Posts

Showing posts with the label Ghogargaon
Image
  महारांना पौराहित्य द्यावे का? असे दचकावून जाऊ नका.                                                  Fr. Gurien Jacquier (MSFS) महारांना पौराहित्य द्यावे का? त्यांना धर्मगुरुची दीक्षा दिल्याने धर्मद्रोह होतो का? समाजातील अगदी खालच्या पातळीवर असलेल्या जातीच्या या लोकांना पौरोहित्याचे अधिकार दिल्यास समाजातल्या वरच्या जातींतले लोक त्यांना स्विकारतील का? याबाबत धर्मशास्त्रांचे मत अजमावून घ्यावे लागेल का? धर्माचार्यांचे याबाबत मार्गदर्शन आणि परवानगी घ्यावे लागेल का? असे दचकावून जाऊ नका. हे प्रश्न एक शतकापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात विदर्भात आणि मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात विचारले गेले होते. आणि त्याबाबत नक्की काय निर्णय घ्यावा, त्याचे पडसाद काय उमटतील याविषयी प्रश्नचिन्ह होते. भारतातील समाजजीवनाविषयी, येथील अस्पृश्यांविषयी लोकांमध्ये असलेल्या तिरस्काराच्या भावनेची कल्पना असल्याने काही युरोपियन लोक याबाबत विचार करत होते. आणि त्या...

‘घरवापसी’ आणि ‘लव जिहाद’च्या गोष्टी... पण वेगळ्या प्रकारच्या

‘घरवापसी’ आणि ‘लव जिहाद’च्या गोष्टी... पण वेगळ्या प्रकारच्या पडघम  - सांस्कृतिक कामिल पारखे ‘घोगरगावचे जाकियरबाबा - मराठवाड्यातील ख्रिस्ती मिशन कार्य : इ  स. १८९२ पासून’ या माझ्या पुस्तकात आतील पानावर एक रंगीत छायाचित्र आहे. मराठवाड्यात विशेषतः औरंगाबाद जिल्ह्यात ख्रिस्ती धर्माचा पाया रचणारे फ्रेंच फादर गुरियन जाकियर यांच्या कार्यावर आणि पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य असलेल्या ख्रिस्ती समाजाविषयीचं हे पुस्तक आहे. ‘घोगरगावातील एक ख्रिस्ती कुटुंब’ असं त्या छायाचित्राखाली लिहिलेलं आहे. त्यात नऊवारी पातळ घातलेली माझी आई, मार्थाबाई आपला भाचा, नाथू शिनगारे आणि त्याची बायको-मुलं-नातवंडं आणि माझ्या एका पुतणीबरोबर आहे. आम्ही श्रीरामपूरला परतताना नाथुने स्वतः जमिनीतून भराभरा उपटून हरभऱ्याच्या टहाळीचा वानवळा आम्हाला दिला होता, तेव्हा त्याच्या हिरव्यागार शेतात मी ते छायाचित्र काढलं होतं.   फ्रान्समधून १८९२ साली येऊन औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात घोगरगाव येथे ग्रामीण लोकांच्या सेवेत स्वतःला वाहून, ५० वर्षांच्या काळात शेकडो लोकांना बाप्तिस्मा देणारे जाकियरबाबा आज संत मानले जा...