Posts

Showing posts with the label Natak

तियात्र

Image
तियात्र पोर्तुगिज भाषेत त्रियात्रो म्हणजे नाटक. गोव्यात कोकणीतील संगीतनाटकाला तियात्र म्हणतात. त्रियात्रवर युरोपीयन प्रभाव असला, तरी संहितेचा गाभा मात्र स्थानिक मातीशी निगडित असतो.   by   टिम बिगुल   October 13, 2018 in   संस्कृती आज रात्री अंजुना स्कुलच्या ग्राऊंडवर तियात्र आहे, तू येतोस का पाहायला?” माझ्या बहिणीने मला विचारले अन मी एकदम खुश झालो. गोव्यात वागातोरला सुट्टीवर आलो होतो आणि आज शनिवारी रात्री तियात्रचा शो आहे असे ऐकले आणि मी ताबडतोब होकार दिला. खूप वर्षांनंतर तियात्र पाहण्याचा योग आला होता आणि मी ही संधी सोडणार नव्हतो. तियात्र (Tiatr) म्हणजे कोकणी भाषेतील संगीतमय नाटक. पोर्तुगीज भाषेत तियात्रो म्हणजे नाटक. वागातोरहून चालत रात्री साडेनऊच्या दरम्यान अंजुना येथील शाळेच्या मैदानावर पोहोचलो. तेथेच तियात्र आयोजित करण्यात आले होते. देणगी कुपन्सवर प्रवेश देण्यात येत होता. खुल्या मैदानात फोल्डिंगच्या लोखंडी खुर्च्यांवर बसण्याची सोय होती. अगदी पुढच्या रांगेत पांढऱ्या झग्यातील काही फादर बसले होते. बहुतेक त्या शाळेचे मुख्याध्यापक आणि स्थानिक...