पुढील नूतन वर्षारंभात सातारा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि नाशिक येथे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने होत आहेत. या निमित्ताने दोन्ही संमेलनांचे आयोजक लगीनघाईत असताना यानिमित्ताने गेल्या पंचवीस वर्षांत झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांच्या आणि स्वागताध्यक्षांच्या भाषणांचे मी संकलन करत आहे. मराठी `ग्रंथकारांच्या' संमेलनाबाबत पहिला विद्रोही सूर लावला होता तो महात्मा जोतिबा फुले यांनी. त्यावेळी नगरच्या अमेरिकन मराठी मिशनच्या `ज्ञानोदय' मासिकात प्रसिद्ध झालेले 'घालमोड्या दादां'ना उद्देशून लिहिलेले त्यांचे पत्र आता सर्वांना माहित आहेच. या साहित्य संमेलनापासून पहिली वेगळी चूल मांडण्याचे धाडस ख्रिस्ती साहित्य संमेलनाने १९२७ साली झालेल्या नाशिकच्या संमेलनाद्वारे केले. या १९२७ पासून सुरु झालेल्या ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांच्या भाषणांचे दस्तऐवजीकरण २००१ सालच्या संमेलनापर्यंत सुनील आढाव यांनी केले आहे. त्यानंतरच्या संमेलनाध्यक्षीय भाषणांचे संकलन आता मी करत आहे. माझा हा प्रकल्प आता शेवटच्या टप्प्यात असताना दरम्यान त्यावेळचे महाराष्ट...
Posts
Showing posts with the label Sharad Pawar
- Get link
- X
- Other Apps
बारामतीकर. तसे पाहिले तर आम्ही मूळचे बारामतीकर. अगदी अलीकडच्या काळापर्यंत पुणे जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ होते. पुणे, बारामती आणि खेड. तर या बारामती लोकसभा मतदारसंघात आमच्या पिंपरी चिंचवड शहराचा अंतर्भाव होता. गोवा सोडून मी पुण्यात तात्पुरता स्थायिक झालो, डेक्कन जिमखाना येथे रानडे इन्स्टिट्युटसमोर लॉजमध्ये मंथली कॉट बेसिसवर चांगली तीनचार वर्षे राहिलो. लग्नानंतर मात्र सेटल व्हावे लागले. जॅकलिनची नोकरी चिंचवडला म्हणून तेथेच घर घेतले आणि अशाप्रकारे आम्ही निदान लोकसभा मतदार संघापुरते बारामतीकर बनलो. त्यावेळी खेड मतदारसंघात अशोक मोहोळ, विदुरा नवले, निवृत्ती शेरकर खासदार होते, नंतर किसनराव बाणखेले खासदार बनले, पुण्यातले खासदार मंडळी तर सर्वपरिचित आहेत. आमच्या बारामती मतदारसंघात मात्र खासदारांचे नेहेमीच एकच आडनाव असायचे. फक्त पहिले नाव बदलायचे. शरद पवार, अजित पवार, पुन्हा शरद पवार. त्यांच्या विरोधात नेहेमीच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असल्याने लोकसभा निवडणुकीत मतदान कुणाला करायचे याचा विचार करण्याची कधी गरजच भासली नाही. पण एकदा ती वेळ आली. त्याआधीची ही घटना सांगतो. उन्...
- Get link
- X
- Other Apps
निवडणूक चिन्हे टी एन शेषन निवडणूक आयुक्त होण्याआधीची ही गोष्ट आहे. काळ साधारणतः सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीचा. श्रीरामपुरात काही मोक्याच्या जागी आणि रेल्वे रुळांच्या बाजूला असलेल्या घरांच्या भिंतींवर आणि इतर बांधकामांवर पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभुमीवर काही चिन्हे आणि घोषणा लिहिलेल्या असायच्या. त्यापैकी एक बैलजोडी असायची, गायवासरू असायचे, शहरी भागांत मिणमिणता दिवा असायचा. अनेक चित्रांत लाल रंगातलं विळा-कणीस हें चिन्ह असायचं, काही ठिकाणी विळा आणि हातोडा हे चिन्ह असायचं. देशातल्या लोकसभा आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत रंगवलेल्या या चित्रांवर विविध पक्षांची ही निवडणूक चिन्हे, पक्षांची आणि उमेदवारांची नावे असायची. तर यापैकी बैलजोडी हे चिन्ह होतं मोरारजी देसाई वगैरे नेत्यांच्या संघटना काँग्रेसचं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसमध्ये फार मोठी म्हणजे सरळसरळ उभी फूट पडली होती आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आपल्या गटासाठी बैलजोडीऐवजी नवे गायवासरू हे चिन्ह घ्यावं लागलं होतं. सन १९७१च्या सार्वत्रिक निवडणुका इंदिरा गांधींनी हे नवे निवडणुक चिन्ह घेऊन लढवल्या आणि...
मुख्यमंत्री शरद पवार यांच्या केबिनबाहेर माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण फाईल घेऊन ताटकळत बसले होते...
- Get link
- X
- Other Apps
मुख्यमंत्री शरद पवार यांच्या केबिनबाहेर माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण फाईल घेऊन ताटकळत बसले होते... https://www.aksharnama.com/client/article_detail/4040 पडघम - राज्यकारण कामिल पारखे शंकरराव चव्हाण, शरद पवार, इंदिरा गांधी, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण आणि सत्यसाईबाबा Thu , 20 February 2020 पडघम राज्यकारण शंकरराव चव्हाण Shankarrao Chavan शरद पवार Sharad Pawar इंदिरा गांधी Indira Gandhi पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan उद्धव ठाकरे Uddhav Thackeray अशोक चव्हाण Ashok Chavan सत्यसाईबाबा Sathya Sai Baba १) माजी मुख्यमंत्री असलेले शंकरराव चव्हाण नंतर त्यांना ज्युनियर असलेल्या शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून सामिल झाले, मासोळी पाण्याबाहेर काढल्यावर तडफडते, तसे राजकीय नेते सत्तेबाहेर पडल्यास त्यांचे होते, हे यामागचे कारण. २) “मी आज जो काही आहे, तो केवळ यांच्या कृपेने आणि आशीवार्दाने आहे!” असे शंकरराव चव्हाण यांनी त्या लोकांना ठणकावून सांगितले. ते छायाचित्र पुट्टपर्थीच्या सत्यसाईबाबा यांचे होते! ३) महाराष्...
गेल्या पाच दशकांतील सार्वत्रिक निवडणुकांच्या काही आठवणी
- Get link
- X
- Other Apps
गेल्या पाच दशकांतील सार्वत्रिक निवडणुकांच्या काही आठवणी पडघम - देशकारण कामिल पारखे इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, काँग्रेस आणि भाजप Sat , 06 April 2019 पडघम देशकारण लोकशाही निवडणुका इंदिरा गांधी राजीव गांधी पी. व्ही. नरसिंहराव अटल बिहारी वाजपेयी बाळासाहेब ठाकरे शरद पवार Sharad Pawar देशातील सार्वत्रिक निवडणुकांचा मी सर्वप्रथम अनुभव घेतला तो बांगलादेश मुक्तीनंतर पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९७१ साली निवडणुका लढवल्या तेव्हा. कोपरगाव लोकसभा मतदारसंघात डाव्या पक्षाच्या पी. बी. कडू यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे एकनाथ विठठलराव विखे उभे होते. अहमदनगर जिल्हा त्या काळात डाव्यांचा बालेकिल्ला होता. सुरुवातीला नवखे उमेदवार असलेल्या विखेंनी अखेरीस निवडणुकीत बाजी मारली. याचे कारण इंदिरांच्या नेतृत्वाखाली गाय-वासरू चिन्ह असलेल्या नवकाँग्रेस पक्षानं संपूर्ण देशात संघटना काँग्रेसच्या बैलजोडीला, जनसंघाच्या पणतीला, डाव्यांच्या लाल बावट्याला आणि इतर पक्षांना निवडणुकीत धूळ चारली होती. ‘गाय-वास...