गोव्यात पणजी येथे `द नवहिंद टाईम्स' या इंग्रजी दैनिकात आणि नंतर छत्रपती संभाजीनगरला `लोकमत टाईम्स'मध्ये एकूण दशकभर क्राईम आणि हायकोर्ट रिपोर्टर ही बिट मी सांभाळली. तेव्हा वापरल्या गेलेल्या अनेक संज्ञांमध्ये `डायिंग डिक्लरेशन' किंवा मृत्यूपूर्व जबाब हा एक शब्दप्रयोग होता. मुख्यतः एखादी नवविवाहित महिलेचे जळीत प्रकरण असते तेव्हा तिला जाळण्यात आल़े किंवा तिने स्वतःला जाळून घेतले हे तिच्याकडून दंडाधिकाऱ्यामार्फत वदवून घेतले जाते. `डायिंग डिक्लरेशन'ला फौजदारी प्रकरणांत आगळेवेगळे महत्त्व असते. याचे कारण साधारणतः मृत्यूपूर्वी दिलेला जबाब खरा असतो असे मानले जाते. अर्थात मरणाला सामोरे जातानासुद्धा अनेक पतिव्रता महिला आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी आपण स्वतःलाच जाळून घेतले किंवा स्टोव्हचा अचानक भडका होऊन आग लागली असे म्हणत असत. याआधी श्रीरामपूरला असताना दैनिक `सकाळ' चे संस्थापक-संपादक नानासाहेब ऊर्फ ना. भि. परुळेकर यांनी मृत्युशय्येवर असताना `निरोप घेता' हे आत्मचरित्र लिहिले होते हे मला माहित होते. त्यानंतर अशाच पद्धतीने समाजवादी नेते एस. एम जोशी यांनी इस्पितळात असताना `मी...
Posts
Showing posts with the label Raja Dhale
- Get link
- X
- Other Apps
दलित पॅन्थर, नामदेव ढसाळ, नारायण आठवले गोव्यातील कॉलेजशिक्षणाचा आणि नंतर बातमीदाराच्या नोकरीचा काळ संपवून ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस मी महाराष्ट्रात परतलो, औरंगाबादला `लोकमत टाइम्स'ला रुजू झालो तेव्हा राज्यातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांपासून आणि राजकारणापासून आपण फार काळ दूर राहिलो होतो याची जाणीव झाली . औरंगाबाद शहरात आणि मराठवाड्याच्या अनेक भागांत त्याकाळात `भारतीय दलित पॅन्थर' असे फलक दिसत. हे नाव वाचून कुतूहल आणि जिज्ञासा निर्माण झाली. फार पूर्वी मी श्रीरामपूरला शाळेत असताना सत्तरच्या दशकात दलित पँथरची स्थापना झाली होती, मुंबईतील त्याकाळातल्या दंगली आणि अशांत सामाजिक परिस्थिती याविषयी अंधुक आठवत होतं, मात्र इनमिन अडीच वर्षे मात्र खळबळजनक आयुष्य लाभलेल्या या संघटनेविषयी फार माहिती नव्हती. अशा प्रकारची फलके त्या संघटनांचं त्यात्या परिसरातलं अस्तित्व आणि ताकद दाखवून देत असतात. आपल्या परिसरात स्वतःच्या वाढदिवसानिमित्त फ्लेक्स उभारून काय पडसाद उमटतात याचा अनुभव घ्या म्हणजे मी काय म्हणतो आहे हे कळेल. अशी फलके उभारणं म्हणजेच प्रस्थापित घटकांवि...
- Get link
- X
- Other Apps
डॉ. अनिल अवचट `गोव्यातून पुण्याला आलो आहे चार दिवसांसाठी.. उद्या सकाळी वैशालीत ये गप्पा मारायला..’’ त्यावेळी १९८९ला जलद संवादासाठी केवळ लँडलाईन फोनचा पर्याय होता. `इंडियन एक्सप्रेस'ला बातमीदार म्हणून रुजू झाल्यावर रानडे इन्स्टिट्युटसमोरच आणि वैशालीसमोर ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीच्या मागे `मंथली कॉट' बेसिसवर मी राहत असलेल्या माझ्या लॉजवर मला हा निरोप मिळाला होता. पणजीला `द नवहिंद टाइम्स’ चा बातमीदार असताना देबाशिष मुन्शी या `टाइम्स ऑफ इंडिया’च्या गोवा प्रतिनिधीशी दोस्ती झाली होती. `टाइम्स ऑफ इंडिया’ च्या त्याच्या बड्या पगारानुसार पणजीत अल्तिन्हो येथे सरकारी कोट्यातून त्याला आलिशान फ्लॅट मिळाला होती.. तिथेच सर्किट हाऊसमध्ये राहणाऱ्या एका पुणेकराची त्याने मला ओळख करून दिली होती. या सद्गृहस्थाने मला हा निरोप पाठवला होता गंमत म्हणजे त्याचे नाव आता आठवत नाही. मात्र आठवते ती त्यांनी ओळख करून दिलेली ती व्यक्ती. वैशालीत जवळजवळ अर्धापाऊण तास आम्ही तिघे बसलो असणार. काही खाऊन झाल्यानंतर माझे चहाचे दोन कप पिऊन झाल...