एकच बातमी दोनदा छापण्याची गोष्ट Kiran Bedi
गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१८ एकच बातमी दोनदा छापण्याची गोष्ट सोमवार , ३० जुलै, २०१८ goo.gl/U5VdQx कामिल पारखे एकदा छापलेली बातमी तशीच्या तशी पुन्हा छापायची नाही असा संकेत आहे. मात्र, आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या विनंतीमुळे तो कसा बाजूला ठेवला गेला याची ही गोष्ट. किरण बेदी यांची दिल्लीहून गोव्याला बदली झाली तेव्हा त्या ज्युनियर पोलीस अधिकारी होत्या. गोवा, दमण आणि दीव हा केंद्रशासित प्रदेश त्यावेळी दमण आणि दीव यांच्यासह बारा तालुके असलेला एकच जिल्हा होता. त्यामुळे तेव्हा एकच जिल्हाधिकारी आणि एकच जिल्हा पोलिस अधीक्षक असे. बेदी या वाहतूक खात्याच्या उपअधीक्षक म्हणून रुजू झाल्या होत्या. ही घटना आहे मार्च १९८३ सालची. दोनच वर्षांपूर्वी 'नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकाचा बातमीदार या पदावर मी रूजू झालो होतो. माझ्यासह आमच्या दैनिकात केवळ तीनच बातमीदार होते. आणि त्यामुळे ज्युनियर असल्याने माझ्याकडे असलेल्या अनेक बिट्समध्ये क्राईमचाही समावेश होता. बेदी ज्युनियर असल्या तरी त्यांच्याभोवती तेव्हाच एका वलय निर्माण झाले होते. इंडियन पोलीस सर्व्हि...