाप्तिस्म्याच्या दाखल्याची गरज पडली तेव्हा कळले !) फादर मायर यांनी पन्नास-साठ वर्षांपूर्वी श्रीरामपूरच्या प्रसिद्ध सेंट लुक हॉस्पिटलची म्हणजे जर्मन हॉस्पिटलची स्थापना केली. पुण्यात सेंट जोसेफ टेक्निकल इन्स्टिट्यूटचेही ते अनेक वर्षे संचालक होते. पुण्यात त्या जुन्या काळात टेल्को, बजाज, ग्रीव्हज, अशा बड्या औद्योगिक कंपन्यांना कुशल कामगार या संस्थेने पुरवले आणि ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या तरुणांना रोजगार मिळवून देऊन पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात त्यांचे स्वत...
Singing bishop Valerian D'Souza
- Get link
- X
- Other Apps
“Come in..!” was the reply when I knocked at the semi-open entrance of his residence. As I entered, I saw Bishop Valerian D'Souza sitting on a chair impeccably dressed as was his wont – with a a felt cap, legs with socks on placed on a small stool and with a rosary in his hand. “Oh Camil..!” was his response in his deep voice when I stood before him. I had kissed his prel ate's ring when I had first met him as a reporter of The Indian Express 30 years ago and again when I interviewed him for Sakal Times when turned 80 in 2013. Over the years, I had developed a close bond with Bishop Valerian. But when I called on him February 6 evening, little did I realise that this would be our final meeting or that I would be one of his last 'courtesy call' visitors. Originally hailed from Parra village near Porvorim in Goa, bishop Valerian was born in Pune and studied in St. Vincent School where he was a footballer. When Fr. Valerian was appoint...