पुढील नूतन वर्षारंभात सातारा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि नाशिक येथे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने होत आहेत. या निमित्ताने दोन्ही संमेलनांचे आयोजक लगीनघाईत असताना यानिमित्ताने गेल्या पंचवीस वर्षांत झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांच्या आणि स्वागताध्यक्षांच्या भाषणांचे मी संकलन करत आहे. मराठी `ग्रंथकारांच्या' संमेलनाबाबत पहिला विद्रोही सूर लावला होता तो महात्मा जोतिबा फुले यांनी. त्यावेळी नगरच्या अमेरिकन मराठी मिशनच्या `ज्ञानोदय' मासिकात प्रसिद्ध झालेले 'घालमोड्या दादां'ना उद्देशून लिहिलेले त्यांचे पत्र आता सर्वांना माहित आहेच. या साहित्य संमेलनापासून पहिली वेगळी चूल मांडण्याचे धाडस ख्रिस्ती साहित्य संमेलनाने १९२७ साली झालेल्या नाशिकच्या संमेलनाद्वारे केले. या १९२७ पासून सुरु झालेल्या ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांच्या भाषणांचे दस्तऐवजीकरण २००१ सालच्या संमेलनापर्यंत सुनील आढाव यांनी केले आहे. त्यानंतरच्या संमेलनाध्यक्षीय भाषणांचे संकलन आता मी करत आहे. माझा हा प्रकल्प आता शेवटच्या टप्प्यात असताना दरम्यान त्यावेळचे महाराष्ट...
Posts
Showing posts with the label Ahmednagar
- Get link
- X
- Other Apps
जोतिबा फुले हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे एक गुरु. जोतिबांचे पहिलेवहिले आधारभूत अनेक संदर्भटिपांसह चरित्र धनंजय कीर यांनी लिहिले ते डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणामुळेच. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र कीर यांनी चरित्रनायक हयात असताना आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून लिहिले आहे. फुले यांचे चरित्र लिहिण्याची प्रेरणा कीर यांना कशी मिळाली याविषयी कीर यांनी आपल्या प्रस्तावनेत लिहिले आहे. त्या प्रस्तावनेच्या पहिल्याच परिच्छेदात कीर लिहितात: ``डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र मी लिहीत असताना एका भेटीच्या प्रसंगी, महात्मा फुले यांचे चरित्र लिहिण्याचा आपला मानस आहे असे बाबासाहेबांनी मला सांगितले. परंतु आपली प्रकृती ढासळत असल्याने हे कार्य आपल्या हातून सिद्धीस जाईल किंवा नाही अशी त्यांनी शंका प्रदर्शित केली. त्यावर मी स्वयंस्फूर्तीने उत्तरलो, ``बाबासाहेब, ते कार्य आपण करू शकला नाहीत तर मी ते तडीस नेण्याचा प्रयत्न करीन'. डॉ बाबासाहेब हे, भगवान बुद्ध व महात्मा कबीर या आपल्या दोन गुरुंच्या बरोबरीने महात्मा फुले याना आपले तिसरे गुरु मानीत. डॉ आंबेडकरांचे हे संकल्पित कार्य नि उत्कट इच्छा ह...
- Get link
- X
- Other Apps
पॅरीसहून आम्ही रेल्वेने लुर्ड्स\च्या दिशेने निघालो. ग्रामीण फ्रान्सचे या प्रवासातून ओझरते दर्शन घडले..आपल्याकडे असते तशी घनदाट वस्तीची गावे व शहरे या प्रवासात अजिबात दिसली नाही. लुर्ड्स रेल्वेस्टेशनवर उतरलो तेव्हा फ्रान्समधल्या वाटेरवरच्या इतर रेल्वे स्टेशनांपेक्षा मोठ्या संख्येने येथे लोक उतरले होते. कारण स्पष्टच होते, लुर्ड्स हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे एक महत्त्वाचे धार्मिक पर्यटन क्षेत्र आहे. मेरीयन डिव्होशन म्हणजे मदर मेरीच्या भक्तीसाठी जगात काही प्रसिद्ध तिर्थक्षेत्रे आहेत, त्यापैकी लुर्डस हे एक महत्त्वाचे जागतिक धार्मिक स्थळ आहे .. युरोपच्या दौऱ्यावर जॅकलिन आणि आमची मुलगी अदितीसह मी आलो होतो. रेल्वे स्टेशनवर उतरुन टॅक्सीने आम्ही आधीच आरक्षण केलेल्या हॉटेलकडे आलो. हॉटेलची रुम पॅरीसच्या हॉटेलच्या मानाने आधीच ऐसपैस आणि स्वस्त होती. लुर्ड्स शहरात आमच्या या हॉटेलमधल्या वास्तव्यात घडलेली ही घटना येथे सांगायलाच हवी. हॉटेलच्या रिसेप्शन काऊंटरपाशी मी उभा होतो तेव्हा एक महिला तेथे क्लार्कशी बोलत होती, आमच्याप्रमाणे तीही आशियाई देशातील होती हे नक्कीच होते. का कुणास ठाऊक, त्या महिलेने मला ...
- Get link
- X
- Other Apps
अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ आमचा अहमदनगर जिल्हा एकेकाळचा कम्युनिस्ट विचारसरणीचा बालेकिल्ला.. इथले नंतर राज्यात आणि केंद्रात प्रस्थापित झालेले अनेक नेते मूळचे कम्युनिस्ट विचारधारेचे. मला आठवते ती इथली पहिली लोकसभेची निवडणूक १९७१ सालची. त्यावेळचे तेव्हाच्या कोपरगाव मतदारसंघातले सर्वांत तगडे उमेदवार होते कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड पी. बी. कडू पाटील आणि त्यांच्या विरोधात होते होतकरु तरुण उमेदवार एकनाथ विठ्ठलराव विखे पाटील. निवडणूक प्रचारादरम्यान या दोघांना त्यावेळी श्रीरामपूर येथे आमच्या `पारखे टेलर्स' दुकानासमोर मी पाहिले. कॉम्रेड कडू पाटील यांची प्रचारात आघाडी होती. इंदिराबाईंच्या `गरिबी हटाव'च्या त्या लाटेत निवडणूक अर्थात बाळासाहेब विखे जिंकले आणि त्यानंतर जिल्ह्यातला कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव ओसरत गेला, राज्यात सुद्धा. आताचा शिर्डी मतदारसंघ राखीव झाला, त्यामुळे विखे घराण्याने शेजारच्या अहमदनगर मतदारसंघात लक्ष केंद्रित केले आहे. तरी शिर्डी मतदारसंघात विखे चालवतील त्या उमेदवाराला भरपूर मते मिळतील अशीच स्थिती आहे. रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठ...
- Get link
- X
- Other Apps
महाराष्ट्रात भौगोलिकदृष्ट्या हरेगावचे स्थान काय आहे हे फार लोकांना माहित नाही. हरेगाव हल्लीच्या हमरस्त्यावर नाही, मात्र याच हरेगावामुळे या परिसरात हमरस्ते आणि रेल्वे स्टेशने तयार झाले, औद्योगिक आणि आर्थिक विकास झाला आणि आसपास श्रीरामपूरसारखे त्याकाळात अस्तित्वात नसलेले शहर निर्माण झाले. ही बाबसुद्धा लोकांना माहित नसणार अहमदनगर जिल्ह्यातच आणि श्रीरामपूरजवळ असलेले शिर्डी हे स्थळ जगाच्या नकाशावर आपली जागा राखून आहे. मात्र शिर्डी हे नावारुपाला आले ते अलीकडच्या काळात, म्हणजे सत्तरच्या दशकात. त्याकाळात श्रीरामपूरहून मी आणि माझा एक मित्र सायकलने शिर्डीला जायचो, तिथे दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही मुले आणि इतर भाविक लोक थेट साईबाबांच्या मूर्तीसमोर बसायचो. देवदर्शन झाल्यावर काही क्षण मंदिरात किंवा पायऱ्यांवर स्वस्थ बसायचे असते, हे मी त्यावेळी शिकलो. आजूबाजूला भिंतीही नव्हत्या आणि अजिबात गर्दी नसायची यावर आज कुणाचा विश्वासही बसणार नाही. याउलट हरेगाव मात्र फार पूर्वीपासून एक गजबजलेले ठिकाण होते. समाजमाध्यमावर ``आम्ही हरेगावकर'' या ग्रुपचा गेली काही वर्षे मी सभासद आहे. हरेगावशी म...
- Get link
- X
- Other Apps
Fr. Hermann Bacher Father of the Watershed Movement in India Fr. Hermann Bacher, the ‘Father of the Watershed Movement in India’, was the parish priest in Shrirampur in Ahmednagar district in 1960s and 1970s when I was a school student there. As a boy, I watched him from a distance but never had an occasion to speak to him. Never did I think then that I would later write a biography in English and Mararhi of this great missionary. In tribute to Fr. Hermann Bacher on his first death anniversary on September 14, representatives from around 270 villages in Ahmednagar district have come together to celebrate his life and his work. Fr. Hermann Bacher Memorial rally will be held at ADCC Auditorium in Ahmednagar. Bacher Baba came to India from Switzerland and made the district of Ahmednagar his home for over 60 years. In 1967, Bacher Baba founded the Social Centre in Ahmednagar to work for the upliftment of the poor and...
- Get link
- X
- Other Apps
ग. दि. माडगूळकर गेली अनेक वर्षे पुणे मुंबई महामार्ग माझ्या रोजच्या वहिवाटीचा रस्ता राहिलेला आहे. वाकडेवाडी येथे सिटी बस स्टॉपवर उतरले की मग रस्ता ओलांडून आधी फर्ग्युसन कॉलेज रोडवरच्या `टाइम्स ऑफ इंडिया' आणि त्यानंतर `साखर संकुल'पाशी असलेल्या `सकाळ टाइम्स' या माझ्या कार्यालयाची वाट धरायची हा माझा नेहमीचा शिरस्ता. रस्ता ओलांडला की माझी नजर आपसूक तिथल्या बैठ्या प्रशस्त कौलारु घराकडे जायची, आजही जाते. मी कितीही घाईत असलो, अगदी घड्याळाच्या काट्याशी शर्यत चालू असली तरी एक नजर त्या वास्तूकडे जातेच. सावकाश चालत असलो तर मग त्या बंगलीच्या आजूबाजूच्या जागांकडे नीट पहिले जाते, बंद दारे आणि खिडक्या, कौलांवर साचलेली झाडांची सुकलेली पाने, पार्किंगमधली वाहने याकडे नीट लक्ष जाते. यापैकी कधीही न चुकता पाहिली जाणारी गोष्ट म्हणजे वास्तूचा `पंचवटी' हा नामफलक आणि तिथे अगदी प्रथमदर्शनी असणारा तो छोटासा नीलफलक आणि त्यावरची ती अक्षरे. '' पुणे ऐतिहासिक वास्तू स्मृती - `गीतरामायण'कार ग. दि. माडगूळकर (१९१९-१९७७) येथे राहत होते (१९५३-१९७७). '' खूप वर्षांपूर्वी एकद...
- Get link
- X
- Other Apps
संजीवनी साखर कारखाना संस्थापक शंकरराव कोल्हे ''तुम्ही मुंबई-पुण्याकडची आणि इतर शहरांतले पत्रकार, तुम्हाला आमच्याकडच्या प्रश्नांची काय माहिती असते ? इकडे येण्याआधी तुम्ही चारदोन स्थानिक पत्रकारांशी बोलता, जुनी वार्तापत्रे नजरेकडून घालता आणि आमच्यासारख्या लोकांना तेच-तेच प्रश्न विचारता. शेतीसाठी पाणीवाटपाचा वाद, अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर आणि दक्षिण वाद आणि शंकरराव काळे -शंकरराव कोल्हे वाद, बस्स, हे विषय सोडून तुमची गाडी पुढे ढळतच नाही. हा, घ्या तुम्ही तो नाश्ता आणि चहा,,,'' कोपरगावातल्या संजीवनी साखर कारखान्याच्या आवारात साखर कारखाना संस्थापक शंकरराव कोल्हे यांची मुलाखत घेताना अगदी सलामीला झडलेला हा संवाद. माझ्यापेक्षा वयाने आणि कर्तृत्वाने तर खूप मोठे असलेल्या शंकरराव कोल्हे यांच्या समोर मी बसलो होतो आणि माझ्याकडून एकदोन प्रश्न विचारले गेल्यानंतर या साखरसम्राटांनी अशी तोफ डागली होती. अर्थात `इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी आणि राष्ट्रीय पातळीवरच्या दैनिकाचे मी प्रतिनिधीत्व करत असल्याने समोरच्या व्यक्तीच्या कर्तृत्वाने किंवा नुसत्या बोलण्याने मी दबून जाण्याचा...