Posts

Showing posts with the label Sikhism
Image
  श्रीरामपूरला सोमैया हायस्कूलमध्ये आठवीनववीत शिकत असताना रविंद्र धुप्पड हा माझा अगदी जवळचा मित्र होता. आम्हा दोघांत काहीही समान धागे नसताना आम्ही दोघे इतके जवळचे मित्र कसे बनलो याचे आज या क्षणाला आठवत नाही, मात्र त्याबद्दल आश्चर्य नक्कीच वाटते. मी आमच्या शाळेजवळ राहणारा तर धुप्पड संगमनेर रोडवर चौगुले इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहणारा. त्याच्यामुळे मी आयुष्यात पहिल्यांदा इमारतीत फ्लॅट कसा असतो हे पाहिले. निळ्या रंगाचा लँडलाईन फोनसुद्धा पहिल्यांदा मी धुप्पडच्या घरात पाहिला, त्या फोनची रिंगटोन ऐकली. पुढचे आणि मागचे असे दोन दारे असलेल्या आमच्या घरात धुप्पडचा इथून तिथे सगळीकडे वावर असायचा. आमच्या घरातील सर्वांशी म्हणजे दादांशी, बाईशी, सगळ्या भाऊ बहिणी आणि वहिनी यांच्याशी त्याचा मराठीत चांगला संवाद असायचा. आमच्या स्वयंपाकघरात लाकडी भूशाच्या शेगडीवरच्या पातेल्यांत काय शिजते आहे याचीही त्याला पूर्ण कल्पना असायची, पण आमच्या संबंधात त्यामुळे काही बाधा आली नाही. माझा सर्वांत थोरला भाऊ फ्रान्सिस धुप्पडला त्याच्या घरच्या नावाने `किले' म्हणूनच हाक मारायचा. शाळेतल्या इतर मित्रांप्रमाणे आम्ह...
Image
जातीव्यवस्था आणि चातुर्वर्ण्य हे भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहेत, केवळ हिंदू धर्माचीच ती मक्तेदारी नाही… हे खरं नाही! पडघम  - सांस्कृतिक कामिल पारखे चरणजित सिंग छन्नी, बुटासिंग, बाबा पद्मनजी, रॉबर्ट डी नोबिली, पंडिता रमाबाई, ना. वा. टिळक, अमरिंदर सिंग आणि फादर फ्रान्सिस दीब्रिटो Tue , 12 October 2021 पंजाब Punjab चरणजित सिंग छन्नी Charanjit Singh Channi दलित Dalit ना. वा. टिळक Narayan Waman Tilak अमरिंदर सिंग Amarinder Singh बुटासिंग Buta Singh बाबा पद्मनजी Baba Padamji रॉबर्ट डी नोबिली पंडिता रमाबाई Pandita Ramabai फादर फ्रान्सिस दीब्रिटो Father Francis Dibrito काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये सत्ताबदल झाला. दुसऱ्या दिवशी बहुतेक वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांवरचा मथळा पुढील आशयाचा होता – ‘पंजाबमध्ये पहिल्यांदाच दलित मुख्यमंत्री’. काँग्रेसचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची उचलबांगडी होऊन चरणजित सिंग चन्नी यांची त्या जागी निवड करण्यात आली होती. वस्तुतः कॅप्टन अमरिंदर सिंग आणि चन्नी दोघंही धर्मानं शीख. १९५६ साली पंजाबची निर्मिती झाल्यापासून या राज्यात आतापर्यंत एकदाही बिगर-शी...