Posts

Showing posts with the label Navhind Times
Image
 पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या निवडणुका     उद्या रविवारी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या निवडणुका आहेत.  निवडणुका होणार आहेत म्हणून बरे वाटले.   पुणे युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्टस (Puwj) त निवडणुका मी सुरु केल्या.   मी पुण्यात आलो तेव्हा या संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व्हायच्या. ही पद्धत बंद व्हावी म्हणून १९९१ आणि ,१९९२ ला मी सलग दोन वर्षे अध्यक्ष आणि इतर पदांसाठी अर्ज भरले. त्यामुळे निवडणूक घ्यावीच लागली.    सहमतीने धोरण सोडून मी सहकारी साखर कारखान्याच्या प्रमाणे निवडणूक लादली म्हणून वरुणराज भिडे यासारखे त्यावेळचे अनेक बुजुर्ग पत्रकार माझ्यावर खवळले होते. (सहकारी साखर कारखाने म्हणजे सर्व दुर्गुणांचा पुतळे अशी भावना फार आधीपासूनच आहे. )   अर्थात निवडणुकीत सपाटून पडलो. पहिल्या वेळेस सकाळ चे राजीव साबडे यांच्याविरुद्ध तेरा मते मिळाली, दुसऱ्या वेळेस सत्तावीस.   तिसऱ्या निवडणुकीत मी आणि पराग रबडे मिळून अख्खे पॅनल निवडून आणले.    गेल्या तीस वर्षांत त्यानंतर आजपर्यंत दुसरी कुणी महिला सरचिटणीस झालीच नाही.   पुण्यात puwj...
Image
झेल चुकवला गेला अन खूप मोठ्ठी बातमी हातातून सट्कन निसटली तेव्हा...   अगदी पालिकेच्या वा महापालिकेच्या निवडणुकीत सत्तारुढ पक्षातर्फे एखाद्या वॉर्डात कुणाला बी फॉर्म मिळेल याविषयी अखेरच्या क्षणापर्यंत निर्णय जाहीर केला जात नसतो, विरोधकांना गाफील ठेवण्यासाठी आणि बंडखोरी टाळावी यासाठी कमालीचे गुपित पाळले जाते. त्यामुळे तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सत्तारुढ पक्षातर्फे कुणाला उमेदवारी मिळेल याबाबत जाहीर वाच्यता होत नसेल किंवा आतल्या गोटातही निर्णय होत नसेल याबाबत आश्चर्य वाटायला नको. आता राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. विजयाची शक्यता नसली तरी विरोधी पक्षांतर्फे याबाबत काही पावले उचलली जात आहे. स्वातंत्र्योत्तर काळात पहिली दोन दशके राष्ट्रपतींची निवडणूक एकतर्फीच झाली. पहिली अटीतटीची निवडणूक झाली ती १९६९ साली आणि त्यावेळी काँग्रेस पक्षाचा - सिंडिकेट गटाच्या कामराज, मोरारजी देसाई वगैरेंचा अधिकृत उमेदवार नीलम संजीव रेड्डी यांचा पराभव होऊन पंतप्रधान इंदिरा गांधींनी पाठिंबा दिलेला उमेदवार डॉ वराहगिरी वेंकट (व्ही व्ही.) गिरी निवडून आले. राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांच...
Image
  गोव्याला पर्यटक म्हणून गेल्यावर तिथे काय करावे, काय पाहावे   गोव्याला पर्यटक म्हणून गेल्यावर तिथे काय करावे, काय पाहावे असा प्रश्न मला अनेक जण विचारतात. माझा अनुभव असा आहे कि गोव्याला अनेकदा जाऊन आणि तिथे काही वर्षे राहूनही अनेक लोकांनी खराखुरा गोवा पाहिलाच नसतो किंवा अनुभवला नसतो. गोव्यात सुट्टीला गेले म्हणजे समुद्रकिनारी जायचे, मासे आणि इतर मांसाहारी पदार्थांचा यथेच्छ आस्वाद घ्यायचा आणि पिण्याचा कार्यक्रम करायचाअशीच अनेकांची कल्पना असते. खरे पाहिले तर याहून अधिक कितीतरी गोष्टी गोव्यात असताना पाहायच्या आणि अनुभवयाच्या असतात. या महिन्यात चार सुट्ट्या सलग आलेल्या आहेत, आणि तेव्हापासून गोव्यात पर्यटक हंगामही जोमाने सुरु होईल. कोरोनाचा लॉकडाऊन संपला आहे. करोनामुळे दोनअडीच वर्षे घरात आणि शहरांत अडकलेली मंडळी यावेळी बाहेर पडणार आहेत. गोव्यात पर्यटनासाठी पहिल्यांदाच जाणाऱ्या लोकांना गोव्याची तोंडओळख करून घेण्यासाठी मी त्यांना दोन दिवसांच्या गोवा दर्शन टूरमध्ये सहभागी होण्याचा सल्ला देत असतो. या दोन दिवसांत उत्तर आणि दक्षिण गोवा असे पूर्ण गोवा राज्यातील सर्व प्रमुख पर्यटनस्थळे,...
Image
  बार्देसकर समाजाच्या स्थलांतराची, त्यामागच्या कारणांची आजपर्यंत इतिहासकारांनी दखल घेतली नव्हती… ‘अक्षरनामा’ पडघम  - सांस्कृतिक कामिल पारखे ‘द बार्देसकर्स - द हिस्टरी ऑफ मायग्रेशन’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ Thu , 20 May 2021 पडघम सांस्कृतिक ख्रिस्ती धर्म रोमन कॅथोलिक द बार्देसकर्स - द हिस्टरी ऑफ मायग्रेशन फादर बिशप ही १९७६ची गोष्ट आहे. दहावीची परीक्षा दिल्यानंतर श्रीरामपूर येथील घर सोडून मी फादर प्रभुधर यांच्यासारखा जेसुईट (येशूसंघीय) धर्मगुरू होण्यासाठी कराड येथील त्यांच्या ‘स्नेहसदन’ या निवासस्थानी दाखल झालो. सोसायटी ऑफ जिझस या कॅथोलिक धर्मगुरूंच्या संस्थेच्या सदस्यांना ‘जेसुईट’ म्हणतात. कॅथोलिक चर्चमध्ये अशा फादरांच्या आणि नन्स वा सिस्टरांच्या शेकडो संस्था आहेत. उदा. डॉन बॉस्को (सॅलेशियन) फादर्स, मदर टेरेसा सिस्टर्स, फ्रान्सिलीयन फादर्स. सध्याचे पोप फ्रान्सिस हे सर्वोच्च पदावर पोहोचलेले जेसुईट संस्थेतील पहिले धर्मगुरू आहेत. कराडला आल्यावर एका वेगळ्याच ख्रिस्ती समाजाची मला ओळख झाली. फादर प्रभुधर मला कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा, राधानगरी, गारगोटी, कागल व चंदगड आणि कर्ना...

पगारी नोकरीतील लॉगआऊट

Image
  त्या दिवशी सकाळी मुंबई-पुणे हमरस्त्यावरील पिंपरीचिंचवडच्या मोरवाडी इथल्या `सकाळ’च्या ऑफिसात जाऊन `pcamil’ या नावाने लॉग इन केले. डेस्क टॉपवर असलेला माझा वैयक्तिक मराठी आणि इंग्रजी मजकूर, लेख, वगैरे स्वतःला मेल केला, काही मजकूर आणि फोटो पेन ड्राईव्हवर सेव्ह करुन मग तिथले सर्व डिलीट केले. डेस्कमधील सगळ्या ड्रॉवर्सतील पुस्तके वगैरे बॅगांत भरल्या. त्या जवळजवळ नव्या, वातानुकूलित ऑफिसमध्ये या टोकापासून त्या टोकापर्यंत, मधल्या त्या माझ्या आवडत्या टिव्हीसेटकडे, स्वतःच्या खुर्चीवरुन एकदाचे भरभरुन पाहून घेतले. पुन्हा एकदा आता कोऱ्या झालेल्या डेस्कटॉपवर अखेरची नजर टाकली आणि `pcamil’ या सकाळ माध्यमसमूहातील एका व्यक्तीला कायमसाठी लॉगआऊट केले. गेली सोळा वर्षे म्हणजे २००४च्या फेब्रुवारीपासून हा `pcamil’ सकाळच्या शनिवारवाड्याजवळच्या इमारतीत, शिवाजीनगरच्या वातानुकूलित आणि बाहेर हिरवागार परीसर असलेल्या सुंदर संकुलात, नंतर बाणेर येथे एसआयएलसीच्या हिरव्यागर्द परिसरात आणि मागील दोन वर्षांपासून पिंपरीच्या मुंबई-पुणे हमरस्त्यावरच्या ऑफिसात कार्यरत होता. खरे म्हटले तर तीन वर्षांपूर्वीच सकाळ म...