Posts

Showing posts from January, 2022
Image
I have a dream: मार्टिन ल्युथर किंग (जुनियर) I have a dream, a song to sing हे ABBA या ग्रुपने गायलेले सत्तरच्या दशकातील गाणे माझे खूप आवडते आहे. गोव्यात धेंपे कॉलेजात हायर सेकंडरीत शिकताना ऐकलेले हेे सुंदर रोमँटिक गाणे आहे. अलिकडच्या काळात किबोर्डवर हे गाणे वाजवायलासुद्धा मी शिकलो आहे. या गाण्याचे शब्द, संगीत आणि आबा ग्रुपच्या गायिकांचा आवाज या सर्वांची एक वेगळीच जादू आहे. I have a Dream, a song to sing To help me cope, with anything If you see the wonder, of a fairy tale You can take the future, even if you fail I believe in angels Something good in everything I see I believe in angels When I know the time is right for me I'll cross the stream, I Have a Dream त्याशिवाय " I have a dream' याच शिर्षकाचे मार्टिन ल्युथर किंग (जुनियर) या आफ्रो-अमेरिकन नेत्याचे मानवी हक्क आणि समानता याविषयीचे भाषण मला अलिकडच्या काळात खूप भावले. मानवी इतिहासात अजरामर ठरू शकतील अशा भाषणांत पंडित नेहरुंचे 'नियतीशी करार' हे भाषण, अब्राहाम लिंकन यांचे गेटीसबर्ग येथील 'गव्हर
Image
  हा आफ्रिकन किंवा ब्लँक नेटिव्हिटीचा फोटो आहे. लाकडावर कोरलेले हे ब्लॅक नेटिव्हिटीचे शिल्प अनेक वर्षांपासून माझ्याकडे आहे. नेटिव्हिटी किंवा Nativity of Jesus म्हणजे ख्रिसमस किंवा नाताळ. या शिल्पात ख्रिसमसला सजवतात त्या क्रिब ( crib) किंवा गव्हाणीत जी मुख्य पात्रे असतात ती सर्व या शिल्पात आहेत. फरक इतकाच कि नेहेमीच्या ख्रिसमसच्या चित्रात जसे गोरेेगोरेपान, लालचुटुक ओठाचे बेबी जिझस, तितक्याच गौरवर्णाचे मदर मेरी, सेंट जोसेफ आणि आकाशातले देवदूत असतात तसे या चित्रात नाही. या शिल्पातला बाळ येशू, त्याची आई मारिया, सेंट जोसेफ आणि देवदूतसुद्धा चक्क घनदाट कुरळे केस असणारे काळे म्हणजे आफ्रिकन आहेत ! म्हणूनच मी या शिल्पासाठी `ब्लॅक नेटिव्हिटी' हा शब्द वापरला आहे. जसे आपल्याकडे मदर मेरीला साडीत आणि योसेफला धोतर आणि कांबळींसह दाखवतात अगदी तस्सेच येशू ख्रिस्ताचा जन्म इस्राएलमध्ये झाला, त्याअर्थाने तो आशियाई, मात्र संपूर्ण जगभर येशू आणि त्याच्या जीवनातील प्रसंग चित्रांत आणि शिल्पांत रेखाटले जातात ते पाश्चिमात्य लोकांप्रमाणे. याचे कारण म्हणजे हे चित्रे आणि शिल्पे साकारणारे लिओनार्दो द व्हि