पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या निवडणुका उद्या रविवारी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या निवडणुका आहेत. निवडणुका होणार आहेत म्हणून बरे वाटले. पुणे युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्टस (Puwj) त निवडणुका मी सुरु केल्या. मी पुण्यात आलो तेव्हा या संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व्हायच्या. ही पद्धत बंद व्हावी म्हणून १९९१ आणि ,१९९२ ला मी सलग दोन वर्षे अध्यक्ष आणि इतर पदांसाठी अर्ज भरले. त्यामुळे निवडणूक घ्यावीच लागली. सहमतीने धोरण सोडून मी सहकारी साखर कारखान्याच्या प्रमाणे निवडणूक लादली म्हणून वरुणराज भिडे यासारखे त्यावेळचे अनेक बुजुर्ग पत्रकार माझ्यावर खवळले होते. (सहकारी साखर कारखाने म्हणजे सर्व दुर्गुणांचा पुतळे अशी भावना फार आधीपासूनच आहे. ) अर्थात निवडणुकीत सपाटून पडलो. पहिल्या वेळेस सकाळ चे राजीव साबडे यांच्याविरुद्ध तेरा मते मिळाली, दुसऱ्या वेळेस सत्तावीस. तिसऱ्या निवडणुकीत मी आणि पराग रबडे मिळून अख्खे पॅनल निवडून आणले. गेल्या तीस वर्षांत त्यानंतर आजपर्यंत दुसरी कुणी महिला सरचिटणीस झालीच नाही. पुण्यात puwj...