Posts

Showing posts with the label Old Goa
Image
  गोव्याला पर्यटक म्हणून गेल्यावर तिथे काय करावे, काय पाहावे   गोव्याला पर्यटक म्हणून गेल्यावर तिथे काय करावे, काय पाहावे असा प्रश्न मला अनेक जण विचारतात. माझा अनुभव असा आहे कि गोव्याला अनेकदा जाऊन आणि तिथे काही वर्षे राहूनही अनेक लोकांनी खराखुरा गोवा पाहिलाच नसतो किंवा अनुभवला नसतो. गोव्यात सुट्टीला गेले म्हणजे समुद्रकिनारी जायचे, मासे आणि इतर मांसाहारी पदार्थांचा यथेच्छ आस्वाद घ्यायचा आणि पिण्याचा कार्यक्रम करायचाअशीच अनेकांची कल्पना असते. खरे पाहिले तर याहून अधिक कितीतरी गोष्टी गोव्यात असताना पाहायच्या आणि अनुभवयाच्या असतात. या महिन्यात चार सुट्ट्या सलग आलेल्या आहेत, आणि तेव्हापासून गोव्यात पर्यटक हंगामही जोमाने सुरु होईल. कोरोनाचा लॉकडाऊन संपला आहे. करोनामुळे दोनअडीच वर्षे घरात आणि शहरांत अडकलेली मंडळी यावेळी बाहेर पडणार आहेत. गोव्यात पर्यटनासाठी पहिल्यांदाच जाणाऱ्या लोकांना गोव्याची तोंडओळख करून घेण्यासाठी मी त्यांना दोन दिवसांच्या गोवा दर्शन टूरमध्ये सहभागी होण्याचा सल्ला देत असतो. या दोन दिवसांत उत्तर आणि दक्षिण गोवा असे पूर्ण गोवा राज्यातील सर्व प्रमुख पर्यटनस्थळे,...
  त्यांचा 'त्या'च्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग द नवहिंद टाइम्स पणजी, गोवा डिसेंबर ३, १९८२   त्यांचा 'त्या'च्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग कामिल पारखे पणजी, डिसेंबर ३ – जुन्या गोव्यातील बॉम जिझस बॅसिलिका परिसरातील हजारो यात्रेकरूंमध्ये आज एक 'अपरिचित' यात्रेकरूंचा छोटा समूह सेंट फ्रान्सिस झेवियरच्या दर्शनाला आला होता. या छोट्या समूहाने खूप लोकांच्या कित्येक वर्षांच्या ख्रिश्चन धर्माविषयी असलेल्या धारणांना, समजुतींना धक्का दिला. हा २७ जणांचा समूह कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा ह्या गावावरुन आला होता व त्याचे नेतृत्व जेसुईट धर्मोपदेशक फादर प्रभूधर आणि संताजी नावाच्या तरुणाकडे होते. त्यांपैकी बहुसंख्य कॉलेजचे विद्यार्थी होते, तर काही फक्त १७ वर्षांचे होते. दररोज सुमारे ३५ कि.मी. अंतर कापत त्यांनी १४० कि.मी.चा प्रवास केला, तो देखील चारदिवसांत, पायी! त्यांचं वेगळेपण ते कट्टर कॅथॉलिक असले तरी लोकांना ते गात असलेल्या मराठी व कोंकणी भजनांवरून जाणवत होतं. विशेष म्हणजे ते भजनं टाळांच्या साथीने म्हणत होते. हे वारकरी मराठी संत नामजप करत होते व तुकारामांचे अभंगदेखील म्हणत हो...

‘निरोप्या’चे संपादक फादर प्रभुधर

Image
‘निरोप्या’चे संपादक फादर प्रभुधर   October 12, 2020     lokmarathi  Camil parkhe   October 12, 2020     lokmarathi  Camil parkhe कामिल पारखे रविवारची मिस्सा संपल्यावर मी माझ्या वडिलांचे बोट धरून चर्चच्या समोरील मोकळ्या जागेत उभा होतो. देवळातून बाहेर पडणारे लोक आपसांत बोलत उभे होते. श्रीरामपूरला अलिकडेच बदली होऊन आलेले ते तरुण धर्मगुरू घोळक्याने उभे असलेल्या लोकांशी बोलत होते. फादर प्रभुधर यांचे व्यक्तिमत्व अगदी देखणे असेच होते. वक्तृत्व शैलीची देणगी लाभलेल्या फादरांच्या ओघवत्या उपदेशांनी लोक प्रभावित होत असत. भरपूर उंचीचे फादर आपल्या पांढऱ्या झग्यात फिरत होते, तसे त्यांना ‘जय ख्रिस्त’ म्हणून अभिवादन करण्यासाठी लोक त्यांच्याकडे वळत होते. आमच्याकडेही ते आले आणि माझ्या वडिलांशी – दादांशी – बोलू लागले. बोलत असताना मध्येच थांबून माझ्याकडे पाहत त्यांनी विचारले, “पारखे टेलर, तुम्हाला किती मुले आहेत? आणि त्यांच्यामध्ये याचा नंबर कितवा?” माझ्या वडिलांचे श्रीरामपुरात मुख्य बाजारपेठेत सोनार लेनमध्ये ‘पारखे टेलर्स’ हे टेलरिंगचे दुकान होते. शहरातील दोन-तीन प्र...

पोर्तुगीज महाकवी लुई वाझ डी केमॉईसचा गोव्यातील पूर्णाकृती पुतळा आधी फोडला गेला, मग हटवला गेला, त्याची गोष्ट

Image
पोर्तुगीज महाकवी लुई वाझ डी केमॉईसचा गोव्यातील पूर्णाकृती पुतळा आधी फोडला गेला, मग हटवला गेला, त्याची गोष्ट पडघम  - साहित्यिक कामिल पारखे पोर्तुगीज महाकवी लुई वाझ डी केमॉईसचा गोव्यातील पुतळा Fri , 31 July 2020 पडघम साहित्यिक लुई वाझ डी केमॉईस Luís Vaz de Camões जॉर्ज फ्लॉयड George Floyd ब्लॅक लाइव्हज मॅटर्स Black Lives Matters काही दिवसांपूर्वी अमेरिकेत जॉर्ज फ्लॉइड या आफ्रिकन-अमेरिकन व्यक्तीची मान एका श्वेतवर्णीय पोलीस अधिकाऱ्याने आपल्या गुढघ्याखाली दाबून धरल्याने त्याचा घुसमुटून मृत्यू झाला. त्यानंतर तीव्र झालेल्या ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ या आंदोलनांतर्गत अमेरिका, युरोपमध्ये विन्स्टन चर्चिल, कोलंबस, एडवर्ड कोल्स्टन यांचे पुतळे पाडले गेले. कारण हे लोक साम्राज्यवादी वा त्याचे समर्थक होते. ३७ वर्षांपूर्वी गोव्यातही पोर्तुगीज महाकवी लुई वाझ डी केमॉईसचा पुतळाही याच कारणांवरून पाडला गेला होता. त्याची ही हकिकत... ... १. गोव्याला पर्यटक म्हणून येणारे बहुतेक सर्व जण जुन्या गोव्याला हमखास भेट देतात. कारण म्हणजे त्याचे मध्ययुगीन काळातले स्थान आणि त्या ऐतिहासिक काळ...