Posts

Showing posts with the label kiss
Image
राजे चार्ल्स तृतीय, पद्मिनी कोल्हापुरे, राणीसाहिबा एलिझाबेथ, इंग्लंडच्या राणीसाहिबा एलिझाबेथ दुसऱ्या यांच्या पार्थिव अवशेषांची अंतिम यात्रा सुरु झाली आहे. त्यांचा पार्थिव देह लंडनला आणण्यासाठी प्रवास होतो आहे तेव्हा ठिकठिकाणी हजारो लोक या राणीला अखेरचा मानदंड देण्यासाठी फुले घेऊन उभे राहत आहेत असं बातम्यांतून दिसतं. इंग्लंडविषयी आणि या देशाचे वैभव अनुभवलेल्या, त्या वैभवाचा एक हिस्सा असलेल्या राणीसाहिबाबद्दल जगभर कुतूहल तर आहेच आणि संमिश्र भावनाही आहेत. दिडशे वर्षे इंग्लंडने भारतीय उपखंडाला गुलामगिरीत ठेवले, या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी हजारो लोकांनी आपले रक्त आणि घाम गाळले. आणि तरीसुद्धा आपल्या देशात इंग्लंडविषयी कटुतेची भावना नाही. राणीच्या मृत्यूविषयी शोक करण्यासाठी एक दिवस सुतक पाळून आणि देशाचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवून भारताने हे दाखवून दिलं आहे.  इंग्लंडविषयी भारतीय जनतेत एक सुप्त आकर्षण आहे. बहुधा जगभर अनेक देशांतील लोकांत, विशेषतः ब्रिटिश वसाहती असलेल्या राष्ट्रांत- अशी भावना असणं शक्य आहे. अमेरिकेविषयीसुद्धा असच आकर्षण आहे.  भारतातील अनेक लोकांना इंग्लं...