Posts

Showing posts with the label Mataka

अनुशासन पर्वाच्या आठवणी Discipline during the Emergency period

Image
बुधवार, १३ जून, २०१८ मुखपृष्ठ महाराष्ट्र देश-विदेश कला-साहित्य समाज अर्थ क्रीडा मनोरंजन करिअर न-नायक दिवाळीअंक मुखपृष्ठ     देश-विदेश      goo.gl/a4fxgB  अनुशासन पर्वाच्या आठवणी बुधवार, १३ जून, २०१८ कामिल पारखे आणीबाणीचा कालखंड देशाच्या इतिहासातील काळाकुट्ट काळ समजला जातो. अर्थात शिस्तीचा कालखंड होता. मटके, खासगी सावकारी यांना चाप बसवणारा होता हेही लक्षात घेतले पाहिजे. तो दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वांत काळाकुट्ट समजला जातो. मात्र त्या दिवशी म्हणजे २६ जून १९७५ संपूर्ण दिवसभर देशभर काय घडामोडी होत होत्या याची सामान्य लोकांना काहीच कल्पना नव्हती. त्याकाळात दिवसभर जे काय घडायचे ते दुसऱ्या दिवशी सकाळी वृत्तपत्रातून कळायचे. रेडिओ दिवसातून फारच कमी तास चालायचा आणि त्यातील बातम्या तर फारच कमी असायच्या. त्यावेळी मी नुकताच दहावी इयत्तेत प्रवेश केला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ जून १९७५ रोजी श्रीरामपुरात सकाळी मी माझ्या  वडिलांसह आमच्या दुकानावर पोहोचलो आणि तेथे मी वर्तमानपत्र वा...