`हा, तर आज तुमच्यापैकी किती जणांनी उपवास केला आहे ?'' प्रवचन करणाऱ्या धर्मगुरुंनी अचानक हा प्रश्न केला अन देवळात एकदम शांतता पसरली. तशीही जगभरच्या आमच्या सर्वच देवळांत हजारोंचा समुदाय असला तरी तशी शांतता असतेच, ऐतिहासिक आणि वास्तुशास्त्राचे उत्तम नमुने असलेल्या आणि त्यामुळे आता केवळ पर्यटन वास्तू ठरलेल्या युरोपातील अनेक देवळे अर्थात याला पूर्ण अपवाद. व्हॅटिकन सिटीमध्ये सेंट पिटर्स बॅसिलिकातील सर्वाधिक अतिपवित्र मानलेल्या सिस्टाईन चॅपलमध्ये पर्यटकांचा असाच गोंगाट मी अनुभवला आहे. मायकल अँजेलोच्या ती जगप्रसिद्ध छतावरील आणि भिंतीवरील चित्रे पाहताना न राहवून मीसुद्धा त्या कोलाहलात सामील झालो होतो. तर धर्मगुरुंनी तो प्रश्न विचारला तेव्हा काही काळ शांतता पसरली आणि केवळ दोनचार हात वर झाले. ही खूपच आश्चर्याची गोष्ट होती. कारण हा प्रश्न विचारला गेला तो कालचा दिवस होता ऍश वेन्सडे, भस्म किंवा राखेचा बुधवार. चाळीस दिवसांच्या उपवासकाळाची या दिवसापासून सुरुवात होते आणि गुड फ्रायडेला त्याची समाप्ती होती. या...
Posts
Showing posts with the label Church
- Get link
- X
- Other Apps
‘टिपंवणी’ : सामाजिक इतिहासाचा आणि धार्मिक, सांस्कृतिक स्थित्यंतराचा ऐवज ग्रंथनामा - वाचणारा लिहितो कामिल पारखे पालघर जिल्ह्यातील वसई हे माझे एक आवडते सुट्टीचे ठिकाण. वर्षांतून किमान दोन-तीन दिवस माझा तेथे मुक्काम असतोच. याचे एक कारण म्हणजे माझ्याशी अत्यंत जवळचे, स्नेहाचे संबंध असलेली कुटुंबे तेथे आहेत. आणि दुसरे कारण म्हणजे वसईचे गोव्याशी अनेक बाबतीत असलेले साम्य. या दोन्ही किनारपट्टीवरील प्रदेशांमध्ये एकेकाळी पोर्तुगीजांच्या वसाहती होत्या. वसईतली नारळांची झाडे, अनेक गावांत अजूनही राहिलेली हिरवाई, फळझाडे आणि फुलझाडांमध्ये असलेली टुमदार घरे, अरुंद रस्त्यांच्या चौकाचौकांत असलेले क्रूस आणि या क्रुसांसमोर दररोज संध्याकाळी तेवणाऱ्या मेणबत्त्या, बाजारांत आणि रस्त्यांवर विक्रीला असलेली मासळी, यामुळे आपण क्षणभर गोव्यातच आहोत, असे मला अनेकदा वाटते. गोव्याचे आणि वसईचे ख्रिस्ती लोक यांच्या संस्कृतीतही खूप साम्य आहे. सिसिलिया कार्व्हालो यांचे ‘टिपंवणी’ हे आत्मचरित्र वाचताना वसईच्या या आगळ्यावेगळ्या समाजजीवनात खोलवर डोकावण्याचा अनुभव आला. कार्व्हालो या मराठी साहित्यक्षेत्रात एक कवयित्री...
बोलावणे मिशनरीसेवा व्रताचे आणि पत्रकारीतेचे
- Get link
- X
- Other Apps
विशेष लेख बोलावणे मिशनरीसेवा व्रताचे आणि पत्रकारीतेचे July 20, 2019 lokmarathi Camil parkhe , Journalism कामिल पारखे रविवारची मिस्सा संपल्यावर मी माझ्या वडिलांचे बोट धरून चर्चच्या समोरील मोकळ्या जागेत उभा होतो. देवळातून बाहेर पडणारे लोक आपसांत बोलत उभे होते. श्रीरामपूरला अलिकडेच बदली होऊन आलेले ते तरुण धर्मगुरू घोळक्याने उभे असलेल्या लोकांशी बोलत होते. फादर प्रभुधर यांचे व्यक्तिमत्व अगदी देखणे असेच होते. वक्तृत्वशैलीची देणगी लाभलेल्या फादरांच्या ओघवत्या उपदेशांनी लोक प्रभावित होत असत. भरपूर उंचीचे फादर आपल्या पांढऱ्या झग्यात फिरत होते, तसे त्यांना ‘जय ख्रिस्त’ म्हणून अभिवादन करण्यासाठी लोक त्यांच्याकडे वळत होते. आमच्याकडेही ते आले आणि माझ्या वडिलांशी बोलू लागले. बोलत असताना मध्येच थांबून माझ्याकडे पाहत त्यांनी विचारले, ”पारखे टेलर, तुम्हाला किती मुले आहेत? आणि त्यांच्यामध्ये याचा नंबर कितवा?” माझ्या वडिलांचे श्रीरामपुरात मुख्य बाजारपेठेत सोनार लेनमध्ये टेलरिंगचे दुकान होते. शहरातील दोन-तीन प्रसिद्ध टेलरिंगच्या दु...
Shiv Sena Sainik Marshal John Parkhe
- Get link
- X
- Other Apps
Shiv Sena Sainik Marshal John Parkhe with Balasaheb Thackeray It was around 1975 that slogans like Jai Bhavani, Jai Shivaji were heard in our house in Shrirampur. Influenced by one of his school teachers, Marshal, my elder brother, had started playing Lazim with and Dhol Tasha and this had introduced him to Bal Thackeray’s Shiv Sena. I was then still studying in a secondary school. I watched Marshal leaving house early morning to sweat it out at the local municipal council’s gymnasium. There, wearing a Langot, he wrestled with others on the red soil, climbed and did many startling stunts on the Mallakhamb. After coming home, he ate the Chana dal which was soaked in water the previous night. This was all the luxury diet and nutrients he could afford after working it out hard at the gym in the morning and the lazim playing with his friends on the grounds in the evening. In June 1976, I had left my family almost for good to join the Jesuits, to be a religious priest. A couple of...
पराग रबडे
- Get link
- X
- Other Apps
Bishop Valerian De Souza at our wedding, Parag Rabade is behind सॊमवारी संध्याकाळी व्हाट्सअप ग्रुपवर ती श्रद्धांजली पाहिली अन तेव्हापासून पुण्यातील अनेक पत्रकारांचे मला फोन येत राहिले कामिल, पराग रबडेचे कळले ना तुला..'' परागचे हार्ट अटॅकने निधन झाले, अवघे त्रेपन्न वय असलेल्या आणि फिटनेसबाबत जागरुक असलेल्या परागची ती बातमी ऐकून धक्का बसणे साहजिकच होते. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीस परागबरोबर मी पुणे श्रमिक पत्रकार संघात खूप सक्रीय होतो. त्याकाळात सकाळ, लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस, केसरी, प्रभात, महाराष्ट्र हेराल्ड आणि टाइम्स ऑफ इंडियात काम करणाऱ्या पत्रकारांमध्ये आमची जोडगोळी खूपच फेमस झाली होती. त्यामुळे ही धक्कादायक बातमी ऐकताच या पत्रकारांचे मला फोन येणे साहजिकच होते. सन १९८९च्या सुमारास पराग रबडे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियात बातमीदार म्हणून रुजू झाला त्याच सुमारास मी पणजी - गोवा सोडून लोकमत टाइम्स औरंगाबाद मार्गे पुण्यात इंडियन एक्सप्रेसला जॉईन झालो होतो. पुणे श्रमिक पत्रकार संघात आम्ही दोघांनीही निवडणुका लढविल्या आणि त्यानिमित्ताने पत्रकार संघात अगदी पहिल्यांदाच मतपेटीत...
सांता क्लॉजची खरी ओळख
- Get link
- X
- Other Apps
सांता क्लॉजची खरी ओळख समोरच्यांना कळली नाही, तो सस्पेन्स खूप वेळ टिकला तर त्यातली गंमत अधिक वाढते! पडघम - सांस्कृतिक कामिल पारखे लेखक कामिल पारखे सांता क्लॉजच्या वेषात Mon , 24 December 2018 पडघम सांस्कृतिक नाताळ मेरी ख्रिसमस Merry Christmas पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी मी १९८५ साली लखनौत होतो. डिसेंबरची अखेर येऊ लागली, तसे मला नाताळाचे वेध लागले. पण लखनौमध्ये गोव्यासारखे ख्रिसमसचे वातावरण नव्हते. लखनौ विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्टस आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ जर्नालिस्टसने आयोजित केलेल्या या अभ्यासक्रमात देशातील विविध राज्यांतील पत्रकार सामील होते. गोव्यातून मी एकटाच होतो. सहभागी पत्रकारांपैकी बहुतेकांनी ख्रिस्तमसचा कधी अनुभव घेतला नव्हता. त्यामुळे लखनौत या पत्रकार मित्रांसह नाताळ साजरा करण्याचे मी ठरवले. माझ्या पत्रकार सहकाऱ्यांना नाताळचा आनंद देण्याचे, त्यांच्यासाठी सांता क्लॉज बनून त्यांना चकित करण्याचे मी ठरवले. नाताळाचे व कुठल्याही सणाचे, उत्सवाचे त्या काळात आजच्या...
Devotees attend Vailankanni novena in Khadki, Chinchwad
- Get link
- X
- Other Apps
Wednesday, September 5, 2018, 12:56 PM | e-paper Devotees attend Vailankanni novena in Khadki Camil Parkhe 10.21 AM goo.gl/bqD9v1 PUNE: A large number of devotees are attending the ongoing novenas in honour of Our Lady of Good Health, Vailankanni at various churches in Pune and Pimpri Chinchwad. The feast of the nativity (birthday) of Mother Mary will be celebrated on September 8. The feast of the nativity of Mother Mary is the second most important festival, next only to Christmas, for the Catholics. St Ignatius Church at Khadki is the main centre of the novena prayers and feast of Our Lady of Vailankanni in the city. Thousands of devotees from various churches in the city and nearby areas have been attending the novena prayers and mass, celebrated at the especially erected pandal at the church, daily at 12 noon and 6 pm. Pune Bishop Thomas Dabre will c...